खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
त्या वेळी जपानमधे एक सम्राट होता. हा सम्राट शक्तिशाली होता आणि त्याला युद्धाची एव्हढी भूक होती कि फावल्या वेळेतही तो कोंबड्यांच्या झुंजी बघत असे. त्यासाठी त्याच्याकडे अनेक जातींचे हिंस्त्र आणि युद्धकुशल कोंबडे होते. त्यांना त्याने राजयोद्ध्यांचा दर्जा दिला होता. त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जाई.
चित्रपटांत जसे आई-वडील मुलांना कवेत घेऊन नीतिमूल्यांचे बाळकडू पाजतात तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीच आला नाही. “हे चूक आहे” किंवा “ते करू नकोस” असे बोट दाखवत शिकवण देण्याचा सोहळा आमच्या घरात कधी घडला नाही. वाईट गोष्टी करू नयेत, हे मला घरातून नव्हे तर शाळेत गेल्यावर गांधीजींच्या " तीन माकडांनी " शिकवले.
कोकणे एखडके काकरळी एखडक मामाद नामवाचा अमाकत्यंत हुकाशार माकणुस...
काय म्हणालात? कळलं नाही! अरे हो! विसरलेच. मराठीतून सांगते ही झुलू लोककथा.
तर, कोणे एके काळी एक ममाद नावाचा अत्यंत शहाणा माणूस आफ्रिकेच्या दक्षिण भागात राहायचा. 'कधीही खोटं न बोलणारा माणूस' अशी त्याची देशभरात ख्याती होती. अगदी आपल्या धर्मराज युधिष्ठिरासारखीच. लोक आपण खरं बोलतो आहोत असं सिद्ध करण्यासाठी 'कधीही खोटं न बोलणाऱ्या ममादची शपथ' असं म्हणत. आणि अशी शपथ घेतली तर समोरचा माणूस खरं बोलत आहे अशी ऐकणाऱ्याची खात्रीही पटायची, इतका ममाद सत्यवचनी होता.
मोमोज हे प्रकरण भारतीय बाजारात कधी आले, याची मला नेमकी कल्पना नाही. पण मी पहिल्यांदा खाल्ले ते दोन महिन्यांपूर्वीच. तसे कुठे मॉल वा फूडकोर्टमध्ये जाणे झाले (अर्थातच गर्लफ्रेंडबरोबरच) तर वरचेवर नजरेस पडायचे, मात्र कधी खाणे झाले नव्हते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडच्या ते नावडीचे आणि आम्ही दोघे बरोबर असताना मी स्वतासाठी काही स्पेशल घेऊन खाणे अशी पद्धत नाही आमच्यात. तसेच एकटे असतानाही मी वडापाव आणि दाबेली पासून चायनीज भेल ते अमेरिकन चॉप्सी पर्यंत सारे खातो, पण उकडीच्या मोदकासारख्या दिसणार्या पदार्थाला मुद्दाम पैसे खर्च करून विकत घ्यावे असे धाडस कधी झाले नाही.