पाककृती स्पर्धा २: ओव्हरनाइट ओट्स ‘टेस्ट भी हेल्थ भी‘ - दीपांजली
‘चुल न पेटवता + पोटभर‘ म्हंटल्यावर डोक्यात आली ती माझी फेवरेट रेसिपी, ‘पोटभरीचे ओव्हरनाइट ओट्स !
रिच इन न्युट्रियन्ट्स आणि करायला प्रचंड सोपी : हाय इन प्रोटीन, फायबर्स, गुड फॅट्स, हेल्दी कार्ब्ज, ओमेगा थ्री , कॅल्सिअम , अॅन्टिऑक्सिडन्ट्स !
पोट तर इतक मस्तं तृप्तं होऊन भरतं, अगदी रेग्युलर पोळीभाजी भात जेवणापेक्षा जास्त वेळ फुल्ल रहातं !
गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून पण आवडेल !
तर ही घ्या कृति !
साहित्य :
क्विक ओट्स
चिया सिड्स
ग्रीक योगर्ट्/कोणतेही दही
२-३ चमचे दूध
प्रोटिन पावडर (मी व्हॅनिला फ्लेवर घेतली आहे.)