सध्या अनेक वेबसाईटवर डोनेशनच्या जाहीराती असतात.कॅन्सर पेशंट,अतिशय गंभिर आजार असलेले लहान मुलं,दुर्धर आजार झालेले म्हातारे लोक यांचे फोटो किंवा त्यांच्या नातेवाईकांचे रडवेले चेहरे हे व्हिडीयो स्क्रोल करताना दिसत राहतात.अत्यंतिक करुण भाव या चलचित्रामध्ये असतात.माझ्यासारख्या संवेदनशील माणासाला बरेचदा हे विचलीत करणारे असते.
मी जमेल तशी अनेक पेशंटस्ना मदत केली आहे पण अलिकडे फेसबुक,इन्स्टा वगैरे सर्वच ठिकाणी या जाहीरातींचे पेव फुटलेले आहे.मला बरेचदा हा इमोशनल ब्लॅकमेलींगचा प्रकार वाटतो.ठराविक लोकांनी मदत केल्यानंतर त्यांच्या डिव्हाईसला या गोष्टी दिसणार नाहीत असे करावे हे ईमेल करुण सुचवले आहे. महीन्यातून किंवा दोन महीन्यातून एकदाच डोनेट करायचे ठरवले आहे.तुम्ही अशा वेबसाईटवर डोनेट करत असाल तर मोबाईल नंबर देऊ नका.व्हॉट्सपला मेसेज करत राहतात . आपल्या मगदूराप्रमाणे गरजूंना मदत जरुर करावी पण त्यामध्ये सक्ती नसावी.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
याबद्दल कालच डोक्यात आलं होतं
याबद्दल कालच डोक्यात आलं होतं.
हे करूण फोटो जनरली इम्पॅक्टगुरू वरचे असतात.(त्यांना वाटतं की प्रत्यक्ष फोटो पाहिल्यावर माणसं जास्त भावनिक दृष्ट्या रिलेट करतील आणि डोनेट करतील.)
खरं सांगू का, काही काळानंतर या करूण फोटोज ना पण मन मरतं. मी स्वतः हे इम्पॅक्ट गुरू च्या करुण फोटो सहित जाहिराती फेसबुकवर दिसायच्या तेव्हा मी प्रचंड शॉक होऊन डोनेट करायचे.
यात अजून एक बारकावा असा आहे की त्यात एक टारगेट रक्कम असते.सर्व जण त्या रकमेचा परसेंटेज मीटर भरताना पाहून प्रेरित होऊन डोनेट करतात.आणि 95% ला आल्यावर टारगेट वाढवून तो मीटर परत 10% ला येतो.हे लॉकडाऊन च्या काळात तृतीय पंथी लोकांसाठी गोळा केलेल्या फंड रेजर चं तीन वेळा झालंय.(यावरून 'लास्ट 10 पीस बचा है' म्हणून विक्री करून परत काही काळाने जादूने लास्ट पीस पैदा करणारा फेरीवाला आठवला का?)
त्यांचे प्रश्न खरे आहेत.शंकाच नाही.पण ते फोटो आणि वर्णन वाचून दुःख सेल करायला लागणं पटत नाही.
हल्ली स्वतःच्या अगदी चांगल्या ओळखीचे लोक ज्यात संबंधित आहेत अश्याच ठिकाणी डोनेट करते.
दान हे गुप्त असावं, सत्पात्री असावं, त्याने ज्याला दान केलं तो स्वयंपूर्ण बनावा, पांगळा बनू नये.
आणि इतके दानशूर लोक जगात असूनही ज्यांच्याकडे या मीडिया जाहिरातीची साधनं आणि माहिती नाही ते खेड्यातले शेतकरी अजूनही उभ्या पिकावर नांगर चालवतायत.25000 च्या कर्जासाठी आत्महत्या करतायत.afterall everything is about marketing.
मला यूट्यूबवर केट्टोच्या
मला यूट्यूबवर केट्टोच्या जाहिरातींच्या क्लिप्स दिसतात.
दुसऱ्या एका ठिकाणी आजारी मुलांसाठी मागे काही वेळा डोनेट केलं होतं. तेव्हा फोन नंबर रजिस्टर केला होता.
त्यांचे सतत फोन येत असतात. एक नंबर ब्लॉक केला तर दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरून. आता डोनेट करणं शक्य नाही हे सांगूनही येतात.
अशात कामाचा फोन ब्लॉक झाला.
केट्टो आणि इम्पॅक्टगुरु यांना
केट्टो आणि इम्पॅक्टगुरु यांना कमिशन मिळत असणार .हे जितकं सोपं वाटतं तितकं नसावं
अलिकडे फेसबुक,इन्स्टा वगैरे
अलिकडे फेसबुक,इन्स्टा वगैरे सर्वच ठिकाणी या जाहीरातींचे पेव फुटलेले आहे.>>> खरंय. त्यामुळे होतंय काय की मदत करण्याबाबत आपली संवेदनाच मरतेय.
माझ्या भावाच्या मृत्यूनंतर आई, दरमहा एक ठराविक रक्कम निरनिराळ्या संस्थांना देत असे.पण नंतर नंतर तिच्यावर अमुक आजारी आहे त्याला/तिला मदत करा च्या फोनकॉल्सचे प्रेशर वाढायला लागले.आधी तिला सांगितले की माझा कोटा पूर्ण झाला म्हणून सांग.त्यानंतर फोनकॉल ब्लॉक करायला सांगितले.अशाच काळात एक गृहस्थ घरी आले (दाराबाहेरच बिचारे होते).आपली अडचण सांगू लागले कागदपत्रे दाखवलीम्वाटले जे काय पैसे मिळतील ते दारूत उडवतील्,या हिशेबाने ५० रुपयेच दिले.काही महिन्यांनी ते परत आले आणि धन्यवाद देऊ लागले की तुम्हां लोकांनी केलेल्या मदतीमुळे बहिणीचे ऑपरेशन पार पडले.नंतर ते निघून्ही गेले.आम्हा दोघींना स्वतःचीच लाज वाटली.
ऑनलाईन जाहिराती-फोनवरून
ऑनलाईन जाहिराती-फोनवरून मागणारे परवडले पण ओळखीतील लोकच इमोशनल ब्लॅकमेल करायला लागल्यावर फार अवघड जातंय. मराठा मोर्चाच्या काळात आमच्या भागातल्या पोरांनी/लोकांनी काहीही कारणं देऊन दोनेक लाखाला चुना लावला. मुंबई-पुण्यात जायचा खर्च, नाष्ट्या-जेवणाचा खर्च, मुक्कामाची सोय, समाजाला तुमची आता खरी गरज आहे असली मोठी जंत्री तयार असायची दर खेपेला यांची. ती वेळच अशी होती की त्यातला फोलपणा माहीत असूनही नाही म्हणायची सोय नव्हती. प्रत्यक्षात मुंबईहून येताना दोनदा पनवेलला जाऊन मजा केली हे त्यांच्यातल्याच एकाने सांगितले. कमिटीकडे सगळा हिशोब आहे म्हणायचे पण तो काय अजून मिळाला नाही. शिवाय आमच्या सारखे अजूनही काही बकरे होतेच त्यांच्याकडे.
दान हे गुप्त असावं, सत्पात्री असावं, त्याने ज्याला दान केलं तो स्वयंपूर्ण बनावा, पांगळा बनू नये. > +१ याचा अजून एक फायदा म्हणजे वरच्यासारखे प्रसंग येत नाही कधी.
आईकडे 2 ग्रॅज्युएट विद्यार्थी
आईकडे 2 ग्रॅज्युएट विद्यार्थी आले होते.पालघर जिल्हा आदिवासींसाठी डोनेशन द्या म्हणून.त्यांना नंतर देऊ म्हटल्यावर एकदम उद्धट आवाजात 'काकू तुम्ही त्या एरियातून आल्यात तरी असं वागता.तुम्हाला कल्पना नाही का' वगैरे करायला लागले.मी आत होते.मग चार प्रेमळ शब्द सांगून हाकलून लावलं.
हेलपेज इंडिया चाही लोकांना तोच अनुभव आहे.
)
डोनेशन शक्यतो अनामिक करावं.मोबाईल नंबर न देता आला तर सर्वात उत्तम.नंतर ते डोनेशन 'यथाशक्ती' न बनता जबरदस्ती बनतं.
मायबोलीवरील मैत्री फाउंडेशन, rss चा वनवासी कल्याण आश्रम किंवा तुमच्या ओळखीचा माणूस ज्यासाठी काम करत असेल अश्याच ठिकाणी दान करावे या निर्णयाप्रत.
(मध्ये एक काळ माझ्यासाठी करियर मध्ये आणि माहेरच्या काही गोष्टींमुळे अत्यंत वाईट होता.त्यावेळी हे डोनेशन्स म्हणजे माझा 'कर्मा' होता.मी चांगले केले माझ्याकडे चांगले परत येईल वगैरे.आता असे काही भाबडे विचार मनात न ठेवता जमेल तसे, गरज जाणवेल अश्या ठिकाणी दान करते. आपण काही उद्योगपती नाही.उद्या एखादा इन्श्युरन्स मध्ये कव्हर नसलेला आजार झाल्यास आपला सर्व रिलॅक्स पणा आणि अकाऊंट रिकामा होणार आहे याची जाणीव ठेवून दान करते.
केट्टो आणि इम्पॅक्टगुरु यांना
केट्टो आणि इम्पॅक्टगुरु यांना कमिशन मिळत असणार .हे जितकं सोपं वाटतं तितकं नसावं>> साधारण ५% कमिशन असते. ( एका छोट्या गावात राहाणार्या गरीब शेतकर्याचे हार्ट सर्जरी करायची होती म्हणुन अश्या वेबसाइट द्वरा क्राउड फ़ंडिंग करायला सांगितले होते. थोडे फार पैसे जमा झाले . जे जमा झाले त्यीतिल ५% वजा करुन बाकीची रक्कम देण्यात आली. उरलेले पैसे आम्ही नातेवाईकानी दान दिले. )
मायबोलीवरील मैत्री फाउंडेशन, rss चा वनवासी कल्याण आश्रम किंवा तुमच्या ओळखीचा माणूस ज्यासाठी काम करत असेल अश्याच ठिकाणी दान करावे या निर्णयाप्रत. >> +१
युट्युबवरची जाहीरात पाहून
युट्युबवरची जाहीरात पाहून आम्ही २-३ वेळा सेन्ट ज्युडस कॅन्सर हॉस्पिटलला डोनेट केले.
@जिद्दूू. तुम्ही मराठा मोर्चा
@जिद्दूू. तुम्ही मराठा मोर्चा वाल्यांना २ लाख रुपये दिले? हे कसं झालं? त्यांनी indirectly प्रेशर आणलं का? शक्य असेल तर तुमचं नाव गुपित ठेवून तुम्ही याबद्दल जास्त लिहा.. मला आता फार curiosity आहे की हे कसं झालं.
मराठा मोर्चासाठी लहान-मोठ्या
मराठा मोर्चासाठी लहान-मोठ्या सर्वांनी शक्य तशी मदत केलेली आहे आणि नेलेली सर्वच रक्कम पोरांनी उडवली असाही आक्षेप नाहीये. आता बाहेरून जेवढी आपली समाजात पत त्या हिशोबाने मदत देणे क्रमप्राप्त होते ओघाने. ही रक्कम टप्प्या टप्प्याने गेलेली आहे. तिथे प्रेशराइज करून नेले असं म्हणता नाही येणार( तेवढी हिंमतही नाही कोनात)पण ही सर्व रक्कम फक्त त्या कामासाठीच वापरली जाणार नाही ही खात्री होतीच. मी स्वतः एक रुपया कोणाला देत नाही कधी. माझे वडील व्यावसायिक असल्याने ते पाहतात या सर्व गोष्टी आणि देऊ शकतात. मला एक्साक्ट नाही माहिती पण मराठा मोर्चा सांभाळणारे कोणीही नव्हते पैसे गोळा करत. त्यांनी नेमकी कोण लोकं नेमून दिली होती आमच्या भागात तेही नाही माहिती. आजुबाजुच्या चारपाच गावांतील प्रमुख युवानेते मंडळी गोळा करत होती(कदाचित त्यांचा मोर्चा सांभाळणाऱ्या लोकांशी सम्बन्ध नसेलही आणि ते स्वतंत्र काम करत असतीलही). पुढे ती त्यांच्यात्यांच्या गावातील/मळ्यातील/वस्त्यांवरून लोकांना मोर्चाला न्यायची. तुम्हाला एक्साक्ट काय हवे ते सांगा म्हणजे मग विचारून सांगतो.
(अवांतर- माझा जातीनिहाय आरक्षणाला विरोध आहे. थोड्या प्रमाणावर आर्थिक मुद्यावर देणे ठीक आहे जेणेकरून ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना मिळेलच दोन्ही निकषांत बसत असल्याने.)
मला वाटते एकदा मदत केली आणि
मला वाटते एकदा मदत केली आणि त्यांच्याकडे हा रेकॉर्ड पोहोचला तर ते आणखी पिडत असावेत.
अर्थात हे ऑनलाईनच कश्याला घरी मदत मागायला येणारयांमध्येही आढळते. कुठे पैसे दिले आणि रीतसर फॉर्म वगैरे भरला तर ते दरवर्षी वा ठराविक काळाने नित्यनेमाने घरी येतात. अर्थात यात वईट काही नाही. फक्त असे फॉर्म वगैरे भरून मदत करताना हे लक्षात ठेवावे. कारण मदत कमी करा वा जास्त आनंदाने आणि स्वेच्छेने व्हायला हवी.
@ ईम्पॅक्टगुरू .. तिथे काही देण्याऐवजी ज्याला द्यायचेय त्याचे शक्य असल्यास बॅंक डिटेल मागवून घ्यावेत आणि थेट मदत करावी.
@ मराठा मोर्चा .. हे
@ मराठा मोर्चा .. हे पहिल्यांदाच कानावर पडतेय. दोन लाख खरेच मोठी रक्कम आहे. किंबहुना असे किती जणांकडून कोणी कोणी घेतले असतील याचाच विचार करतोय..
पण मिळालेय ना फायनली आरक्षण? तसे असल्यास पैसा अगदीच वाया गेला नाही समजावे आणि पाणी सोडावे
अगदी चूक आहे असे म्हणता येणार
अगदी चूक आहे असे म्हणता येणार नाही पण आपण खात्री करून दान दिलेले केव्हाही चांगले।
ऋन्मेष, ग्रामीण भागांतून एवढी
ऋन्मेष, ग्रामीण भागांतून एवढी लाखो लोकं मोठ्या शहरांत प्रत्येक मोर्च्यासाठी आणायला मोठी रसद लागते. सर्वच लोकं स्वतः एवढा खर्च नाही करू शकत. राजकारण्यांची रसद मर्यादितच होते एवढ्या लोकांच्या मानाने. मुळात गावाकडील लोकं कोणी काम सोडून येत नाहीत पण आरक्षणाचा फायदा होईल या आशेने आली होती. बऱ्याचदा पैसे देऊन मराठाच काय नॉन-मराठा लोकही बसगाड्यांत भरली जायची. दोन लाख एवढीही मोठी रक्कम नाही पण माझा सांगायचा हेतू मोर्चा-आरक्षण नसून वेगळा होता.
अवांतराबद्दल क्षमस्व
मी अशा जाहीरातींना बळी पडत
मी अशा जाहीरातींना बळी पडत नाही, समोर दिसलं तर मदत करायची इतकं मात्र करते
अलिकडे फेसबुक,इन्स्टा वगैरे
अलिकडे फेसबुक,इन्स्टा वगैरे सर्वच ठिकाणी या जाहीरातींचे पेव फुटलेले आहे.>>> खरंय. त्यामुळे होतंय काय की मदत करण्याबाबत आपली संवेदनाच मरतेय.>>>> अगदी खरय.