मायबोली गणेशोत्सव २०१६

संगीतक हे नवे - रिक्शावाला आणि मी!

Submitted by सोनू. on 10 September, 2016 - 14:52

या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
जावे कसे काम करण्यास आता
पहावे कुठे एक रिक्षा जुनी

तितक्यात भरधाव धाऊनी आली
पॉ पॉ करूनी रिक्षा कशी
साशंक मन हे आनंदी झाले
परी आज ये भूवरी ही जशी

आर्जवी होवोनी मी त्यास पुसले
नेशील का रे इच्छीत स्थळी
देईन तुजला योग्य ती बिदागी
निघू लवकरी वेळ नाही मुळी

मुर्दाड स्वरात तो मजसी वदला
मार्ग माझा वेगळाला असे
वाहन तुम्ही दुसरे पहावे
वेळ ना मज मी जातो कसे

म्हटले तया का हो निष्ठूर होता
असे आडवाट अन् वाहनेही कमी
उशीर होईल कामास जाण्या
दुजी मिळेल रिक्षा ही नाही हमी

परोपरी मी विनविले तयासी
देईन पैसे ज्यादा ही मी

विषय: 

मायक्रोफोटोग्राफीचे अद्भुत विश्व - आंबोली - लेखक : कांदापोहे

Submitted by संयोजक on 10 September, 2016 - 14:11

मायबोलीकर विविध क्षेत्रांत पारंगत आहेत, हे आता आपण सगळे व्यवस्थित जाणतोच. आपल्या सर्वांनाच त्यांच्या क्षेत्रांबद्दल वाचायला, त्यांचे अनुभव ऐकायला आवडते. कांदापोहे हे मायबोलीकर नुकतेच 'मायक्रोफोटोग्राफी' करायला आंबोली या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आले. त्यांनी काढलेल्या फोटोंपैकी निवडक फोटोंचे हे फोटोफीचर आहे. संयोजकांच्या खास विनंतीला मान देऊन त्यांनी हे गणेशोत्सवानिमित्त आमच्याकडे सोपवले आहे. त्यांच्याच शब्दांत त्यांचा अनुभव आणि त्यांनी काढलेल्या सुंदर फोटोंचा आस्वाद, अशी दुहेरी मेजवानी मायबोलीकरांसाठी सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

'खेळ'कर बाप्पा - आर्या - ८ वर्ष

Submitted by स्निग्धा on 7 September, 2016 - 02:50

गणपती बाप्पा मोरया....

आमच्या बाप्पाने वाळे घातलेत बरं पायात Happy आपल्या मनाने काही तरी जास्तीच कराचचं असत नेहमी........
Bappa_Wrestling.jpgBappa-Badminton.jpg

विषय: 

संगीतक हे नवे( रिक्षावाला व मी)

Submitted by अश्विनीमामी on 7 September, 2016 - 02:42

सूत्रधारः

नमस्कार, आदाब, गुड मॉर्निन्ग.

तर रसिकहो. जमाना बदलला,
डायनासोर गेले डास राहिले.
पंत गेले राव गेले.
शुक्ल अन श्रिवास्तव आले.
थालीपीठ गेले अन बर्गर आले

एक उत्साही आवाजः हो वॉफल्स व क्रीम सुद्धा आले..

ट्रिंग ट्रिंग फोन जाउन स्मार्ट फोन आला.
नौवारी सहावारी पाचवारी ब्यागेत बंद झाले..

प्रेक्षकातून आडून आवाजः तरीही दुपारी दोन ते चार बंदच राहिले चितळे.

सूत्रधारः

हे बघा, नका करू युध्द सुरू
जीवनातला बारक्या लढाया जिंकून आम्ही
पुरून उरू.......

विषय: 

गणेश उत्सव आणि देखावे

Submitted by मध्यलोक on 6 September, 2016 - 06:38

गणेश उत्सव आणि देखावे ह्यांच्या संबंध ह्यावर्षी तब्बल १२५ वर्ष जूना होतोय. ह्या देखाव्यांनी काय नाही केले, समाज एकत्र आणला, इंग्रजाना पळवून लावले, मदत कार्य केले, मनोरंजन केले आणि अनेक विधायक कार्य केले त्यातीलच अजुन एक महत्वाचे कार्य म्हणजे समाज प्रबोधन.

झाडे वाचावा, पाणी वाचावा, पौराणिक ते वैज्ञाणीक, व्यक्ति विशेष, कधी शिक्षण तर कधी खेळ किती ही विविधता. यंदा ही असे अनेक विविधांगी देखावे आपल्याला बघायला मिळणार ह्याची खात्री आहे मला.

रंगावली श्रीगणेश - प्राजक्ता_शिरीन

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 6 September, 2016 - 01:33

८ X ८ ठिपक्यांची रांगोळी -

oie_uBiTIDHiGQsa.jpg

विषय: 

जगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त!

Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 00:40

जगाच्या पाठीवर मायबोली

मायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१६ - बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:51

मोदक, निवगर्‍या आणि वर तुपाची धार, गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, लाडू - पेढे, वडया, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वरणभाताची मूद, रंगीबेरंगी चटण्या-कोशिंबिरी, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर चटकदार वाटली-डाळ! गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं! मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांना वाटायची खिरापत काय तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

उंदीरमामाची टोपी हरवली..

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 14:58

उंदीरमामा इज बॅक!

रामराम मंडळी! आहे ना आठवण? मी उंदीरमामा. गेल्या वर्षी तुम्ही माझी टोपी शोधून देण्यात खूप मोलाची मदत केली. त्यामुळेच मला ह्या वर्षी पुन्हा धाग्यांवर जायचा हुरूप आला. अस्सल मायबोलीकरांनी ह्या वर्षीसुद्धा मला मदत करावी आणि त्यानिमित्तानं सुंदर धाग्यांचा प्रसाद आपल्या बाप्पांच्या चरणी अर्पण करावा, असं मला वाटतंय. मग करणार ना मला मदत? नियम गेल्या वर्षीचेच आहेत, तरी पुन्हा एकदा बघून घ्या बरं!

नियम -

१. ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची, म्हणजेच त्या धाग्याचं नाव, लिंक द्यायची.

संगीतक हे नवे - घोषणा

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 14:54

एकविसाव्या शतकातील
संवत्सर होते सोळा
उपक्रम हे निवडाया
संयोजक झाले गोळा

खलबते झाली अनेक
बातांच्या फैरी झडल्या
पाकृ, झब्बू, चित्रांच्या
कल्पना अनेक पडल्या

काव्य हवे, शास्त्र हवे
आम्हां विनोदही हवा
अनेक कटू रोगांवरची
तीच अक्सीर दवा

होई गणरायांचे आगमन
दृष्टीस हे सारे पडले
हसले सोंडेतल्या सोंडेत
आणि उच्च स्वरात वदले

"विनोदी लेखन नेमाने
असावे नित्य नवे नवे
नकोत नुसते संवाद
त्यात थोडे पद्यही हवे!"

आदिलेखकाचे ऐकून स्वर
मार्ग सुचला संयोजकांना
प्रसंग देऊ आपण काही
कल्पना सुचो लेखकांना!

आयुष्यात असे जरी
सक्ती तुम्हां गद्याची
आता मात्र गणेशाची
अट आहे पद्याची

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१६