काव्यधारा

चारोळ्या

Submitted by राजकमल on 10 January, 2010 - 21:50

माझ्या प्रितिच्या फुलपाखरा
तु कोठे उडत आहे
एकदा येवुन बघ येथे
तुझ्या साठी मी रडत आहे.

तुझ्यासाठी मन माझे
खुप जळत आहे
तुझ्या विरहाच्या गज-यात
आठवणीची फुले माळत आहे.

आज तु माझी नाही
हे मला कळत आहे
तरीही तुझ्यासाठी
मन खुप जळत आहे.

तुझ्या संगतीविना मि
किती दिन आहे
तुझ्यासाठी मरणे सोपे होते
तुझ्याविना जगणे कठीण आहे.

तुझ्या आठवणीत मि
पारव्या सारखा झुरत आहे
लोक समजतात जिवंत पण
मि रोज रोज मरत आहे
(राजकमल)
रतन इंगोले

गुलमोहर: 

स्वागत नववर्षाचे

Submitted by विप्रा on 31 December, 2009 - 08:51

मित्रहो !

दुसर्‍या महायुध्दानंतर
जाणिव झालेल्या महागाईने
आतापावेतो -
अनेक आसमानं गाठली.
आसमानांची उंचीही वाढली
आता ती -
मोकाट महागाई झालीय.
असू द्या , शब्द्च अपुरे आहेत.

आता सरली
नऊ वर्षे तिसर्‍या सह्स्त्रकाची.
सरत्याला निरोप देताना
आठवायच ते -
मंगल , पवित्र शुचीर्भूत अन ...
फक्त चांगलच.
चांगलच आठवून
चांगलच करण्यासाठी अन
चांगल्याच्याच अपेक्षेने
चांगल्या जाणिवा घेऊन
नव्या उमेदीने
जायचं नव्या वर्षात.

गुलमोहर: 

ने मजसी ने परत मातृभूमीला

Submitted by प्र-साद on 22 December, 2009 - 03:21

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या ' ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला.. ' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण झाली.

शंभर वर्षानंतर आजही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात आणि आत खोल कुठेतरी प्रेरणेचे स्फुल्लिंग जागृत करतात. ब्रायटनच्या किना-यावर चिंतन करत असताना, तात्यारावांच्या मनात आत मातृभूमीची ओढ लागली होती. त्या भावनावेगातच त्यांना हे उत्कट काव्य स्फुरले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र निरंजन पाल होते.

गुलमोहर: 

पुन्हा एकदा, एक कडवे द्या; एक कडवे घ्या.

Submitted by paresh_mahamunkar on 25 September, 2009 - 09:35

मित्रांनो, पुन्हा एकदा तोच खेळ खेळुया. मि दोन ओळी देत आहे.
-----------------------------------
-----------------------------------
मिच मांडीला डाव
मिच फेकिले फासे....

गुलमोहर: 

एक कडवे घ्या...एक कडवे द्या... !!

Submitted by विस्मया on 20 September, 2009 - 07:37

एक कडवे देत आहे... या ओळींच्या अर्थाबरहुकूम पुढचे कडवे कुणी लिहू शकेल का ?

बघा ना प्रयत्न करून.. वेगवेगळ्या शैलीतल्या कडव्यांची एक माळ बनवूयात का ?

===========================================

पहाटे पहाटे ओघा'ळते ओले दव
रेंगा'ळते ओठांवर कशी, दुखरी ही चव
गेली लाजवून रात, शोधी उषेचा आडोसा
घनविरघळ होई , सोडी उर्ध्वित उसासा ..

Maitreyee Bhagwat

गुलमोहर: 

संदेश

Submitted by bjsinare on 5 June, 2009 - 06:46

"मावळतीचा सूर्य पाहतो परतीची पाखरे,
क्षितीजापाशी तुला दिली मी अंतरीची हाक रे..
साक्ष तयाची सुरम्य करते आपुल्या अवचित भेटी,
संध्याछाया असेल जेव्हा सदैव अपुल्या साठी.."

गुलमोहर: 

नवरसरंग - काव्यमहास्पर्धा - 'करूण' रस

Submitted by सारंग भणगे on 29 May, 2009 - 12:57

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

पराकोटीच्या कारूण्याची परिसीमा असलेल हे ना. वा. टिळकांचं काव्यसुमन...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - काव्यधारा