जमीन जुमला

रियल ईस्टेट

तुकडाबंदी व गुंठेवारी प्लॉट

Submitted by काउ on 15 January, 2015 - 12:27

नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो.

पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो.

बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते.

यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ?

अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ?

मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

Submitted by फारएण्ड on 21 August, 2014 - 02:30

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

गझलीगवार

Submitted by ब्रह्मांड आठवले on 8 June, 2014 - 00:54

मतला खराब आहे, शेरू उधार आहे
बोका सुद्धा जमेना, गझलीगवार आहे

माझी जमीन होती, मीठागरात थोडी
कच्छी रणात करतो, शेती सुमार आहे

गझलू धटिंगणांनो, लक्षात राहू द्यावे
अज्ञ सुखात राही, आनंद फार आहे

मोदी बहूमताने, सत्तेत आज आले
गझलघटना नव्याने, होते तयार आहे

शायर कुणी निनावी, रानात गात होता
गाणे जुने तयाचे, कळले न सार आहे

- आनंदब्रह्म

घर विकत घेणे - वाकड, पुणे - कल्पतरु हॉर्मोनी (३ बीएचके)

Submitted by राजू७६ on 4 April, 2014 - 04:48

मी वा़कड, पुण्यात एक/ दोन महिन्यात घर विकत घ्यायचा विचार करत आहे... सध्या नेटवर आणि फोनकरुन एक नवीन सोसायटी पसंद पडली आहे,

wakad.jpg

तर ही जागा मी गुगल मॅप्सवरुन बघितली पण हे २/३ वर्षापूर्वीची वाटते... तर मला माबो - पुणेकरांकडून खाली माहिती पाहिजे.

१. पाणीपुरवठा - पिंचिमपाकडून होतो का?
२. सार्वजनिक बस सर्व्हीस आहे का?
३. चांगल्या शाळा/ लहान मुलांचे डॉक्ट्रर/ हॉस्पीटल आहे का?

गावठाण हद्दीतील घर

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 16 February, 2014 - 08:17

गावठाण हद्दीतील घर

मुंबईत अनेक ठिकाणी गावठाण हद्दीतील फ्लॅटच्या जाहिराती दिसतात. अशी घरे स्वस्त का असतात? गावठाण ह्द्दीत किती मजल्यापर्यंतची इमारत वैध असते?

ब्यांक कर्ज देत असेल तर असे घर लिगल आहे असे समजून घेता येते का?

पनवेल भागतही आज प्रचंड प्रमाणात घर बांधणी सुरु आहे.. तिथे फ्लॅट घेणं कितपत योग्य ठरेल? भविष्यात तिथे डेवलपमेंट होईल का?

जागा हवी आहे (फ्लॅट)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुण्यात मगरपट्ट्याला जाणं येणं सोयीचं असेल अशी जागा (भाडेतत्त्वाने - फ्लॅट - २बीएचके) शोधत आहे. कुणाची असल्यास किंवा ओळखीत असल्यास कृपया अवश्य कळवा. बजेट साधारण महिना १२००० रु. हांडेवाडी, कोंढवा वगैरे भागात नको आहे. मराठी शेजार असल्यास उत्तम. माझ्या विचारपुशीत निरोप ठेवलात किंवा व्यक्तिगत ईमेलद्वारा संपर्क केल्यास बरे. धन्यवाद.

प्रकार: 

शेअर सर्टीफिकेट

Submitted by झंपी on 1 January, 2014 - 11:58

१)भारतातील स्वतःच्य घराचे शेअर सर्टीफिकेट हरवले असेल तर नक्की काय प्रोसेस आहे?

२)कोणी सांगेल का की ह्यात किती वेळ जाइल?

३)घर जर दुसर्‍या कोणाच्या नावावर करायचे असेल तर शेअर सर्टीफिकेटची गरज लागेल ना?

(प्लीज अंदाजे माहिती नको. तशी बरीच उलटी सुलटी माहीती मिळालीय.)

पन लवकरात लवकर सर्टीफिकेट मिळवायचे असेल तर काय करावे ते सांगा.

आधीच धन्यवाद.

शब्दखुणा: 

कॅपा कोलाच्या निमित्ताने

Submitted by नितीनचंद्र on 16 November, 2013 - 00:41

कॅपा कोलाच्या रहिवाश्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली. या निमीत्ताने ब्रेकिंग न्युज आल्या. मुख्यमंत्री आणि सुप्रिम कोर्टाच्या दरवाज्यात असलेल्या प्रकरणात काही माहिती त्रोटकच होती.

या इमारतीचा एखादा मजला किंवा १०% एफ एस आय जास्तीचा होता हे समजु शकते. काही नियमांची निटशी कल्पना नसल्याने हे घडु शकते. उदा. बाल्कन्या कारपेटमध्ये समाविष्ट करायच्या किंवा नाही इ.

या सगळ्या गदारोळात बिल्डर डेव्हलपर कोण यांचे नाव जाणिवपुर्वक टाळले जात आहे. हा मामला सुप्रीम कोर्टात जाईपर्यत कुणा फ्लॅट धारकाने बिल्डरवर फसवणूकीचा दावा लावला नाही ? त्याला आत घातल नाही ?

ग्रामपंचायत जमीनीसाठि लोन कसे मिळेल? किंवा मिळवावे?

Submitted by गुलबकावली on 24 October, 2013 - 02:02

ग्रामपंचायत हद्दित येत असलेल्या जमिन आणि घर खरेदीसाठी माहिती हवी आहे. तसेच ह्यासाठी कर्ज कुठुन मिळेल.

Pages

Subscribe to RSS - जमीन जुमला