वय

Submitted by यतीन on 23 August, 2019 - 01:28

आत्ता माझ वय नुकतंच पाचावर एक झाल।
पण एकावरचं पाच वयाच सगळ आठवल।।

पुढच पाठ मागच सपाट असचं सारख होत राहिलं।
मग डोळ्याला झापडं लावून मागच बघाव वाटलं।।

तेव्हा पायांनी मित्रांचे उबंरे रोजच्या रोज झिजविले।
आता एक उबंरा बांधता बांधता पाय हे हेलपाटले।।

सारे मित्रांचे उबंरे झिजवता झिजवता मन सुखावले।
आता तर मित्रांकडे रोजच्या रोज जाणेच विसरले।।

तेव्हा लांबच सुध्दा डोळ्यावर चष्मा नसता दिसायचे।
आता चष्मा लावून डोळे फाडून बघाव लागत जवळचे।।

मिश्या नसता रग होती, छाती नसता उरात जिगर होती।
आता पांढऱ्या मिश्या पण सुकलेल्या, उर तर ढेरीत लपती।।

तेव्हा बोलण्यात दम, काम करायची उर्मी असायची।
आता बोलण्यात घेवडा, कामात फक्त गुर्मी बोलायची।।

आजून लहान होऊन लाहानंतल लहानपण असते आठवीले।
मोठ्यातल मोठेपण विसरून लहानपण असते जगविले।।

*यश*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच! मला माहिती नाही.. मला तुमच्यासारखं माझ्या चांगल्यावाईट गुणांना तटस्थपणे कधी पाहता येईल..

वाढदिवसाच्या शुभेच्छा! Light 1 Happy