ललित

सहप्रवास २

Submitted by भारती.. on 12 July, 2012 - 12:33

http://www.maayboli.com/node/36306
सहप्रवास-२

( कॉलेजचा एक छोटासा हॉल-वातावरणात अर्थातच यौवन,अदम्य उत्साह आणि जरा जास्तच मात्रेतला आत्मविश्वास-खुर्च्यांची आता कोंडाळी झालीयेत-अंतराअंतरावर चर्चा,गप्पांचे अड्डे-एक छोटंसं स्नेहसंमेलन आत्ताच संपल्याचे संकेत.)

मीनू- एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही उमा.तुला आठवतं,इथे शेवटी भेटलो होतो तेव्हा तूच म्हणाली होतीस्,पुनः फिरून इथं यायचं नाही खूप काळ.वर्षानुवर्षे.

उमा-हो आठवतं ना.आणि त्याच्यामागे कुठेतरी पु.शि.रेगेंची सावित्री होती मीनू.तिनेच म्हटलं होतं ना की काही घटना सारख्या मनात हाताळायच्या नसतात.त्यांचे रंग फिके होतात त्यामुळे!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बोम दिया अंगोला - भाग १

Submitted by दिनेश. on 12 July, 2012 - 08:39

अंगोला ला यायचा निर्णय घ्यायला मी बराच वेळ घेतला. आफ़्रिकेला तसा मी नवा नाही.
चांगली ८ वर्षे काढलीत या खंडात. पण इथला प्रत्येक देश वेगवेगळा. भारताप्रमाणेच
युरोपीयन वसाहतवाद्यांनी विस्कटून ठेवलेला. आता आता कुठे जरा हे देश सावरायला
लागले आहेत.

यातले बहुतांशी देश, निसर्गसंपन्न आहेत, पण त्या साधनसंपत्तीचा योग्य तो उपयोग
करुन, देशांचा सर्वांगीण विकास करणारे नेतृत्व त्यांना लाभलेले नाही. जिथे नैसर्गिक
साधनसंपत्ती आहे तिथे आताआता कुठे प्रगतीचे वारे नव्हे तर झुळूक यायला लागली
आहे.

इजिप्त ला पुर्वापार पर्यटकांचा राबता असतो. पण त्यापेक्षा सुंदर पिरॅमिडस असूनही,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दैवी ठेव

Submitted by bnlele on 12 July, 2012 - 07:11

काळ्या-काळ्या ढगातून आवाज येतो-
उद्यापरवा थोडा देतो, माझ्याकडेपण तुटवडा !
गुंतविला परग्रहांतील बॅंकात !
भरमसाठ टॅक्स अन्‌ टीडीएस पण कापत नाहीत,
भूतलाचा स्वर्ग तिथे - मिळतो मानाचा मुजरा,
इथे सगळा घोळ - नाल्यांतून कचरा !
गुदमरतो जीव - घशात , प्लास्टिक-रसायनाच बूच !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'ट्रिव्हिअल रिलेशन' - दया

Submitted by बेफ़िकीर on 11 July, 2012 - 03:47

"गाजराचा ज्यूस प्यायला की डोळे छान होतात"

माझ्या आतड्यांचा पीळ सुटून एक हासण्याची खदखद माझ्या घशापर्यंत पोचली आणि चहाच्या घोटाबरोबर मी ती गिळताना खोकला आल्यासारखे दाखवले आणि खूप खोकून घेतले.

दया मोसंबी ज्यूसच्या प्रवाहात एक तंगडी अडकून पडलेल्या स्ट्रॉचे दुसरे तोंड स्वतःच्या ओठांनी दाबून फुर्र फुर्र करत माझ्याकडे अभ्यासू नजरेने पाहू लागली. मग मीही हासण्याची उबळ दाबली आणि चहाकडे लक्ष दिले.

"हसू येतंय का?"

"का?"

"नाही... मी काही बोलले की तू त्सुनामी यावी तसा हासतोस"

"ह्यॅ... काहीही.. "

"ऐक ना! वटवाघुळे उलटी का लटकतात माहितीय का?"

"ज्यूस संपलंय तुझं"

गुलमोहर: 

नभनाट्ट्याचा थरार

Submitted by bnlele on 6 July, 2012 - 04:50

काल विश्वात शुक्र आणि सूर्यानी घडवला तो थरार प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही.
नासानी केली भरपाई आणि टीव्हीवर दाखविलेल्या फिति बघता आल्या.
जगातल्या विभिन्न देशांमधे वेगवेगळ्या रंगाचा सूर्य दिसला- कुठे हिरवा तर कुठे लाल,
शेंदरी,धुरकट पांढरा, निळा,पिवळा असे अनेक रंग !
कुठे तो लाल-काळ्या चट्ट्यांनी वेढलेलाही दिसला, किंवा त्य्यावर काळे डाग दिसले.
भारतात मात्र काहीच जागी ढगांतून डोकावला- धुरकट आणि काळा डाग असलेला.
ती दृष्य बघताना विविध रंग आपल्याकडे दिसले नाहीत याची खंत होती-- पण ...
एका क्षणात, कां घडल असं याचा खुलासा पण चमकला.

गुलमोहर: 

फ्लेक्स थीम पार्क!

Submitted by फारएण्ड on 5 July, 2012 - 05:55

पुणे अचानक फ्लेक्सविरहीत झाल्याने जनतेत एकदम गोंधळ निर्माण झालेला आहे. एकतर कोण थोर नेत्यांचे वाढदिवस आहेत, कोण कोणाचे प्रेरणास्थान, स्फुर्तीस्थान आहे, कोणाची कोणत्या समितीवर निवड झाली वगैरे मौल्यवान बातम्या मिळत नाहीत. अचानक काही स्पर्धा घोषित होउन काही नेत्यांची नावे त्यासंबंधीच्या फलकात दिसू लागली आहेत पण त्यात रंगीतसंगीत फ्लेक्सची मजा नाही. त्यामुळे गॉगल घालून, दाढ्या वाढवून, फेटे बांधून, बीयर गाल वाढवून, गंध लावून स्वतःचे फोटो काढणार्‍यांचीही संख्या कमी झाली आहे. तसेच कोठेतरी जाताना कार्यकर्त्यांना हात दाखवत असलेल्या पोजमधलेही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गोष्ट चांदण्या नगरीची.

Submitted by सुधाकर.. on 3 July, 2012 - 14:26

रात्रीच स्वछ निळं, पारदर्शी आभाळ. एका दुरवरच्या पोकळीतील उच्चश्राव्यावरून एक प्रखर चांदणी, आपली अलगद पावले टाकत स्थिरपणे खाली उतरते. तिच्या पाठी तिच्या शुभ्र वस्त्रांचा घोळ अस्थिरपणे थरथरत पायर्‍यांवरुन खाली सरकतो. तिची ही वस्त्रे विजेच्या तारांप्रमाणे शुभ्र- प्रखर असली तरी तिच्या डोळ्यात मात्र खोल कुठेतरी सांजेचा निस्तेजपणा आहे. मन व्याकुळ करणारा. ती नभोमंडपातील इतर तारकांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागते. इतर तारकां ही तिला वाट करुन देतात. ती चांदणी मधेच एकदम थांबुन भिरभीर नजरेनं सगळीकडे पहाते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जत्रा

Submitted by आशूडी on 2 July, 2012 - 06:12

दर आषाढी एकादशीला आमच्या गावाचा उरुस असतो. आमचं गाव म्हणजे विठ्ठलवाडी. म्हणजे त्या दिवसापुरतं तरी ते आमचं गाव असतं. एरवी सांगताना आम्ही झोकात आनंदनगर सांगतो. ते एक असोच. तर लहानपणी शाळेला सुट्टी असायची आषाढीला. पण आई बाबांना काय ती नसणार. म्हणजे घरात आम्ही तिघी, दोन आज्ज्या असा 'पाचा लिंबांचा पाचोळा!' शप्पत. आत्ता अचानक स्पष्ट जाणवलं, आम्ही तिघी लहान असू, पण आज्ज्या तर आई बाबानाही सिनियर होत्या. तरी आई बाबा नसले कि आम्हाला घर म्हणजे आपलंच राज्य वाटायचं. आज्ज्या आमच्या टीममध्ये असल्याने असं वाटत असेल कदाचित.

गुलमोहर: 

" सवारी "

Submitted by गारम्बीचा बापू on 30 June, 2012 - 23:49

" सवारी "

जुन्या वस्तू , जुने रेडियो , काय ते म्हणतात ना Antique, अश्या वस्तूंची मला लहानपणा पासून आवड, कॉलेज ला असताना इंटरनेट वर बसून दररोज जुन्या मोटरसायकल चे फोटो खूप आवडीने बघायचो , नंतर कॉलेज पूर्ण झालं नोकरीला लागलो, पण हे जुन्या मोटरसायकलचं भूत काय डोक्यातून कधी गेलं नाही, कंपनीत नाईट शिफ्ट असल्यावर इंटरनेट वर त्या जुन्या मिल्ट्री च्या मोटरसायकल बघायचो , जाम आवडायच्या त्या गाड्या .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तु - मि आणि सेल फोन

Submitted by स श्वेता on 29 June, 2012 - 15:25

आकाशतला चंद्र आज फारच छान दिसत होता मधेच येनारी थंड हवेचि झुळूक,मनाला हळुवार गार करत होती.बाहेरची थंड हवा अनि रजई ची उब,या बरोबर मनत आसंक्या फुलपाखरे उडत होती.

होतंच कहिस तसं, सुंदर स्वप्न तर मी नेहमीच पाहते पण ते पूर्ण होताना आज प्रथमच अनुभवत होते,मला हवा तसा जोडीदार मिळाला आणि आयुष्य अगदी बदलून गेलं.आत्तातरी मला मझ्या नशिबाचा हेवा वाटत होता. हसण्यासाठी आता कारणाची गरजा न्हवती...नेहमी कुणीतरी मोरपीस फिरवल्यासारखा भास होत असे आत्ता जरी हे खूप वेगळ वाटलं... तरी त्यावेळी खूपच साहजिक वाटत होत ..आणि सगळयान मध्ये असताना गोड आठवणीने येणारे हसू कसे लप्वावे हेच मोठे कोडे होते !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - ललित