कुणी सांगेल का?

Submitted by प्रविणपा on 20 September, 2009 - 01:50

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?

तुर्तास इतकेच.... अजून प्रश्न पडले की याचा भाग-२ लिहेन Happy

गुलमोहर: 

वा भाउ लइच भारि प्रश्न पडलेत.....पडुद्या पडुद्या..आम्हला मजा येतिये वाचायला...बेश्ट..

उत्तर.

१. डोक्यात अमेरिकेचि हवा गेलि कि असच होते.
२.त्यान्च्या प्राण्यान्ना पण खायला आवडत असेल.
३.नहितर बर्‍याच नजरा त्या स्थळावर खिळ्तात.
४.ते कार्पोरेट रोगाचे प्राथमिक लक्षण आहे.
५.त्याला वाटल गणपतिला कुठ ऐकु जाणार.
६.हो त्या डेट नन्तर पिल्यास म्रुत्यु येन्याचि हमी नाहि.
७.चेहरा पाहुन उगाच कोणितरि मागे लागेल अस वाटत असल.
तस नाहि तर तो दिसु नये म्हणुन घलत असतिल.प्रदूषण निमित्तमात्र आहे.
८.हि पण एक सवयच आहे.वन वे वर रस्ता क्रॉस करताना दोन्हि कडे बघनारे लोक ह्याच श्रेणितले.
९.केवळ शुद्ध "खाज" किन्वा "कन्ड" .
१०.म्हणजे तिल म्हणायचय मला थोडा भाव खायचा आहे इतक्या सहजा सहजि हो म्हणेल अस कस वाटल तुला?

तुमच्या थ्रेड चि गम्मत वाढवन्यासाठी लिहिलय.राग मानु नका.

१) अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
. का डोकावू नये? हल्ली अमेरिका न पाहिलेलेही ग्रीन कार्डावर चर्चा करतांत (रेशन कार्डासारखी)

२) कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
. अहो कुत्रे - मांजरं वेगळी आणि बकरे कोंबडी वेगळी.

३) ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट
का खाली खेचत असतात?
. त्याशिवाय इतरांचं तिथे लक्ष कसं जाणार?

४) बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail
द्वारे का बोलतात?
. त्यांच्या आजुबाजूलाही इतर क्युबिकल्स असतात आणि क्युबिकल्सना कान असतात.

५) समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट
दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
. गणपती हे त्याच्या मुलाचं नांव असावं.

६) विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
. असते.. आणि expiry date उलटून गेल्यावरच त्याचा 'खरा उपयोग' होतो.

७) पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात?
प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
. मेकअप खराब होवू नये म्हणून.

८) काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
. ती माणसं बहुदा कन्या राशीची असतात. (शरदजी उपाध्ये यांच्या सौजन्याने)

९) (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून
वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
. उरलेले १०% यमक जुळवून कविता करतात म्हणून. वेगळेपणा नको का?

१०) कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’
हेच का असतं?
. ते propose कोण करतोय त्यावर अवलंबून असतं.

१. परदेशात जा, तुमच्या वाक्यात 'आमच्या देशात..' डोकवेल...
२. झाडे लावा झाडे जगवा म्हणणारे आळूचं फदफदं खातात तसंच...
३. जनाची नसली तरी मनाची शाबूत असते म्हणून...
४. डायरेक्ट बोलत बसलेले दिसले तर डायरेक्ट घरी हाकलतील म्हणून...
५. शाळेत भाषा / व्याकरणाच्या तासाला कुठे गोट्या खेळायला जायचात...?
६. असते, त्यानंतर काही होत नाही, बिनधास्त बाटल्याच्या बाटल्या प्या... जर काही झालंच तर मला भेटा...
७. झाकली मूठ सव्वा लाखाची...
८. भसकन बोलायला लागून त्यांनी कधीतरी मुलीऐवजी तिच्या आईला 'आय लव्ह यू' म्हणलेलं असतं...
९. त्यांची मर्जी, त्यांचा ब्लॉग, त्यांची कविता... वाचायची तर वाचा किंवा फुटा... कुणी सक्ती केलेली नाही...
१०. कुठल्याही...? कितीजणींचा अनुभव गाठीशी आहे...? ५-१०-१५-२०...? आणि एवढ्याशा अनुभवावरून समस्त महिलावर्गाबाबत तुम्ही मत कसं बनवू शकता...?

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
>>. अमेरिकेतून खचाखच भरुनच आलेला असतो की तो डोकावणारच मग.

२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
>>. कुत्र्या मांजरांवर प्रेम करित असतील बकर्‍या कोंबड्यांवर नाही

३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
>>. वरुन उघडे व्हावे म्हणून असेल कदाचित.

४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
>>.जे अभ्यास करायचा नाटक करुन, शाळेच्या पुस्तकात अर्धनग्न ललनांचे फोटो ठेऊन बघतात, पण चेहर्‍यावर अभ्यास करतोय असा भास आणतात. असाच काही प्रकार आहे हा.

५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
>>. काही नाही. बोलण्याचे नाटक करुन रांगेमध्ये घुसला होता तो आणि तुम्हाला कळलच नाही (जरा माणसं ओळखायला शिकावे)

६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
>>.कशी असेल? कोण कधी पिणार कसे सांगता येईल. जो ज्या date ला पिणार ती त्याची expiry date.

७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
>>तोंडाला स्कार्फ बांधने याचे कारण 'नाव सोनुबाई हाती कथिलेचा वाळा' असे असेल, आणि प्रदुषणा बद्दल बोलायचे झाल्यास त्रास पुरुष वर्गाला होत नाही कारण पुरुषां च्या नाकात केस शाबुत आहेत त्यामुळे धूळ शरिरात जात नाही, पण मुलीचे सगळे चकाचक..............

८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
>>.ज्यांना अपल्यावर भरोसा नाही तेच विचारतात.
९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
>>. मला वाटते अन्नु मलिक या प्रश्नाचे सविस्तर आणि अचूक उत्तर देऊ शकेल.

१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?
>>. किरुचे उत्तर पटले (१००% बरोबर) ते propose कोण करतोय त्यावर अवलंबून असतं.

*****************************
वायरसमुळे एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येत आहे
क्षमा असावी यात कोणालाही त्रास देण्याचा हेतु नाही

अरे वा!! पुष्कळ जणांनी उत्तरे दिलीत की.. चलो प्रविण..तुम्हाला आता आणखी प्रश्न पडू देत.. तुला पण एक प्रश्न विचारू का.. तू ऐसा क्यूं है.?. तू ऐसा क्यूं है !!!