प्रकाशचित्र

माझे "निवडक दहा" फोटोफिचर (थीम्स)

Submitted by जिप्सी on 5 May, 2012 - 08:14

"काय भन्नाट थीम आहे रे"
"योग्या तोडलसं रे मित्रा.. अक्षरशः तोडलंस"
"तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रचिंमध्ये ह्याचा नंबर सर्वात वरचा"
"फोटो आणि शब्द दोन्ही अ फ ला तु न"
"फोटोच्या वर्णनामुळे प्रत्येक फोटो वेगळा भासतोय.."
"जिप्स्या, जबरदस्त फोटो आणि लेखन!!!"
"प्रथम लिखाणाच्या शैलीचे कौतुक करावे की प्रकाशचित्रांचे ? अशा संभ्रमात पाडायला लावणारा हा धागा."
"फोटोग्राफीसाठी नजर लागते आणि आयुष्य जगायला नजरीया."
"अगदी प्रत्येक ओळ सुंदर... परत परत वाचावी आणि प्रिंट काढुन सुविचारांसारखी भिंतींवर चिटकवावी अशीच"
"अप्रतिम ! कल्पना, मांडणी आणि प्र.चि."

गुलमोहर: 

देवा तुझे किती सुंदर आकाश..

Submitted by गिरिश सावंत on 4 May, 2012 - 04:36

देवा तुझे किती सुंदर आकाश..

चित्र क्र.१
2_HDR2

चित्र क्र.२
girish (12)

चित्र क्र.३

गुलमोहर: 

साद देती हिमशिखरे : भाग-३, मनाली, मनाली आणि फक्त मनाली : भाग २

Submitted by शोभा१ on 2 May, 2012 - 08:14

http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957
http://www.maayboli.com/node/31336

दिनांक, २५.१०.११, उठल्या, उठल्या, कॅमेरा हातात घेऊन बाहेर डोकावले. आणि सुर्यदेवाच्या स्वागतासाठी काढलेली नक्षी बघून मंत्रमुग्धच झाले.
१.

२.सुर्यदेवालाही मग नक्षी बघण्याची घाई झाली.

गुलमोहर: 

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2012 - 05:52

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग 5) - http://www.maayboli.com/node/33590

तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने आणि आशिर्वादाने आज रानफुलांनी शंभरी गाठली आहे. सर्व श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.

९१) गोरखमुंडी/East Indian Globe Thistle

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चंदेरी धबधब्यांची माळ (- मोठी प्रचिसहीत)

Submitted by धनश्री on 1 May, 2012 - 16:14

चंदेरी धबधब्यांची माळ अर्थात Silver Falls State Park. अमेरिकेच्या उत्तर्-पश्चिम भागातील ऑरिगन राज्यात हे स्टेट पार्क आहे. पोर्टलँड या शहरापासून अंदाजे दीड तासाच्या अंतरात हे ठिकाण येते. निसर्गाने उदंड हस्ते लयलूट केलेली एक देखणी जागा. दहा सुंदर धबधब्यांचा नजारा आणि डोळ्यांना थंडावा देणारी हिरवीगार शाल. परवाच एप्रिलमधल्या शेवटच्या विकांताला २ दिवस तिथे कॅम्पिन्ग ला गेलो होतो. त्याचा हा प्रचि वृत्तांत. काही प्रचि मी तर काही नवर्‍याने काढली आहेत.

हे पार्क खूप जुने आहे. अंदाजे ९००० एकरात पसरले असून प्रचंड मोठी डग्लस फरची झाडे सर्वत्र दिसतात. यातील काही झाडे १०० पेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत.

गुलमोहर: 

माझ्या मातीचे गायन...

Submitted by जिप्सी on 1 May, 2012 - 01:56

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!!!!!

महाराष्ट्राची माती गाते, मंगलमय गाणी
इथे जन्मले ज्ञानेश्वर, अन् देहुचा वाणी

मराठमोळी भोळी इथल्या भक्तीची पेठ
ब्रह्म इथे अवघडले येता पायाशी वीट
हरिनामने पावन अवघ्या संतांची वाणी

मेणाहुन मउ मोकळ्या हृदयाची ओल
मन वृंदावन होते येता तुळशीला फूल
फुलापरी कनवाळू इथल्या काट्याची धरणी

जन्म येथला मरण येथले, सामर्थ्याच्या टिळा
डोळ्यामधुनी सुर्य गोंदला, विठु परी सावळा
सोन्याहुन किमती इथल्या शब्द्वांच्या खाणी
महाराष्ट्राची माती गाते मंगलमय गाणी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र