नविन घराचे नाव

Submitted by Suhas Pachpande on 4 February, 2018 - 09:39

कृपया नविन घरासाठी एखादे छानसे नाव सुचवा.

मायबोलीकरांनी सुचवलेली घरांची / बंगल्यासाठी नावे इथे संकलीत आहेत. डोंगर आणि समुद्र यांच्याशी निगडित काही अजून प्रतिसाद इथे पाहता येतील
नाव एकदा ठरले की त्यातल्या अक्षरांपासून पाटी करण्याबद्दलचे सल्ले (उदा, अक्षर स्टील ची असावीत की कास्टींग ची) इथे पाहता येतील.

 1. तुमचे आडनाव + (सदन/निवास/व्हीला /पॅलेस) उदा. पाचपांडे सदन
 2. जे तुमच्या शहराचे/गावाचे/विभागाचे नाव आहे त्यापुढे टॉवर, हिल, हाईट असे काहीतरी जोडा. उदा. तपोवन हाईट्स
 3. आईवडिलांच्या (किंवा पत्नी, अपत्य ) यांच्या नावावरुन उदा. आई च नाव सरस्वती आणि वडिलांच राजाराम दोन्ही मिळुन सरस्वराज
 4. देवाच्या नावावरून
 5. एखाद्या झाडाचे नाव उदा . अमलताश, सोनमोहर, गगनजाई, आकाशमोगरा पलाश कर्णिकार वगैरे. हे झाड दर्शनी भागात लावून जोपासावे.
 6. घराचे नाव शक्यतो साधे, सोपे ठेवा. ते नाव तुम्हाला असंख्य ठिकाणी वापरावे लागेल. रिक्षावाल्याला, टेंपोवाल्यालाही सांगावे लागेल. आमच्या परिचयाचे एक जण राहतात, त्या इमारतीचे नाव 'शुक्राकार' आहे. फार कठीण नाही, तरीपण लोक त्याचे शुक्रवार, शुकाकार वगैरे करतात. तसंच 'ऑप्युलन्स' नावाचं 'अ‍ॅम्ब्युलन्स' ही ऐकल आहे. असो.
 7. आनंदयात्री
 8. इंद्रप्रस्थ
 9. कोंदण! (म्हणजे आतली माणसं आपोआप हिऱ्यासारखी होतील)
 10. कोकणकडा
 11. गाज
 12. गिरीजा
 13. गिरीराज
 14. गौरिनन्दन
 15. झुळूक
 16. तथास्तु
 17. देवगिरी
 18. देवाश्रय
 19. नवीन घर
 20. नीरज
 21. निवांत,
 22. प्रयाग,
 23. प्रभात,
 24. पितृछाया
 25. पावनखिंड
 26. बान्ते स्रे (इ. एका सुरेख मंदिराचे नाव आहे.)
 27. भाविक ( भागिरथी = आई+ विठ्ठल = वडिल + क = कर्तव्य भावनेने केले)
 28. मातृछाया
 29. मुक्तछंद
 30. ' या'
 31. लाल महाल
 32. विसावा
 33. सह्याद्री
 34. सज्जनगड
 35. सौख्य
 36. स्नेह
 37. सुरेख
 38. स्वस्ति
 39. स्वप्नसार
 40. स्वप्नगुंफा
 41. स्वप्न्-पूर्ती
 42. स्वामी
 43. सय
 44. सावली
 45. शुभं करोति
 46. श्रमसाफल्य.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर कोणत्या शहरात आहे,
किती मोठे,
आउट हौस सकट बंगला आहे , हवेली आहे की रो हाऊस,
कौलारू छप्पर आहे की गच्ची?
बाग आहे का?
त्यात किती लोक राहणार आहेत (भले थोरले एकत्र कुटुंब, की राजा राणी)
भारतीय हवे की इतर भाषा चालतील,

काहीतरी गाईड लाईन्स द्या की राव,

स्वस्ति
' या'
एखाद्या झाडाचे नाव उदा . अमलताश, सोनमोहर, गगनजाई, आकाशमोगरा पलाश कर्णिकार वगैरे. हे झाड दर्शनी भागात लावून जोपासावे.

जे तुमच्या शहराचे/गावाचे नाव आहे त्यापुढे टॉवर, हिल, हाईट असे काहीतरी जोडा.
जसं ते गणपतीला नाही का लालबागचा राजा, गिरगावचा राजा असते Happy

सिंबानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि डिटेल्स द्या. लोकं आणखी समर्पक नावे सुचवतील. घराजवळ एखादी नदी, जलाशय वा छोटामोठा समुद्र आहे का ते देखील सांगा.

तसेच आपण आस्तिक / धर्मिक टाईपचे आहात का? असल्यास कोणता देव मानता? तसे काही नाव आवडेल का? वा ईतर काही वैयक्तिक आवड?

एकांनी आपल्या आईवडिलांच्या नावावरुन ठेवलेल आई च नाव सरस्वती आणि वडिलांच राजाराम दोन्ही मिळुन सरस्वराज तसे काही जमतय का बघा

सौख्य
स्नेह

Re. : Simba ji

अमरावती (महाराष्ट्र) या शहरात छोटासा बंगला म्हणता येईल असं २००० sq.ft. प्लॉट मधील एक मजली घर आहे माझं. सध्या बांधकाम सुरु असुन १ महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता आहे.
घर शहराच्या तपोवन या भागात विद्यापीठ परिसराच्या बाजुला असुन जवळपास नदी किंवा इतर ठळक landmark नाही.
अमरावती शहरात अंबा देवी संस्थान आहे.
घरात मोठी बाग नसली तरी काही छोटी झाडं नक्कीच लावणार आहे. कुटुंब छोटेच आहे ५ व्यक्तींचे. घर कौलारू नसुन स्ल्याब वालेच आहे हो.

नाव धार्मिक चालेल पण जरा वेगळे असावे. भाषा शक्यतो मराठी, पण काही इतर भाषांतील शब्द असतील तरी चालतील. अगदी विदेशी भाषातील शब्द सुद्धा. उदा. जपानी शब्द "Kaizen" : continuous improvement. अर्थात सुचवलेला शब्द घरासाठी योग्य असावा. Kaizen is not suitable. Its just for example.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तुम्हाला एक सुचवू का? घराचे नाव शक्यतो साधे, सोपे ठेवा. ते नाव तुम्हाला असंख्य ठिकाणी वापरावे लागेल. रिक्षावाल्याला, टेंपोवाल्यालाही सांगावे लागेल.
आमच्या परिचयाचे एक जण राहतात, त्या इमारतीचे नाव 'शुक्राकार' आहे. फार कठीण नाही, तरीपण लोक त्याचे शुक्रवार, शुकाकार वगैरे करतात. तसंच 'ऑप्युलन्स' नावाचं 'अॅंम्ब्युलन्स' ही ऐकल आहे. असो.

मला सुचलेली नावे प्रयाग, प्रभात, नीरज, निवांत, सुरेख.
नविन घराबद्दल अभिनंदन. ह्या घरात तुमच्या कुटुंबाला स्थैर्य आणि सुख लाभू दे.

इंद्रप्रस्थ..जमतयं का बघा.

इंद्राच स्वर्गातल ठिकाणाचं नाव अमरावती आहे आणि तुम्ही ह्याच नावाच्या शहरात घर बांधताय म्हणून सुचवलं..

नविन घरासाठी अभिनंदन,नविन घरात तुम्हाला व कुटुंबियांना सुख,शांती लाभो.

"विसावा"
"सावली"
"स्वप्न्-पूर्ती"
"देवाश्रय"

एक्दम बेसिक्सः

१. श्रमसाफल्य.
२. मातृछाया
२. पितृछाया
३. <आई-वडिलांचे नांव> निवास
४. <तुमच्या आवडत्या देवाचे नांव> निवास
५. <अपत्याचे नांव>
६. सु+पत्निचे नाव
इ.

रच्याकने. आरारा प्रतिसादपुच्छ :

घराचे नांव काहीही ठेवून फारसा काहीही फरक पडत नाही.

फरक फक्त पोस्टमन व नावाची पाटी बनवून लावणार्‍यांना पडतो. नुस्तं १३/क, मुंदाणकर डेव्हलपमेंट लेऑट, अम्रावती, असा पत्ता लिहिला तरी पत्र येणारच अस्तं. त्याऐवजी, पाचपांडे पॅलेस, १३/क, मुंदाणकर डेव्हलपमेंट लेऑट, अम्रावती असं लिहून फार काय फरक पडत नाय Wink

क्रुपया नविन घरासाठी एखादे छानसे नाव सुचवा. इतिहास प्रसिद्ध एखादे नाव सुचवा. सह्याद्रि च्या पायथ्याला घर आहे.

काही इतिहासप्रसिद्ध नावे:
घराचा रंग लाल असेल तर लाल महाल
घराच्या दोन्ही बाजूस डोंगर असतील तर पावनखिंड
घर सह्याद्रीच्या कोकण बाजूस असेल तर कोकणकडा
राहणारे लोक सज्जन असतील तर सज्जनगड
अजून काही नावे - देवगिरी, हरिश्चंद्रगड, प्रतापगड

लेण्या देखील ऐतिहासिक आहेत, त्यामुळे कार्ले, भाजे, अजिंठा, वेरूळ
आणखीन ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे - सातारा, नाशिक, नाणे घाट

वरील कुठली नाही पटली तर तेवढं हडप्पा बसतंय का बघा.