अवतीर्ण जाहले पूर्ण
सावळ्या घनांची दाटी
ती रात्र अष्टमी होती
व्याकुळली धरणी पुरती
डोळ्यात आसवे होती
कालिंदी हृदयी खळबळ
केव्हा ये मुहुर्तवेळा
सुकुमार भेटवी चरण
कुब्जाही विनवी हरिला
मुरलीतून निघती सूर
खिल्लारे घेती वेध
स्फुरतसे बाहू का वाम
निस्तब्ध यशोदा नंद
घुमतसे नाद अनाहत
राधेच्या अंतर्यामी
तृप्तता व्यापून उरली
राधा ती कृष्णचि झाली
रातीच्या मध्यप्रहरात
अवतीर्ण जाहले पूर्ण
योग्यांसी ब्रह्म निष्काम
भक्तांसी सावळा कृष्ण