अद्भुत

पद्मा आजींच्या गोष्टी २: ब्रम्ह देवाच्या गाठी

Submitted by पद्मा आजी on 6 February, 2016 - 11:50

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर.
माझ्या आधीच्या गोष्टीला ज्यांनी अभिप्राय दिले आणि मला उत्तेजन दिले त्यांचे मनपुर्वक आभार.

एकदा मी आणि माझ्या college च्या मैत्रिणी माझ्या अमरावतीच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात माझी आत्या - आवडाबाई - आली आणि ती पण आम्हाला सामील झाली. आम्ही एका मैत्रिणीच्या लग्नाविषयी बोलत होतो. तेव्हा आत्याने मला म्हटले तुला तुझ्या आईच्या लग्नाची गोष्ट माहिती आहे का? सगळ्यांनी उत्सुकता दाखवल्यावर तिने गोष्ट सुरु केली.

विषय: 
प्रांत/गाव: 

पद्मा आजींच्या गोष्टी १ : आत्या आणि पाऊस

Submitted by पद्मा आजी on 3 February, 2016 - 11:34

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर. हि माझ्या आत्याची -- आवडाबाईची गोष्ट.

तशी माझी आत्या काही शिकलेली नव्हती फारशी. पण वाचू शकत होती ती. आयुर्वेदाची तर फार औषधे माहिती होती तिला. तर्हेतर्हेची औषधे ती सांगायची. वेळोवेळी आम्हाला बरे करायची औषधे देऊन. औषधाबरोबर काहीतरी मंत्र पठन चालायचे तिचे -- जरा कोडेच होते आम्हाला. तिच्या अनेक गोष्टी आहेत पण प्रामुख्याने मला जिने विचार करायला लावला तीही गोष्ट.

विषय: 
प्रांत/गाव: 

गूढ कथा: "कालग्रहांचे भविष्य आरसे" (संपूर्ण कथा - ६ भाग एकत्र)

Submitted by निमिष_सोनार on 3 October, 2010 - 22:14

सूचना:
[यापूर्वी ही कथा सहा भागात मी क्रमशः प्रसिद्ध केली होती.
वाचकांच्या सोयीसाठी आणि सलग वाचनाचा आनंद मिळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कथा आता सलग एकत्रीतरित्या

प्रसिद्ध करतो आहे.]
-----------------------------------
गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे!!!
--The Fortune Mirrors of Time Planets!!!
-----------------------------------

ही कथा सुरु होते २०२२ साली
दि. २२/०२/२०२२-
मंगळवार-
वेळ सकाळी चार
मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता
वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.

गुलमोहर: 

स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

Submitted by निमिष_सोनार on 9 August, 2010 - 12:29

चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!

चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...
ओंजळ भरून!

महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!

महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!

बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!

चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!

ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!

उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अद्भुत