दिर्घकथा

अधांतरी

Submitted by मोहना on 3 February, 2012 - 11:36

"पाच मिनिटात निघू" पर्स खांद्याला अडकवत सविताने गाडीच्या किल्ल्या विनयसमोर नाचवल्या.
चहाचा घोट घेत विनयचे डोळे टी. व्ही. वर खिळले होते.
"तू ऐकतोयस का? "
वाफाळलेल्या कपातून घोट घेत त्याने तिच्याकडे पाहिलं.
"तू ऐकतोयस का असं विचारलं मी. "
"नाही"
"नाही काय? टी. व्ही. नंतर बघता येईल. "
"बातम्या ऐकायचा प्रयत्न करतोय. "
"असं काही विशेष घडलेलं नाही. दिवसभर तेच तर ऐकवतात. नंतर ऐक. दिवस रिकामा असतो तुला. " विनयच्या कपाळावर आठी उमटली.
"तू ठेवू देतेस का दिवस रिकामा? " चढ्या आवाजात त्याने विचारलं.
"नाही ना, दिला तर नुसत्या झोपा, खाणं आणि टी. व्ही. एवढंच करशील तू. "

गुलमोहर: 

गूढ कथा: "कालग्रहांचे भविष्य आरसे" (संपूर्ण कथा - ६ भाग एकत्र)

Submitted by निमिष_सोनार on 3 October, 2010 - 22:14

सूचना:
[यापूर्वी ही कथा सहा भागात मी क्रमशः प्रसिद्ध केली होती.
वाचकांच्या सोयीसाठी आणि सलग वाचनाचा आनंद मिळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कथा आता सलग एकत्रीतरित्या

प्रसिद्ध करतो आहे.]
-----------------------------------
गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे!!!
--The Fortune Mirrors of Time Planets!!!
-----------------------------------

ही कथा सुरु होते २०२२ साली
दि. २२/०२/२०२२-
मंगळवार-
वेळ सकाळी चार
मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता
वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दिर्घकथा