महाराज - हे काय प्रधानजी आज आम्ही आलो तरी आपलं लक्ष नाही
प्रधान - माफ करा महाराज डोक्यात पेपर होता
महाराज - काय ?
प्रधान - पेपरात डोक होतं
महाराज - आज आमच्या आधीच आपण पेपर वाचताय
प्रधान - हो, कारण आज आपण आमलेट खाता खाता रमलात आणि `आम' जनतेला विसरून'`लेट' झालात
महाराज - आम्ही महाराज आहोत ... थोडं मागे पुढे होणारच
प्रधान - महाराज आपल्या ह्या मागे पुढे करण्यामुळे, होण्यामुळे ... जनतेचे टाईम टेबल विस्कटतयं त्याचं काय
महाराज - अस्सं झालं तरी काय ... भुकंप झाला की आभाळं कोसळलं.
प्रधान - ह्यापेक्षा ही भयंकर ... महागाई आभाळाला भिडलेली होतीच, आता ती आभाळ फाडून वर गेली. पगारवाढ रोडावलेय, इंधन दरवाढ मारूतीच्या शेपटीसारखी लांब लांब होतेय. टॅक्सी, रिक्षा बघितली कि गरीबाचा खिसा थरथरतोय आणि बिचारा दमला भागला जीव मिळेल त्या बसला लोंबकोळतोय. त्याचं ही तिकीट दर वाढणार म्हटल्यावर .... माणसाला तंगड्या तोडतच घर गाठावं लागणार.
महाराज - प्रधानजी, चालण्याचा व्यायाम चांगला असतो.
प्रधान - महाराज, हे तुम्ही बोलताय. काल जेवल्यावर शतपावली म्हणून राजवाड्याच्या गेटपर्यंतच गेलात आणि तुम्हाला धाप लागली .... तिथेच फतकन मारून बसलात ... शेवटी सेवकांकडून पालखी मागवलीत, आणिवाड्यात परत आलात.
महाराज - ते अचानक आमची प्रकृती खराब झाली.
प्रधान - तुमची अचानक तब्बेत खराब झालेय ... पण गेले काही दिवस राज्याची तब्बेत बिघडलेय त्याचं काय.
महाराज - हवामान बदलेलं तशी ... राज्याची तब्बेत पण सुधरेल की.
प्रधान - महाराज, जो पर्यंत राजदरबारी लोकं जातीने जनतेकडे लक्ष घालीत नाहीत तोपर्यंत राज्याची तब्बेत सुधरेल असं मला तरी वाटत नाही.
महाराज - मग आता ह्या क्षणी आम्ही काय करायला हवं.
प्रधान - वाढत्या महागाईला आळा घाला. आतापर्यंत सर्वसामान्य माणूस वडा-पाव तरी सुखाने खात होता तो ही आता महाग झालाय.
महाराज - काय ? वडापाव सुध्दा महाग झाला. का ?
प्रधान - कारण रॉकेल, गॅस, जीवनावश्यक ज्या ज्या म्हणून गोष्टी आहेत ते ते सर्व महाग झालं म्हणून
महाराज - ठीक आहे. प्रधानजी आम्ही जातीने लक्ष घालून यावर तोडगा काढू. तुर्तास ...
प्रधान - तुर्तास काय महाराज ...
महाराज - आमचं भविष्य वाचून आम्हाला सांगा `आजचा दिवस' आम्हाला कसा आहे. दिवस चांगला असेल तरच आम्ही ठोस पावलं उचलू. कितीही झालं तरी हा जनतेचा प्रश्न्न आहे. आणी आम्हाला तो सोडवावाच लागेल.
प्रधान - वा !! महाराज ३ रुपयाच्या पेपरात तुम्हाला तुमचं भविष्य कसं आहे हे कळणं फार महत्त्वाचं वाटलं ....
महाराज - अर्थात ... शेवटी निर्णय आम्हाला घ्यायचाय काय ? वाचा भविष्य वाचा.
प्रधान - आजचा दिवस छान आहे. पण आज शक्यतो ... प्रवास टाळा. आज उत्तम मेजवानीचा दिवस आहे. तेव्हा त्याचा आस्वाद घ्या.
महाराज - पाहीलतं ... प्रधानजी. आमची इच्छा असूनही आम्ही जनतेचा प्रश्न्न सोडवू शकत नाही. तेव्हा जा. आपल्या आचारीला आज आमच्यासाठी गावठी कोंबडी आणि वड्याचा बेत करायला सांगा. उगाच भविष्य चुकीचं ठरायला नको. काय ?
प्रधान - जी महाराज.
महाराज - आणि हो ... दरबार आज बंदच ठेवा
प्रधान - पण सगळे आता येतीलच महाराज
महाराज - सांगा, महाराजाची तब्बेत ठीक नाही. उद्या भेटू
प्रधान - आणि जनतेचे प्रश्न्न, तक्रारी त्यांची गार्हाणी
महाराज - ते तर पहिले सोडवायचे ... उद्याचा पेपर आला की माझं भविष्य वाचून ठरवू, काय ?
प्रधान - पण मला कळलयं येत्या ५ तारखेला जनतेने महागाई विरोधात देशव्यापी बंद पुकारलाय.
महाराज - अरे वा !! मग चांगलचं आहे. ते तरी हक्काने आराम कधी करणार. वा, खरचं मला आवडला जनतेचा निर्णय. ग्रेट
- देवनिनाद
ओ बापरे.. भारतीय जनतेचे हाल
ओ बापरे.. भारतीय जनतेचे हाल सुधारायाऐवजी दिवसेंदिवस बिघडतच चाललेत..
कालच न्यूज पाहून कळले..
महागाईला आळा घालणारा एखादा
महागाईला आळा घालणारा एखादा भस्मासूरी उपाय यावा.
तिकडे ओबामा अन मनमोहनसिंग ऐकमेकांवर स्तुतीसुमने उधळत आहे. मंदीच्या काळात मोलाची मदत झाली मनमोहन सिंग यांच्या आर्थिक परीक्षण अभ्यासाची. पण इथे ज्याची जळती ना त्यालाच कळते. 
मस्त लिहीलयंस रे ! म्हणजे
मस्त लिहीलयंस रे !
म्हणजे महाराज आणि प्रधानजींच्या चर्चेतून निष्पन्न काय झालं ..... काहीच नाही .... पण त्यांनी आज जनतेबद्द्ल चर्चा केली ना ..... जनतेच्या अवस्थेबद्दल त्यांना खरचं किती कळकळ वाटतीये ते दिसलं ना आपल्याला ....... आणि अशाच चर्चा continues ... .... .....
हे वाचून परवाच्या पेपरमधली बातमी आठवली .... पेट्रोल, डिझेलचे आणि गॅसचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढणार .... जनता त्रस्त !!! .... आणि दुसर्या दिवशी पेपरमध्ये बातमी होती .... खासदारांची पगारवाढीची मागणी .... १६,०००/- रुपयावरुन त्यांचा पगार आता ८०,०००/- रुपये केला जाणार.
.... वाईट वाटतं ....
.... संताप होतो ....
.... पण नाईलाज म्हणून परत 'आम' आदमी गप्पच ....
सही ना एकदम !
यस. अमोल अगदी बरोबर. पेपर
यस. अमोल अगदी बरोबर. पेपर चाळता चाळताच सुचलं आणि पोस्टवलं. फू बाई फू च्या लिखाणात बिझी होतो. त्यामुळे बरेच दिवस मा.बो. वर काही लिखाण झालं नव्हतं. म्हटलं चला आजचा दरबार हे नवं सदर सुरु करतोय.
फू बाई फू चा ही लिंक यु ट्युबवर पाहा. कदाचित, याआधीच पाहीला असाल ही असो.
http://www.youtube.com/watch?v=c40ppoNmIW4
वर्षा, सुर्यकिरण, अमोल आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!
निनाद पाहिला व्हिडीओ .... लै
निनाद पाहिला व्हिडीओ .... लै भारी !
मस्त लिहिलय... काही झाल तरी
मस्त लिहिलय...
काही झाल तरी 'आम' आदमी गप्पच ....
अरे व्वा... फू बाई फू चे लेखक