Submitted by नादखुळा on 1 June, 2011 - 03:41
काल सहज उन्हासवे,
खूप गप्पा मारल्या..
तुझ्या ओल्या बटांमधून नितळणार्या,
त्या ईवल्याश्या थेंबातून आरपार व्हायला
त्यांनाही आवडायचं म्हणे..
तळ्यातली फुले वेचताना,
उन्हही तुझ्या गाली स्पर्श करण्याची
एकही संधी सोडत नव्हते म्हणे...
पाऊस पडून गेल्यावरही,
एखादा किरण तुझ्या नजरेसमोर,
सतत असायचाच कि..
बहुदा तोच तर तुझ्या डोळ्यातल्या,
इंद्रधनुष्याचं गुपित असावं हे हि आत्ताचं कळलं..
अचानक उन्हे ताडकन उठली तेव्हा,
काय झाल? मी विचारलं..
तेव्हा ती म्हणाली..
तुझं नि माझं दु:खणं आता सारखंच रे,
दिवस सावलीचं सुख शोधण्यात जातो,
सांजेच्या आठवणींचा छळ नकोसा होतो,
अन तुला जसा स्वप्नांचा आडोसा उरतो ना,
तशीच आजकाल आम्हालाही ठरलेली आहेच ना,
रात्र अंधाराची काळकोठडी !
-नादखुळा
गुलमोहर:
शेअर करा
तू अशा काय रे दु:खी कविता
तू अशा काय रे दु:खी कविता लिहितोस?
पण छान लिहिली आहेस.
बादवे ईवलूष्या--- हे इवल्याश्या असं करशील का?
ठमे अगं ,आठवणींचं देणं आणखी
ठमे अगं ,आठवणींचं देणं आणखी काय?
छान! अचानक उन्हे ताडकन उठली
छान!
अचानक उन्हे ताडकन उठली तेव्हा,
काय झाल? मी विचारलं..
तेव्हा ती म्हणाली..<< इथे ती म्हणजे पहिल्यांदा तुझी 'ती' वाटली आणि पुढचं जरा ऑड वाटलं पण मग परत वाचल्यावर कळलं की 'ती' म्हणजे ऊन्हाची किरणं ... हो ना????
क्या बात.
क्या बात.
मुजरा सरकार... बादवे ते
मुजरा सरकार...
बादवे ते इवलुश्याच आणखी मस्त वाटलं असतं
मस्त !! ( हा नक्की सुकीच
मस्त !!
( हा नक्की सुकीच असणार )
विशालभौ .. आभार्स सर्वांचे !
विशालभौ
.. आभार्स सर्वांचे !
छान कविता ..सुंदर
छान कविता ..सुंदर आशय
नितळणार्या,. ..निथळणार्या म्हणायचंय ..का?
तळ्यातली फुले..?
आणि
तेव्हा (ती) म्हणाली.... अ.व
तुझं नि (माझं )दु:खणं आता सारखंच रे.... ए.व कसं?
बाकी मला कविता दु:खी नाही वाटली
तिच्या आठवणीही तिच्याइतक्याच सुंदर आणि
मोहक असतात ना भौ
आणि विशुबाळ सारखा सारखा मुजरा करून

मग कंबर दुखणार
मग तू झंडु बाम लावणार
आणि मग मुन्नी पुन्हा बदनाम होणार
काय रे देवा!!!
शामराव.....
शामराव.....
