माझी डोंगरचढाई

Submitted by Kiran.. on 23 July, 2012 - 04:08

अनेक जणांचे डोंगरचढाईचे, पर्वतचढाईचे आणि दुर्गभ्रमणाचे प्रव वाचून भयंकर निराशा येत चालली होती. कुठे तरी चढाई केली पाहीजे असा विचार मनात येत होता. माबोवर प्रवासवर्णनही लिहीलेलं नसल्याने हे करणं देखील भागच होतं. त्यातच बायको घरचे सगळे आणि मित्रमंडळी यांनीही लकडा लावला कि विचार चांगला आहे अंमलात आण. कसा होतास आधी ? आं ! सिंव्हगडावर दर रविवारी जात होतास, हिमालयात जात होतास आणि आता सदा न कदा त्या मायबोलीसमोर बसलेला असतोस फावल्या वेळात. नाहीतर षिणेमा ! ते काही नाही ! जायचंच.

बरेच दिवस कष्टाची सवय नसल्याने जिना चढतानाही नको नको होत होतं. खोटं सांगायचं तर जिवावर आलं होतं. असं काहीतरी व्हावं कि कष्टही पडणार नाहीत आणि खोटंही बोललं जाणार नाही असं वाटत होतं आणि अचानक ही इच्छा पुणे मनपाने पूर्ण केली. पालिकेने माझ्यासाठीच बनवल्यासारखे काही डोंगर शहरात ठिकठिकाणी निर्माण केलेले आहेत. निसर्गात ज्याप्रमाणे एक डोंगर दुस-याशी साधर्म्य राखून नसओ तसंच अगदी.. प्रत्येक डोंगर वेगळा !

त्यादिवशी ठिकठिकाणी मनसोक्त चढाई केली..

प्रचि टाकतोच आहे.

रंगीबेरंगी डोंगर
spd1.jpegspd2.jpeg

डोंगरांची निगा राखली जात असताना
spd3.jpeg

लोक तर आपली वाहने देखील दुर्गभ्रमणासाठी घेऊन जात होते.
speedbraker.jpeg

गुलमोहर: 

Lol Lol Lol

सही Lol

रस्ता क्रॉस करताना जोरात गाडी आली, तर भक्ती बर्वे याच डोंगरांच्या आड लपायची ! (तिच्या हयातीतच हा विनोद, तिच्या तोंडावरच केला जात असे.)

अरे देवा!!......... Rofl Rofl Rofl
तू कोणते डोंगर सर करून आलास म्हणून उत्सुकतेने पाहायला आले इथे..
तर्..काय.. खोदा पहाड ,निकला किरन.. Biggrin

किरण _________________/\________________ Happy

"अरे वा, ट्रेकर्सच्या यादीत आणखीन एक नाव" असे म्हणून धागा उघडला तर... Biggrin

खोदा पहाड, निकला किरण>>>>> वर्षूतै अगदी Rofl

किरण, तू म्हणजे तूच आहेस Lol

Pages