उडिद गोटा (साल काढलेले अख्खे उडिद) /जर हे नसतील तर उडिद डाळ - १ कप
पिवळी मूग डाळ - १ कप
स्टील कट ओट्स - १ कप
१. उडिद गोटा, मूग डाळ, स्टील कट्स ओट्स हे सर्व जिन्नस एकत्र घेऊन, स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे.
२. दुसर्या दिवशी सकाळी (किंवा जिन्नस भिजवून ८ तासा नंतर) ग्राईंडर/ मिक्सर मधे वाटून घ्यायचे, व ते फर्मेंट करायला ऊबदार ठिकाणी ठेऊन द्यायचे. थंडी असताना फर्मेंट करण्यासाठी मी ते ईंस्टंट पॉट मध्ये योगर्ट मोड वर सहा /सात तास ठेवते.
३. बॅटर छान फुगून आले/ फर्मेंट झाले कि एका वेळी हवे तेवढे एका बोल मध्ये काढून राहिलेले फ्रीज मध्ये ठेवावे. हे बॅटर ईथे अमेरिकेत ४,५ दिवस फ्रिज चांगले राहते.
४. आता या बॅटर मध्ये मीठ घालून त्याच्या ईडल्या, अप्पे करायचे किंवा लागेल तसं जरासच पाणी घालून डोसे, उत्तापे हे प्रकार करायचे आणि सांबार, चटणी बरोबर हादडायचे
जर सगळ बॅटर एका वेळी वापरणार नसाल तर मीठ न घालता फ्रीज मध्ये ठेवायचे, वापरायच्या वेळी मीठ घालायचे.
स्टील कट ओट्स म्हणजे काय?
स्टील कट ओट्स म्हणजे काय?
मस्त दिसताएत डोसे.
मस्त दिसताएत डोसे.
रेसिपी पण सोपी आहे..करून बघेन.
पण मी आतापर्यंत इनस्टंट ओट्स च आणत होते..स्टिल कट कसे असतात?
कुणी इंस्टंट,स्टिल कट,रोल्ड ओट्स फरक आणि फायदे सांगेल का?
चांगली आयडिया आहे. डोसे छान
चांगली आयडिया आहे. डोसे छान दिसताहेत.
स्टील कट ओट्स हे जास्त हेल्दी असतात. आमच्या कडे रोल्ड आणि इन्स्टंट ओट्स असतात, स्टील कट ओट्स दिसले नाही कुठे.
-----
आताच पाहिले बिग बास्केटवर आहेत स्टील कट ओट्स.
स्टील कट ओट्स म्हणजे क्लासिक
स्टील कट ओट्स म्हणजे क्लासिक निळे कवेकर ओट चे पाकीट का?ते इन्स्टंट नाहीयेत आणि रोल्ड वाटत नाहीयेत.
डोसे जबरदस्त दिसतायत. आम्ही उडीद आणि ओट चे करतो पण ते थोडे जाड होतात.हे एकदम कुरकुरीत मस्त वाटतायत.
धन्यवाद! मी नक्की करून पाहीन.
धन्यवाद! मी नक्की करून पाहीन..
स्टील कट ओट्स हे कमीत कमी
स्टील कट ओट्स हे कमीत कमी processed असतात, त्यामुळे आरोग्यपूर्ण मानले जातात. भारतात मिळतील का याची कल्पना नाही. याचे porridge खूप उत्तम लागते. खिचडी ही छान होते.
@anu त्या पाकिटावर काय लिहिलेय?
हे बनवायला मला जमणार नाही तसे
हे बनवायला मला जमणार नाही तसे पण रेसिपी वाचून आणि फोटो बघून थोडे खाल्ल्यासारखे वाटले.
अनु स्टील कट ओट्सच्या
अनु स्टील कट ओट्सच्या पाकिटावर स्टील कट ओट्स असे ठळक लिहिले आहे, बिग बास्केटवर बघा.
भारी आहे. तुमचा डोसा तर एकदम
भारी आहे. तुमचा डोसा तर एकदम हॉटेलमध्ये असलेल्या डोसासारखा प्रो दिसतोय .
क्वेकर पाकीट संपले आहे, कधी
क्वेकर पाकीट संपले आहे, कधी बघायला मिळाले तर बघेन.
स्टील कट ओटस घेऊन ठेवते संधी मिळाली की.
छान रेसिपी मस्त दिसत आहेत
छान रेसिपी मस्त दिसत आहेत
Big basket वरून मागवलेले स्टील कट ओट्स. चवीला बरे लागले पण शिजायला कठीण. खिचडी इ प्रेशर कुकर मध्ये केलेले बरे.
मृणाली, मानव, अनु, मनमोहन,
मृणाली, मानव, अनु, मनमोहन, प्रणवंत, जाई, मेघा धन्यवाद
मृणाली, अनु, वर सगळ्यांनी सांगितल तस स्टील कट ओट्स प्रोसेस्ड नसल्याने जास्त हेल्दी बाकी दोन्ही ओट्स पेक्षा. पण ते ईंस्टंट ओट्स सारखे लगेच भिजवून खाता येत नाहीत, तर प्रेशर देऊन शिजवून मग वापरावे लागतात. खिरी, मूगाची खिचडी , दलिया सारख्या शिजवून करायच्या प्रकारात हे ओट्स पण ढकलायचे
अनु, हे स्टील कट ओट्स ,गव्हाचा बारीक दलिया असतो तसे साधारण दिसतात.
ईंस्टंट ओट्स असतील तर ते पण वापरुन बघु शकतेस. हि मागे मी ईंस्टंट ओट्स वापरून डोसे करायची कृती लिहीली होती -
https://www.maayboli.com/node/55279
पाककृती मध्ये एकच फोटो देता आला. बाकी प्रकाराचे फोटो खाली प्रतिसादात देते
छान आहे. एकुलता एक फोटो ही
छान आहे. एकुलता एक फोटो ही मस्त आहे!! इडली करून बघेन.
(ते क्लॉकवाईज डोसा - अँटीक्लॉकवाईज डोसा इतकी चर्चा झाली ना त्या 'इंडियन किचन' धाग्यावर की मला आता डोसा करायचीच भिती बसली.... म्हणजे मी बहुतेक क्लॉकवाईजच करत असावे पण न जाणो अँटीक्लॉकवाईज पण जमत असेल तर फ* म्हणताच ब्रह्महत्या..... )
माझ्याकडे रोल्ड ओट्स आहेत आणि
माझ्याकडे रोल्ड ओट्स आहेत आणि डबा ही नुकताच आणलाय. ह्या वर दिलेल्या प्रकारात ते वापरता येतील का? फुगीर ब्राउन राईस नाहीये माझ्याकडे. तर माझ्याकडचे ओट्स कसे वापरायचे हे सांगाल?
वर दिलेल्या पद्धतीने के
वर दिलेल्या पद्धतीने केलेल्या बॅटरचे हे बाकी प्रकार -
१> मसाला डोसा
२> कांदा उत्तापा, जवस चटणी स्प्रेड करून
३> ईडली सांबार. या ईडल्या पांढर्या शुभ्र दिसत नाहीत पण चव चांगली लागते. (गोरे रंगपे न ईतना गुमान कर / हम सावले हुवे तो क्या हुवा चववाले है )
४> अप्पे रस्सम चटणी
सी, धन्यवाद करुन बघ आणि फोटो
सी, धन्यवाद! बाकी क्लॉकवाईज, अँटीक्लॉकवाईज दोन्ही प्रकारे डोसे करुन बघ आणि फोटो आण ईकडे
हो तो सिनेमा बघितला आता त्या बीबी वरची चर्चा घेते वाचायला
@peacelily202, हो! रोल्ड ओट्स फक्त स्टील कट ओट्स एवढे जास्त वेळ भिजवायला नाही लागणार.
उडिद, मूग डाळी वाटायला घ्यायच्या आधी १५, २० मि. रोल्ड ओटस पाण्यात भिजवा आणि मग डाळींबरोबर वाटून घ्या.
आम्ही पण ओटस चे डोसे करतो
आम्ही पण ओटस चे डोसे करतो(निळ्या क्वेकर पाकिटात जे काही मिळतात त्याचे)
मला या धाग्याचं कौतुक यासाठी आहे की डोसे नीट ग्लेझ(चमक) आलेले, एकदम कुरकुरीत दिसत आहेत.आमचे थोडे 'उडीद ओटाची पातळ धिरडी' फ्रेज कडे जातात
या रेसिपीने करून बघतेच.
भारी दिसतायत सगळे प्रकार
भारी दिसतायत सगळे प्रकार
छान दिसतायत डोसे!
छान दिसतायत डोसे!
पँडेमिक काळात इंग्रोतून आणलेला तांदूळ पुरवायचा म्हणून मी गेले वर्षभर इडली डोसे यासाठी गावातल्या दुकानातले ओट्स वापरतेय. काही वेळा ओट्स ऐवजी पर्ल बार्ली वापरते.
मिपु, अशक्य भारी दिसताहेत.
मीपु, अशक्य भारी दिसताहेत.
स्टील कट आणून करुन बघतो.
डोसे खूपच मस्त , चकचकीत आणि
डोसे खूपच मस्त , चकचकीत आणि क्रिस्पी दिसत आहेत.
मी नेहमी करते स्टील कट ओट्स चे डोसे आणि उतप्पे .
हा मध्ये केलेला डोसा
सही! नक्की सगळे प्रकार ट्राय
सही! नक्की सगळे प्रकार ट्राय करणार ह्या रेसिपीने.
वाह मस्त मस्त डोसे.. ते
वाह मस्त मस्त डोसे.. ते भिजवणं, वाटणं याला पास माझा...
मीपुणेकर, इडलीचे पीठ मस्त
मीपुणेकर, इडलीचे पीठ मस्त फुगले आहे, डोसे आणि ईडल्या दोन्ही खूप छान झाले! धन्यवाद!
अनु, प्राजक्ता, स्वाती२, अमित
अनु, प्राजक्ता, स्वाती२, अमित, क्रिशा, राखी, अंजली, peacelily2025 धन्यवाद
अजून एक म्हणजे, हे डाळी, ओट्स मिक्सर मधे पटकन वाटून बारीक होतं, तांदूळ बारीक वाटायला त्या मानाने जास्त वेळ लागतो.
@क्रिशा, डोसा मस्त कुरकुरीत दिसत आहे !
@स्वाती२, बार्ली मी अजून वापरली नाही. क्रिशा पण वापरते बहुतेक . आता बार्ली आणून करुन बघेन
@peacelily2025, अरे वा , आवडलं ना, मग झालं तर
@मीपुणेकर, मी करुन पाहील्या.
@मीपुणेकर, मी करुन पाहील्या. उत्तम झाल्या. डोसे ही छान झाले. धन्यवाद
सॉलिड एकदम. काय एकेक फोटो
सॉलिड एकदम. काय एकेक फोटो आहेत, भुक लागली बघून.
क्रीशा मस्तच.
आज बनवून पाहिले. स्टील कट
आज बनवून पाहिले. स्टील कट ओट्स संपवायला छान पर्याय आहे.
आज बनवून पाहिले. स्टील कट
आज बनवून पाहिले. स्टील कट ओट्स संपवायला छान पर्याय आहे.
अरे वा, मनमोहन, वेका छान!
अरे वा, मनमोहन, वेका छान!
वेका नि दोनदा केले का
अन्जू धन्यवाद