Submitted by विप्रा on 31 December, 2009 - 08:51
मित्रहो !
दुसर्या महायुध्दानंतर
जाणिव झालेल्या महागाईने
आतापावेतो -
अनेक आसमानं गाठली.
आसमानांची उंचीही वाढली
आता ती -
मोकाट महागाई झालीय.
असू द्या , शब्द्च अपुरे आहेत.
आता सरली
नऊ वर्षे तिसर्या सह्स्त्रकाची.
सरत्याला निरोप देताना
आठवायच ते -
मंगल , पवित्र शुचीर्भूत अन ...
फक्त चांगलच.
चांगलच आठवून
चांगलच करण्यासाठी अन
चांगल्याच्याच अपेक्षेने
चांगल्या जाणिवा घेऊन
नव्या उमेदीने
जायचं नव्या वर्षात.
२०१०
सुख समाधान सुरक्षा
या त्रिवेणी संगमात न्हाऊ घालो हि मनोमन ईच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे.! तुम्हास पण तिसर्या
छान आहे.!
तुम्हास पण तिसर्या सह्स्त्रकाच्या उरलेल्या
९१ वर्षाच्या एकाचवेळी अनंत हार्दिक शुभेच्छा.!!
धन्यवाद. कविता छान
धन्यवाद. कविता छान आहे.
आपणांसही हे नववर्ष सुखसमाधानाचे, आरोग्यदायी जावो, हि सदिच्छा.