Submitted by shashank pratapwar on 20 September, 2009 - 02:39
मी फार टेक्नीकल बोलतो,
अस सारख वाटत होत तिला,
"मै ऐसा ही हूँ " म्हणुन ,
सांगू तरी कस तिला .
ती म्हणते बघ ना रे,
सुटलाय धुंद गार वारा,
मी म्हणतो हवामान खात्याने,
दिला होता कालच इशारा.
ती म्हणते हात तुझा ,
किती उबदार वाटतो मला,
मी म्हणतो बहुतेक असेल ,
किंचितसा ताप मला.
मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात ,
कैल्शियम चा फेस आहे ,
ती म्हणते काही सांगू नकोस ,
तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस .
ती रोमांस मधली नजाकत मला सांगते,
मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो,
ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते ,
मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो .
आता हळू हळू मला प्रेमाचे,
विज्ञान कळायाला लागलय ,
तिलापन माझ्या सोबत राहून,
विज्ञानावर प्रेम बसलय.
- शशांक प्रतापवार
गुलमोहर:
शेअर करा
मस्त आहे अजून खुलवा जमलीतर
मस्त आहे
अजून खुलवा जमलीतर (आणखी उदाहरणे देऊन. ते हवामान खात्याचे मस्त आहे).
आता हळू हळू मला
आता हळू हळू मला प्रेमाचं
विज्ञान कळायाला लागलय
तिलापन माझ्या सोबत राहून
विज्ञानावर प्रेम बसलय.
ही मात्र चांगली गोष्टय!
सुंदर आवडली. आणि हां , , , या चिंन्हाची जास्त गरज नाहीय !
सही!!
सही!!
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
धन्यवाद मित्रान्नो...
धन्यवाद मित्रान्नो...
जबरी...
जबरी...
आवडली कविता!
आवडली कविता!