त्याना एकच दिवस आई चा

Submitted by dollydot on 9 May, 2009 - 23:44

आपण तर रोजच आई ग म्हणतो, काय ?

गुलमोहर: 

खरं आहे. पण ते म्हणजे आईला गृहित धरणे असते. काही झाले तरी आई असणार आहे फुंकर घालायला, जवळ घ्यायला, क्षमा करायला ही भावनाच आपण बाळगतो. त्या आपल्या आईलादेखील आपल्या जिव्हाळ्याची गरज असते, तिलाही आपलं लेकरू 'आई' म्हणत, कधीतरी का होईना, आपल्या पोटाशी यावं ही अपेक्षा असते आणि त्यात तिला आनंद मिळू शकतो हे आपण विसरतो. विवाहा नंतर किती जण ही तिची माफक अपेक्षा पुरी करतात? मुलाने आपले आभार मानावेत अशी इच्छा कुठलीच आई करत नाही. पण ते जर मुलाने केले तर तिला मनोमन आनंद जरूर होईल. आयुष्यभर तिने मुलाला भरभरून दिलेले असते मग एक दिवस आवर्जून मुलाने काही दिले, कृतज्ञता व्यक्तवली, तर तिला आनंद का होणार नाही? हा मानवी स्वभावधर्म नाही का? मला वाटते 'त्यांना एकच दिवस आईचा' म्हणून 'मदर्स डे' ला 'अकारण' ठरवणे थोडे चुकीचे ठरेल. निदान त्या एका दिवशी तरी तिचं मन भरून येईल इतकं समाधान, आनंद तिला मिळेल अशा जाणिवेने तो दिवस तिच्यासाठी म्हणून डेडिकेट केला तर थोडं का होईना, उतराई झाल्याचं समाधान मुलालाही मिळेल.

मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com