एक कडवे घ्या...एक कडवे द्या... !!

Submitted by विस्मया on 20 September, 2009 - 07:37

एक कडवे देत आहे... या ओळींच्या अर्थाबरहुकूम पुढचे कडवे कुणी लिहू शकेल का ?

बघा ना प्रयत्न करून.. वेगवेगळ्या शैलीतल्या कडव्यांची एक माळ बनवूयात का ?

===========================================

पहाटे पहाटे ओघा'ळते ओले दव
रेंगा'ळते ओठांवर कशी, दुखरी ही चव
गेली लाजवून रात, शोधी उषेचा आडोसा
घनविरघळ होई , सोडी उर्ध्वित उसासा ..

Maitreyee Bhagwat

गुलमोहर: 

स्वप्ने अजून डोळ्यात, दिसे उभा दिस
ओलांडून सीमा, उषा येई परसात
किरण क्षणांचे पसरी नवऊर्जा मनात
खाद्य विचारांचे मिळे होई सकाळ चविष्ट

*********************
रात सरली तरी रेंगाळती अनुभव
भावमग्न होई .. हे श्वासांचे गुंजारव
देवुन कोण गेले तॄषा अन भरोसा
तॄप्त मी सर्वांगी..घेई अद्वैताचा कानोसा

**********************
बघा...जमलय का अन आवडत का ते Happy

एक रात्र दोन जीवांचा
मेळ लावण्यात जाते,
एक रात्र श्वासांचा
खेळ खेळण्यात जाते...

रात्रभर लाजवते गोठवते रात्र,
अन पहाट होता
स्वतः लाजुन
होते गलितगात्र...

तृषा ज्ञानाची तेजाचा जागर
विश्वास मनीचा उषेचा वावर
भावविश्व गोंजारीत किरणे सादर
धुंद मन घाली तनाला भुरळ

आर्द्र नयनांचे मन,कसे जाणिनाहो कोण,
सार्‍या रातीचा पसारा,दीस पडेनाहो चैन...
चंद्र-चांदणे तिथेच,वाट पाहती खुलून,
किती आठव आठव,पण येईना साजण...

लोकहो प्रत्येकाने नवा बिबि उघडून हा खेळ खेळण्यापेक्षा
http://www.maayboli.com/node/2640 इथे खेळा हा चारोळ्यांचा खेळ.
अ‍ॅडमिन ने इथे चारोळ्यांसाठी खास सोय केलेली आहे. Happy