कोकणातलो गणपती २०१६

Submitted by Yo.Rocks on 11 September, 2016 - 13:49

प्रचि १ : कोकणात गणपतीला जाताना रेल्वेने जाण्याची मजा काही औरच आहे.. मग रिजर्वेशन असो की सामान्य डब्यातून प्रवास...

मग दरवाज्यात बसून पाहत रहावे निसर्गाचे देखावे..
प्रचि २ :

प्रचि ३:

रेल्वेतून उतरलो की संबंध येतो लाल डब्याचा.. स्थानिक लोकांचीसुद्धा गणपती तोंडावर आल्यामुळे बाजारातून सामान गोळा करणे वगैरे घाईगर्दी सुरु असते...
प्रचि ४:

घरसुद्धा तोरणं, पताका लावून बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज...

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७: बाप्पा आले.. !

प्रचि ८: माटीयेच्या छताखाली बाप्पा विराजमान..

प्रचि ९ :

प्रचि१०: नैवेद्य

बाप्पा घरात आले की खाण्याची नुसती चंगळ...

प्रचि ११:

प्रचि १२: शिरवाळ्या.. !

प्रचि १३: वडे !

प्रचि १४: भजन- आरती करायला बाळगोपाळ नेहमीचे उत्साही..

प्रचि १५: बाप्पा चालले गावाला..

प्रचि १६:

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

पुढच्या वर्षी लवकर या.. _/\_ Happy

- - -- - -- --

यापुर्वीच्या लिंका Happy
कोकणातलो गणपती

कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो , ह्या वर्षी गावाला जाणं जमलं नाही म्हणून हुरहूर वाटत होती. ती मिटली तुझे फोटो पाहून . प्रत्यक्ष गेल्याचाच फील आलाय

सुंदर दर्शन, मी कोकणातलाच असलो तरी आजवर एकदाही गणपतीला गावी गेलेलो नाही, तुझे फोटो बघून अगदी तृप्त व्हायला झाले.

का कोण जाणे, पण प्रत्येक वेळा कोकणातले फोटो पाहुन असे वाटते की आपले काहीतरी चूकले आहे, किंवा काहीतरी कमी पडतेय. कारण प्रत्येक फोटोत ते जे अस्सल घरगुती वातावरण दिसतेय. तसे आपल्याकडे अनेक आरास करुनही निर्माण करता येत नाही. केळीच्या पानातला नैवैद्य, छान सारवलेली चूल, सुगरणीचा त्या पदार्थांना लागलेला हात. खूप काही सांगुन जाते, व मी कोकणातली नसुन सुद्धा मला हे फोटो पाहुन आतुन दाटल्यासारखे होते.

पुढचा जन्म कोकणातच दे रे बाप्पा.

प्रचि १७: मस्त composition.

प्रचि २०: अप्रतिम _/\_

कोकणातला निसर्ग हेंच बाप्पाने स्वत:च्या हंगामी निवासासाठी बनवलेलं एक मखर आहे !!
योगेश, सुंदर प्रचिंसाठी धन्यवाद.
<< पुढचा जन्म कोकणातच दे रे बाप्पा.>.> +१

_/\_ योगी, अतिशय प्र्सन्न वाटलं फोटो पाहून

कोकणातला निसर्ग हेंच बाप्पाने स्वत:च्या हंगामी निवासासाठी बनवलेलं एक मखर आहे !!>>>> खरय भाऊकाका

Pages