वेल

एक वेल नाजुकशी..

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2015 - 22:23

एक वेल नाजुकशी..

एक वेल नाजुकशी
झुले दारा-उंबर्‍यात
येता झुळुक वार्‍याची
कशी डोलते तालात

वेल झुरते सुकते
सल कळेना कुणास
पान झडुनिया सारे
उरे फांदोर्‍यांच्या सोस

स्पर्श होता अनामिक
वेल थरारे आतून
रस जीवनाचा पुन्हा
वाहे अंगाअंगातून

कोंब इवलेसे उभे
तेज मावेना दिठीत
वेल आंदोळत स्वैर
शुभ्र फुले ओंजळीत

वेल जपूनशी ठेव
उरी सुकत-फुलत
मुग्ध साथ देई मना
येवो थोर झंझावात
------------------------------

शब्दखुणा: 

कृष्णकमळ

Submitted by अवल on 23 July, 2012 - 10:18

माझ्या टेरेसमध्ये सध्या कृष्णकमळं उमलताहेत. मला फार आवडणारे एक फुल. थोडा रानवट पण फार गोड सुवास असणारे आणि बालपणीच्या खुप आठवणी जोपासणारे हे फुल.
त्याच्या नावाची कथा ऐकली असेलच तुम्ही. बाजूला १०० कौरव ( जांभळ्या बारीक पाकळ्या), मध्ये पाव पांडव ( पिवळी पाती ) आणि मध्ये तीन मोरपिसं खोचलेला कृष्ण ( तीन पराग असलेला पिवळा मणी) !

त्याचीच ही रुपे :

१. हे झाडावर झुलणारे
1 copy.jpg

२. घरभर त्याचा सुवास फुलावा म्हणून एक घरात आणले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वेल