मायबोली गणेशोत्सव २०१६

कुलुपबंद (प्रकाशचित्रांचा झब्बू - ४) - समाप्त!

Submitted by संयोजक on 13 September, 2016 - 21:01

घराच्या आणि संगणकाच्या खिडक्यांना, मोटारीच्या आणि उद्वाहकाच्या दाराला, सामानाच्या बॅगेला आणि गोंधळ घातल्यावर धाग्याला काय लावतात? तर, कुलूप.
अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे इथे एकत्र करूया.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध गोष्टींना लावल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.

विषय: 

रंगावली श्रीगणेश - निर्मल

Submitted by निर्मल on 13 September, 2016 - 13:58

खूप दिवसांनी केलेला रांगोळीचा प्रयत्न रंगावली उपक्रमानिमित्ताने !!!

IMG-20160913-WA0004.jpg

विषय: 

रंगावली श्रीगणेश-साक्षी

Submitted by साक्षी on 13 September, 2016 - 12:52

ऑफीसमधे या वर्षी स्पर्धेसाठी काढलेली रांगोळी
IMG_20160910_135358.jpg

खेळ'कर बाप्पा - नाव : सान्वी वय : ६ वर्षे

Submitted by डॅफोडिल्स on 13 September, 2016 - 12:42

सान्वी ला दोन्ही चित्रे रंगवायला आवडली. सिन्धू गणेश आणि साक्षी गणेश नावंही आवडली.

बाप्पा शर्ट घालतच नाहीत मग काय करणार ? मोठ्ठा प्रश्न होता Lol

बाप्पा बाप्पा आहे तोच सगळ्यांना मेडल्स देतो म्हणून त्याला गोल्ड मेडल्स Happy

विषय: 

मायबोली मास्टरशेफ - बदाम - मॅकाडेमिया ब्रेड अर्थात LCHF ब्रेड - नलिनी

Submitted by नलिनी on 13 September, 2016 - 09:52

ह्या उपक्रमाची घोषणा झाली तेव्हाच ठरविले की ह्यावेळी नक्की सहभागी व्हायचे. म, ब, य, ल ह्या घटकांमुळे पर्याय तसे कमीच उपलब्ध होते.

मी सध्या LCHF डाएट करत असल्याने मलाही चाखता येईल असा पदार्थ हवा होता. मैद्याला पर्याय म्हणून बदाम पावडर वापरून बरेच पदार्थ करता येतात पण त्यात अंडी मुख्य घटकांमध्ये येतं. इथे ते वापरता येणार नसल्याने स्वत: प्रयोग करून पाहायचे ठरविले.

साहित्यः

बदाम पावडर : २०० ग्रॅम

मॅकाडेमिया पावडर : १०० ग्रॅम

लोणी : ५० ग्रॅम

यिस्ट : १/२ टिस्पून

बेकिंग पावडर : १/४ टिस्पून

विषय: 

खेळकर बाप्पा - रेयांश- वय पावणेसात वर्षे

Submitted by स्वस्ति on 13 September, 2016 - 01:36

ganapati11.jpgganapati22.jpg

आता तुम्ही विचाराल ( विचारणार नसाल तरी सांगते , ) की बाप्पाचे कान वेगळे का दिसतायेत ??

"मम्माSSSSSSSSSS , बाप्पाचं डोक एलिफन्ट च असतं ना . मग ते तसं दिसायला नको का? एलिफन्ट चे कान असेच असतात ना , ग्रे अ‍ॅण्ड पिन्क .एक्दम रिअल वाटतायेत ना . "

आता त्या लॉजिकने बाप्पाचं तोंड पण ग्रे असायला हवं ना , हा प्रश्न मी मनातच दडपला . वाद घालून सांगतेय कोणाला ??

विषय: 

'अक्षरगणेश' - श्रीशैल - वय: ८ वर्ष

Submitted by इंद्रधनुष्य on 13 September, 2016 - 01:00

अक्षरगणेश ही संकल्पना समजवून सांगण्यासाठी मी 'श्रीशैल' हेच नाव त्याला काढून दाखवलं. श्रीशैलचा हा पहिलाच प्रयत्न असल्या मुळे फ्री हॅण्ड स्ट्रोक फारसे जमलेले नाहीत.

संपादित

Submitted by फेरफटका on 12 September, 2016 - 11:04

संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित, संपादित

विषय: 

'अक्षरगणेश' - अद्वैत पेंडसे

Submitted by हर्पेन on 12 September, 2016 - 00:50

'अक्षरगणेश' - पाल्याचे नाव - अद्वैत आणि वय - ११.

प्रयत्न जमलाय का ते कळवा. कृपया धन्यवाद __/|\__

MABO Ganesh2016.jpg

विषय: 

कोकणातलो गणपती २०१६

Submitted by Yo.Rocks on 11 September, 2016 - 13:49

प्रचि १ : कोकणात गणपतीला जाताना रेल्वेने जाण्याची मजा काही औरच आहे.. मग रिजर्वेशन असो की सामान्य डब्यातून प्रवास...

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१६