Submitted by poojas on 6 June, 2008 - 07:53
आठवणींच्या अल्लड सरी झेलत..
माझं पहील्या पावसात भिजणं..
आसुसलेल्या अवखळ थेंबांचं..
माझ्या मूठभर अंगणात रुजणं..
सारं कसं नवखं..
पहिलं वहीलं भासणारं..
ओल्याचिंबं देहावरची..
जुनी मरगळ पुसणारं..
ओंजळभर नवे मोती..
अंगणभर नवा सुवास..
पसाभर उत्साहाने..
जगण्याचा नवा प्रयास..
म्हणून तुझी वाट पाहात..
वर्षभर झुरायचं..
अन तू आलास... की अलगद..
तुझ्या कुशीमध्ये शिरायचं..
चिंब चिंब भिजायचं..
धुंद होऊन लुटायचं..
शुभ्र दुधी झरा होत..
खडकामधून फुटायचं..
झिम्माड गाणी.. उनाड पाणी..
पहील्या पावसात बघायचं..
तृप्त क्षण मनात जपत..
पाऊस होऊन जगायचं..!!
गुलमोहर:
शेअर करा
व्वा. छान
व्वा. छान आहे झिम्माड पावसाचं रुजणं, पाऊस होऊन जगणं!
ओंजळभर नवे
ओंजळभर नवे मोती..
अंगणभर नवा सुवास..
पसाभर उत्साहाने..
जगण्याचा नवा प्रयास..
लड बाप्पू. मस्तय!
खुप आवडली,
खुप आवडली, सुंदर... पाऊस पडत असताना, एका 'पाऊस खुप आवडणार्या' व्यक्तीच्या मनातले भाव, छान वाटताहेत...
अरे, ही
अरे, ही वाचायची राहिली!
पूजा, मस्तय कविता.
आसुसलेल्या अवखळ थेंबांचं..
माझ्या मूठभर अंगणात रुजणं..
छान!
वा! खुप
वा! खुप सुन्दर ! एकदम भावली
असच लिहीत जा!
व्वा! खासच
व्वा! खासच जमली आहे.
परागकण
धन्यवाद
धन्यवाद मंडळी !!
पहिला-वहिल
पहिला-वहिला.
बहुतेक तुझ्याच नाही, प्रत्येकाच्या मनातला असाच असावा, अन पाऊस येऊन गेल्यावर तो असा मनातून बाहेर पडत असावा.
दोन क्षण 'हिप्नॉटाइझ' केल्याबद्दल धन्यवाद.