२०१८ ला सुस, पुणे येथे ९०० सेलेबल स्क्वे.फुटांचे एक घर ४५,००,००० लाखांना विकत घेतले. कर्ज घेऊन चार वर्षात फेडले. घर राहण्यासाठी घेतले होते पण तिथे एक वर्षही राहता आले नाही. सुस महानगरपालिकेत आलेले नव्हते.
९ अपार्टमेंटची लहान बिल्डिंग आहे. स्व:तचे कार पार्किंग आहे, लिफ्ट आहे. सोलर आहे.
सुरुवातीला वाटले लहान बिल्डींग आहे म्हणजे प्रॉब्लेम्स लहान असतील. परंतु मेंटेनंस तेवढाच आहे.
एका कौटुंबिक अडचणीमुळे ते घर विकायचा विचार केला. एका वर्षापासून प्रयत्न करत आहे. घराची जाहिरात करण्याचा हेतू हे लिहिण्यामागे नाही. तर मला हा व्यवहार अतिशय घाट्याचा पडला आहे हे सांगण्यासाठी आहे.
घराची किमंत (बिल्डरच्या खिशात गेलेले एकूण पैसे) - ४५ ०० ०००
इंटेरियर व एकूण व्याजासहित माझ्या खिशातून गेलेले पैसे - ५८ ०० ०००
======
घर विकायला काढल्यावर पहिल्यांदा किंमत ६८ लाख लावली.
लवकरच ही किंमत मिळणार नाही म्हणून ती ६२ लाखावर आली.
शेवटी घर ५५ ला मागत दोघे जण तयार झाले.
त्यांचे फिसकटले.
घर आता मोकळे ठेवायला नको म्हणून पुन्हा भाड्याने दिले.
===
विकत घेणाऱ्यांना घर आवडते पण सोसायटी आवडत नाही. म्हणजे लोकांच्यात भांडणे आहेत असे वॉचमनच सांगतो!!
म्हणतात की स्विमिंग पूल वगैरे नाही त्यामुळे घर आवडूनही व्यवहार ठरत नाही.
===
शेवटी मी एकाला विकत द्यायला तयार झालो ५५ ला. पण तोही व्यवहार फिसकटला.
असा हा पांढरा हत्ती.
आता असा विचार आहे की विकून नुकसान करण्यापेक्षा, सुस गाव महानगर पालिकेत आले आहे. रस्ते देखील रुंद होत आहेत. त्यामुळे अजून पाच सहा वर्षे थांबावे. किमान २०३० पर्यंत थांबावे. त्यानंतर ७० पर्यंत विकावे.
असे स्वप्नरंजन चालले आहे.
पुन्हा आयुष्यात कधीही घर विकत घ्यायची इच्छा नाही.
मी आताच एक धागा काढला आहे! हे
मी आताच एक धागा काढला आहे! हे असे अनुभव वाचून लोक शहाणे होतात! किंबहुना गरज असेल तरच घर घ्यावे हे मत ठाम होते. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
अरेरे. वाचून वाईट वाटले.
अरेरे. वाचून वाईट वाटले.
सोसायटी व तेथिल कारभार चालविणारे कार्यकारी मंडळ यांचा जीवन सुसह्य अथवा असह्य करण्यात सिंहाचा वाटा असतो असे ऐकून होते. म्हणजे अमेरिकेतही को ऑप घ्यायचे झाल्यास तौलनिक (रिलेटिव्हली), कमी पैशात शक्य होते परंतु तेथिल कार्यकारी मंडळ जीवन फार असह्य करु शकते, क्षुल्लक बाबींवररुन्तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. उदा - घरासमोरच्या बागेची निगा 'नीट' राखली नाही वगैरे. लोकांवर झालेल्या छळाच्या कहाण्या कधीकधी ऐकू येतात. अगदी कॉन्डो घेतला म्हणजे पुढे बाग वगैरे प्रश्न नाही, तरी कार्यकारी मंडळाचे पॉलिटिक्स तुम्हाला, हैराण करुन सोडू शकते.
.
त्यात घर पाठीवर असल्याने, घराच्या वाटेस गेलेलोच नाही. वन ऑफ द बेस्ट दिसिजन्स सो फार.
अवांतर - अजुन एक आयुष्यातील, फार मोठ्ठा बचावात्मक, उत्तम निर्णय म्हणजे, 'टाइम-शेअर' ला नाही म्हणणे
हे सूस गाव कसे वगैरे कल्पना
हे सूस गाव कसे वगैरे कल्पना नाही पण वाचनातून समजतंय की नकोसा एरिआ आहे. म्हणजे अजूनही नकोसाच आहे बहुतेक म्हणून किंमत येत नाही. तिथून कुठे कामाला जाणे अवघड किंवा बेभरवशाचे असेल. आता आइटीचे गाव हिंजवडी येथूनही कंपन्या पळ काढत आहे असं ऐकून आहे. म्हणजे त्यातला कर्मचारी वर्गही जाणार, भाड्याची घरे रिकामी होणार.
बेरीज होता होता वजाबाकी झाली म्हणायची. वाईट वाटतंय.
आइटीचे गाव हिंजवडी येथूनही
आइटीचे गाव हिंजवडी येथूनही कंपन्या पळ काढत आहे असं ऐकून आहे. म्हणजे त्यातला कर्मचारी वर्गही जाणार, भाड्याची घरे रिकामी होणार.>>>>
बरेच आहे की. हे आयटीवाले वाट्टेल ती भाडी द्यायला तयार होतात त्यामुळे नॉन आयटीवाल्यांना त्यांच्या बजेटात भाड्याचे घरही मिळत नाही अशी ओरड चिक्कार ऐकलिय. ती जरा थंड पडेल.
लोकेशन! लोकेशन!! लोकेशन!!!
लोकेशन! लोकेशन!! लोकेशन!!!
वाचून वाईट वाटले +७८६
वाचून वाईट वाटले +७८६
९ घरांच्या बिल्डींगमध्ये सुद्धा काय लोकं भांडतात कळत नाही. याची घर घेताना काळजी कशी घ्यावी हा एक प्रश्नच आहे. शेजार सुद्धा आपल्या हातात नसतो. नशिबाचा भाग आहे तो.
जर याच कारणामुळे अडत असेल तर ही कु प्रसिद्धी काही काळाने कमी होईल आणि घराला योग्य किंमत येईल.. प्रयत्न राहू दे चालू.. शुभेच्छा
आमच्या ओळखीच्या एकांनी
आमच्या ओळखीच्या एकांनी ड्युप्लेक्स घेतला होता म्हणजे वरती कोणीतरी दुसरे. तर ते जोडपे मेर्वाना काय घ्यायचे, जोरात भांडणं काय करायचे. मेर्वानाचा , वीडचा वास भयंकर असतो. त्यात जर कोणी अजुन कन्कॉक्टेड पोशन्स घेतली तर याईक्स.
सुस गाव
सुस गाव
आणि 9 च लोकांची बिल्डिंग म्हणजे छोटी सोसायटी
अपार्टमेंट आहे की को ऑप सोसायटी?
12 च्या खाली अपार्टमेंट असायचे आधी
राहायचे असेल तरच घर घ्यावे असे परत एकदा मलाही शिकायला मिळाले