मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

"करुणा" : भाग ०१ (लग्न)

Submitted by दिपक. on 29 July, 2018 - 14:17

| दि. ११ फेब्रुवारी २०११ |
| स्थळ : यशवंतरावांच घर |

सुप्रसिद्ध लेखक व साहित्यकार यशवंतराव देशमुख आणि त्यांची पत्नी करुणा यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतरावांचे बालपणीचे मित्र दिगंबर, करुणाची धाकटी बहीण चंदा व इतर नातेवाईक व मित्रमंडळी यशवंतरावांच्या घरी जमले आहेत. यशवंतराव हॉलमधेच सजवलेल्या एका छोट्या स्टेजवर उभे राहून बोलत आहेत व सर्व मंडळी अगदी लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत आहे.)

नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

मोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.

या अगोदर
whats_new_before.jpg

आता
whats_new_after.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

Submitted by निमिष_सोनार on 20 July, 2018 - 10:35

मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक!

मी: "एक कणीस भाजून दे!"

मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!"

पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...

विषय: 

नवीन घराचे मराठी नाव

Submitted by Madhuri Parulekar on 15 July, 2018 - 07:01

मला घराला एक छान नाव सुचवा जे समुद्र आणि डोंगर ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हवे

(मायबोलीकरांनी सुचवलेली घरांची / बंगल्यांची वास्तूची नावे इथे संकलीत आहे : वेमा)

सुई बाई स्पर्शिका

Submitted by कल्पेश. on 14 July, 2018 - 06:26

इना मीना डीका
डाक्टरीन बाई स्पर्शिका
सुईचे भ्या घालवते बर्र का
वाइंच जीटॉक कर गो तीका

मिपा माबोला हिच्या हाका
बापयांनु मह्यासङ्गे बोलू नका
बोलताच पयला डाउट आलो माका
लगट कराया ही मारतेय फेका

धागों उडालो थयसुन शिका
हिच्या दशावताराक फ़सु नका
सुई बाई एकदम डांबिस असा
परतून ईल तर मारा एक ठोसा

― कल्पेश

वेळ

Submitted by निमिषा on 11 July, 2018 - 08:53

"आदित्य..., ऐ आदित्य, आदित्या....."

"काय आहे ग" laptop वरून लक्ष न हटवता आदित्य बोलला.

नेहा खूप आनंदात स्व:त बनवलेला एक नवा पदार्थ घेऊन आली होती. आदित्यला प्रेमाने भरवण्यासाठी. पण आदित्यच नीट लक्षच नव्हता. नेहा हिरमुसली.

आदित्य एक software engineer होता. नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्या वर काम करत असलेला. आदित्य नेहा ला वेळ च देऊ शकत नव्हता. घरी सुद्धा तो ऑफिस ची काम करत बसलेला असायचा. नेहाशी त्याचे एक वर्षापूवीच लग्न झाल होत. पण अजून हि ते दोघे एकमेकांना अपरिचितच होते आणि औपचारिक बोलायचे. आदित्य दिवसभर स्व:ताच्या कामा मध्ये व्यस्त असायचा.

मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.

मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

बळी

Submitted by सेन्साय on 2 June, 2018 - 22:45

बळी
(शतशब्द कथा)
______________
.

आज संध्याकाळ पासून तिची शोधक नजर भिरभिरत होती. गेल्या अख्ख्या आठवड्यात एकही कामाची गोष्ट न मिळाल्याने ती उपाशी होती. शारीरिक स्तर केव्हाच ओलांडलेली भूक आज तिला शांत बसु देत नव्हती. तेवढ्यात तिने सावज टिपले. शिकार आटोक्यात होती. त्याच्या मरण्याने कोणी दुःखीही होणार नव्हता.

होय ! तोच ज्याच्यावर दूसरीतल्या आसिफाची छेड़ काढल्याचा आरोप होता. अखेरचा पाश आवळण्यापूर्वी खात्रीसाठी समोरून पुन्हा पाहुन आली. हेतुपुरस्सर वाकत सर्व उभार दाखवल्याने सावज अलगद गळाला लागले.

शब्द ..

Submitted by सेन्साय on 7 May, 2018 - 23:54

.

.

शब्द
~~~~

.
शब्द उमटला
अर्थ मिळवला
शब्द वाढला
कलह आरंभला

शब्द झिरपला
सांत्वन जाहला
शब्द गोंजारला
मद उफाळला

शब्द झेलला
आज्ञा लाधला
शब्द पडला
आब ओशाळला

शब्द अक्षय्य ठेवला
शब्द निश्चय मांडला
शब्द उलगड़ता मनाला
पुनश्च निःशब्द मात्र झाला ....!

― अंबज्ञ

Pages

Subscribe to RSS - मायबोली