पेस्ट कंट्रोल

Submitted by गजानन on 23 January, 2016 - 01:55

पेस्ट कंट्रोलबद्दल माहिती आणि अनुभव इथे शेअर करावेत.

यापूर्वी याबद्दल कधी विचार केला नव्हता. अध्येमध्ये हंगामी अधिवेशन असल्यासारख्या मुंग्या होतात आणि नाहीशा होतात. फारच झाल्या तर लक्ष्मणरेषा नावाचा खडू मेडीकलमधून आणून मुंग्याच्या वाटांवर फिरवला तरी पुरे. नव्या ठिकाणी वास्तव्यास येण्यापूर्वी पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे होते, पण ते राहून गेले. आता झुरळांकरता पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे आहे.

हर्बल पेस्ट कंट्रोल आणि स्प्रे पेस्ट कंट्रोल यांमध्ये कोणते जास्त परिणामकारक, कमी अपायांचे आणि खटाटोपांचे असते? निदान लहान मुलांना आणि वृद्धांना त्रासदायक ठरू नये, इतके तरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा अनुभव
आम्ही PEST CONTROL OF INDIA मधून करून घेतो.
AMC होती . वर्षातून ३ वेळा येतात.
हर्बल करून घेतो. लहान मुलांना आणि वृद्धांना त्रासदायक अजिबातच नाही .
Charges किती रूम्स आहेत त्यावर ठरतात. पार्किंग, गार्डन चे charges वेगळे.

मागच्या वर्षी पासून amc बंद केली कारण गरज नाही असे वाटले. गेल्या २ वेळा साधारणपणे वर्षातून १दा करून घेतले.
एकही झुरळ नाही. लाल मुंग्या कधीतरी दिसतात. पण घर खाली असल्यामुळे आणि बागेमुळे ते होणारच.
बागेतील वाळवी दिसली तर तिथेच बंदोबस्त करावा लागतो.
आणि धन्यवाद - तुमच्या धाग्यामुळे आठवण झाली. ह्या महिन्यात करून घ्यावे

माझा अनुभवः
हर्बल पेस्ट कंट्रोल आणि स्प्रे पेस्ट कंट्रोल दोन्ही करूनही झुरळं चार आठ दिवसांनी परत दिसायला लागायची कारण ती लपून सिंकच्या ड्रेनेज पाईप मधून पुन्हा अवतीर्ण होत असत.. हिट सुद्धा वापरलं तरी तेच.
मी मायबोलीवरच कोणाचा तरी सल्ला वाचला कि बोरिक पावडर आणि कणीक मिसळून केलेल्या लहान लहान गोळ्या किचनच्या कानाकोपर्‍यात ठेवा. त्यामुळे झुरळं ते खाताना त्यांच्या पायाला लागलेली पावडर त्यांच्या कॉलनीत घेउन जातात आणि डिहायड्रेट होऊन मरतात.
मी पूर्ण किचन ओटा आणि सिंकच्या आसपास, गॅसवर (ओटा रिकामा करून) बोरिक पावडर शिंपडून ठेवली (लागोपाठ दोन रविवार रात्रभर), सकाळी ओटा न धूता फक्त पुसला. झुरळं दिसत होती पण अचानक एक दोन आठवडयात पूर्ण नाहिशी झाली. जे काम जवळपास ७०० रू. खर्च करून झालं नाही ते १४ रू. च्या बोरिक पावडरने झालं..
(कृपया हे टेलिब्रँड्स अ‍ॅडच्या सुरात वाचू नये :p )

येस्स मॅगी.
मी पण बोरीक पावडर मिसळुन कणीक मळली आणि त्याचे छोटॅ छोटे गोळे ओटा, किचन कॅबिनेट मधे चिकटवुन ठेवले. झुरळ गायब. एकदम नाहीशीच. त्यांच्या डेड बॉडीज पण नाही दिसत.

मृणाल, हो तसा स्प्रे सगळेच पेस्ट कंट्रोलवाले मारतात पाईप & चेम्बर मध्ये पण आमच्याकडची झुरळं लईच चिवट होती, मरेचनात Sad
पियू, ढेकूण झाले असतील तर हा धागा वाचावा http://www.maayboli.com/node/55007
आगे भगवान मालिक!!

ढेकणांसाठी पेस्ट कंट्रोल उपयोगाचे आहे का?

मी दोन वर्षांपुर्वी ढेकणांसाठी हर्बल पेस्ट कंट्रोल केले. बेडच्या एका बाजुला जास्त झालेले ढेकुण. पे क वाल्या सद्गृहस्थाने तिथे अजुन एक औषध मारले. ते सगळ्या गादींवरही मारलेले आणि आजही त्यातल्या एका गादीचा वास गेलेला नाही. गादी आता फेकुन लागणर आता. Sad मी तीला तसेही बाहेर ठेवलेले आहेच. अतिशय बेक्कार वास येतो तिला.

नवे घर बांधताना फक्त घुशीच्या पेस्ट कंट्रोलसाठी १० हजार वेगळे घेतले होते त्या माणसाने. उधई, मुंग्या, झुरळे, डांस असे वेगवेगळाल्या पेस्टींचे वेगळाले अन भरपूरसे पैसे.

घुशी मारण्यासाठी प्लॉटच्या ४ कोपर्‍यात ४ अन अधेमधे ४ असे बाजारात ४० रुपयांना मिळणारे रॅटकिलचे हिरवे केकचे तुकडे याने डिस्पोजेबल थर्माकोलच्या बशीत घालून रात्रभर ठेवणे असा उद्योग २-३ अठवडे, (अठवड्यातून एकदा) असा केला. इतर वेळा टरबुजाच्या फोडींवर मंडईत मिळणारी पार्‍याची मूषकमार दवावाली काळी पावडर. अन भज्यांत घालून तीच पावडर असे उद्योग.

टोटल खर्च भाऊने केमिकल्स व मटेरिअलवर १००० रुपयेही केलेला नव्हता.

बाकी मग बीम्स्/कॉलम्स ओतताना त्यात पावडर टाक, फरशी मांडताना खाली बीएचसी टाक असे उद्योग. याने आता व्हाईट अँट्स येणार नाहीत, आता हे अमुक बोटॅनिकल नेम कीटक किमान १० वर्षे येणार नाहीत वगैरे सांगत होता. मी प्रत्येकवेळा अरे वा! तुमची ग्यारंटीयेना?? छान छान, असे म्हणत खुंटा बळकट करीत होतो.

इतकं करून २च वर्षांत माझ्या बेडरूमच्या वुडन फ्लोरिंगच्या फळ्यांना उधई लागली. Sad

मग ग्यारंटी वाल्या साहेबांकडून फ्लोरिंग रिपेयर चकटफू करवून घेतली, हेवेसांनल. 4.gif

घुशींचा बंदोबस्त मात्र झाला नाही. त्यांच्या बिळांतून माती वाहून जाऊन बाहेर एका ठिकाणी फरशी धसली आहे, अन लॉनखालची मातीही बरीच वाहून गेली आहे. लॉन नवी करावी लागेल. पण आता त्या हीरोच्या नादी लागण्यात अर्थही नाही, अन या प्राण्यासाठी प्लॉटपुरत्या लोकलाईज्ड पेस्टकंट्रोलचा उपयोगही नाही हे लक्षात आलंय.

आजकाल घुशीचं बीळ दिसलं की त्यात आधी बीएचसी पावडर टाकून मग ग्लेनफिडचची रिकामी बाटली ठोकून पक्की बसवणे हा उद्योग करीत असतो. घुशीच्या बिळांसाठी बाटली लागते म्हटल्यावर ह्या पेस्टकंट्रोल खर्चावर फारसे ऑब्जेक्शन होम मिनिस्ट्रीकडून येत नाही. Wink तेव्हा एक औषध मला, अन एक घुशीला, असे सुखेनैव सुरू आहे.

झुरळांसाठी एक उपाय करून बघा. ( वर दिलाच आहे, त्यात थोडी साखरेची भर )

बोरीक पावडर घेऊन त्यात तितकीच साखर व मैदा घालून हे मिश्रण दूधाने वा पाण्याने भिजवा. जिथे जिथे झुरळे लपतात त्या सर्व फटींवर, कोपर्‍यात ही पेस्ट हाताने लावा. त्याचेच काही गोळे करून कपाटाखाली वगैरे ठेवा ( घरातील सर्वांना याची कल्पना द्या ) दुसर्‍या दिवशीच झुरळे दिवसाही उघड्यावर फिरू लागतील. दिसतील तेवढी मारा. बाकीची आपोआप सुकून मरतील.

हा उपाय अगदी खात्रीशीर आहे. जून्या पुस्तकात वाचला होता. मी गेल्याच महिन्यात याचा यशस्वी प्रयोगही केला.

बोरिक पावडरचा उपयोग बरोबर आहे @ दिनेशदा.

त्यापेक्षाही जास्त मला हिटचे हे ↓ hit anti roach gel आवडले.

अ‍ॅबसोल्यूटली इफेक्टिव्ह अन नो झुरळ्स.

ढेकूण पेस्ट कंट्रोलने जातात. कोणती तरी एका कंपनी खात्रीपूर्वक पे.क. करून देते. पहिल्यांदा मग ७ दिवसांनी आनि मग १५ दिवसांनी आणि मग गरज वाटली तर पुन्हा दोन ते तीन आठवड्यांनी येऊन पुन्हा औषध मारतात. असेच गाद्यांवर मारतात. पण त्याचा इतका वास नाही राहिला. (साधना म्हणते तसा)

आईच्या मैत्रिणीकडे, आईकडे आणि आपल्या मायबोलीच्याच एका मैत्रिणीच्या घरी त्याच कंपनीने ढे.पे.क. केले. पुन्हा प्रॉब्लेम आला नाही.

कंपनीचे नाव विचारून साम्गते.

घुशींचा उपद्रव लई बेकार. एकदा लागल्या की निघता निघत नाहीत. मायंद्याळ चिवट. कशालाही जुमानत नाहीत.

घरात अति-तुरतुरी बालके असल्याने झुरळांकरता हिट वगैरे घरी आणायचे धाडस होत नाही. सध्या बोरीक आम्लाचे प्रयोग चालू केले आहेत.

(काल खरेतर सगळीकडे कणकेचे गोळे ठेवले. पण पिठाच्या डब्याचे झाकण चुकून उघडेच राहिले. त्यामुळे हुशार झुरळांनी एवढ्या कष्ट करून बनवलेल्या गोळ्यांपेक्षा उघड्या डब्यातल्या फास्टफूडाकडेच जाणे पसंत केले असेल, अशी शंका आहे.:फिदी:

दुसरे म्हणजे स्वयंपाकघरात अगदी गोळ्यांच्या जवळच हळूहळू ठिबकत असलेली स्वयंपाकाच्या पाण्याची मोरी असते. डिहायड्रेशन जाणवल्याबरोबर झुरळांनी पाणी पिण्याकरता मोरी जवळ केली नाही म्हणजे बरे! :खोखो:)

छोटे मिठाईचे खोके घेऊन एका बाजूस आत उघडणारा फ्लॅप बनवायचा.आत बेगॅान बेट चिमुटभर टाका.आत गलेलं झुरळ बाहेर येत नाही.खोका रिकामा करून पुन्हा वापरा त्यातले औषध चिकटून बसलेले असते.

For cockroach control, hi-care or pest control india AMC works. If cockroaches are gone somehow other animals doesn't come is my experience. They use gel like shown in above pic. It doesn't have chemical odur nor you have to get out of your home. If you adk them to apply near hinges and drawer runners it's not visible also.

आम्ही गेली १० वर्षे तरी पेस्ट कंत्रोल ऑफ इंडियाकडून काम करून घेतो. AMC आहे. झुरळं तर बिल्कुल नाहीत. मुंग्यांचा त्रास मधून मधून होतो. पण त्यांना सांगितल्यावर ते लगेच येउन ऑईषध मारून जातत.

झुरळांचा त्रास नाही पण कोळी मात्र भरपूर आहेत.आमचे पेस्ट कंट्रोल वाले फक्त झुरळं च मारतात. कोळी आणि मुंग्या मारण्याचे वेगळे पैसे घेतात. कोळी वाले पेस्ट कंट्रोल कितपत फायद्याचे आहे त्याचा अनुभव हवा आहे.

गजानन, मोरीत सुद्धा बोरिक आम्लाची होळी खेळा!! हाकानाका.
सुरुवातीला हुशार झुरळं त्या पावडरवरूनच डॅन्स करतील ते मुकाट्याने बघा. दोन तीन आठवड्यानी अचानक किचन क्लीन अँड क्लिअर दिसायला लागेल. Wink

अगदी बरोबर मॅगी, हे बोरीक टाकल्यावर झुरळे वेड्यासारखीच करायला लागतात.

दीमा, हे जेल पण बघायला पाहिजे.

२५ वर्षांपुर्वीचा एक किस्सा. दुबई मधे एक नवीन स्प्रे आला होता. त्यासोबत एक छोटी झिप लॉक बॅग देत. तो स्प्रे वापरून जे मोठ्यात मोठे झुरळ मारू ते ते बॅगमधे घालून ते दुकानात नेऊन द्यायचे. ज्या झुरळाचे वजन सर्वात जास्त त्याला बक्षीस होते. खलीज टाईम्स मधे धमाल किस्से होते या मारलेल्या झुरळांचे.

आम्ही मुख्यत्वे झुरळं आणि काळ्याच पण अगदी छोट्या मुंग्यांसाठी पेस्टकंट्रोल पूर्ण वर्षाचा करार करून करून घेतो.

आधी ३-४ वर्षं Pecopp Pest Control Services कडून करून घेत होतो. वर्षाचा करार केला की चार महिन्यातून एकदा स्वतः फोन करून तारीख वेळ ठरवून येतात आणि व्यवस्थित करून देतात.

आता Iss Hicare कडून करून घेतो. गोदरेजनं ही कंपनी घेतली आहे आता. वर्षांतून ४ वेळा येऊ लागले आहेत.

दोन्ही कंपन्या अधेमधे गरज लागली तर येऊन पुन्हा एक्स्ट्राचं पेस्ट कंट्रोल अ‍ॅट नो अ‍ॅडिशनल कॉस्ट करून देतात. मला Iss Hicare ची सर्व्हिस जास्त प्रोफेशनल आणि चांगली वाटली आहे.

माझ्याकडे ही नव्या घरात रहायला गेले त्याच वर्षी प्रचंड ढेकूण झाले होते. लिक्विड स्प्रे करून पाहिलं, वासाने हैराण झाले, तब्येत बिघडली आणि ढेकूण गेले नाहीतच.
मग माझ्या भावाने मला गायका पेस्ट कंट्रोलचे इंडस्ट्रियल फ्युमिगेशन करून घे असा सल्ला दिला. अतिशय जालिम उपाय आहे हा. सर्व घराच्या फटी पहिल्यांदा इंडस्ट्रियल टेपने सिल केले जातात मग दिवाण, कपाटं उघडी ठेवून हे कप एका खोलित ८-१० असे ठेवून त्यात एक केमिकल पावडर टाकली जाते. आणि त्यात पाणी ओतले जाते. स्वयंपाक घरात मात्र सर्व झाकपाक करून ठेवावे.
हे सर्व केले की २४ तास घर बाहेरून लॉक लावून आपण निघून जायचे. ते थेट दुसर्‍या दिवशी परतून ते कप उचलून टाकून द्यायचे कपाटं दिवाण वगैरे बंद. एक ढेकूण नाही दिसला त्या दिवसापासून. इतकंच काय काही दिवस डास, पाली पण नाही.

किचन मध्ये छोटी छोटी पांढरी झुरळं दिसली तेव्हा गोदरेज चं amc केलं. एक पुर्ण वर्ष ते लोक फोन करून येतात. या वर्षी एकदा पण केलेलं नाही. एकही झुरळ दिसलेला नाही.

बोरीक पावडरच्या उपायांनी झुरळे नाहीशी व्हायला दोन तीन आठवडे लागतात, हे सांगितलेत ते बरे झाले. नाहीतर चारपाच दिवस झाले तरी अजून फरक दिसला नाही म्हणून दुसरा काही उपाय करावा का, असे वाटत होते.

आमच्याकडे काय कारण असेल कळले नाही, पण बोरिक पावडर-साखर-कणीक हा उपाय महिन्याच्या वर वापरूनही झुरळे जराही कमी झालेली आढळली नाहीत. त्यामुळे नाईलाजाने हर्बल पेस्ट कंट्रोल करून घेतले. बापरे! दोन दिवसांतच किती झुरळे मेली. बाहेर पडून मरताहेत ते एक बरे आहे.

काही वर्षांपूर्वी माझ्याकडे बारीक झुरळे खूप झाली होती.डेकच्या आतमधील वायर्स खाऊन(?) वाट लावली होती.पेस्ट कंट्रोलला नवरा त्या वासासाठी तयार नव्हता.प्रचंड बुजबुजली होती.हर्बल पेस्ट कंट्रोल केल्यानंतर आज १२-१३ वर्षे घरात झुरळे नाहीत.

सिंकमधे महिना-२ महिन्यांतून-आठवेल तसे किवी ड्रेनेक्स घालते.