पाऊस

Submitted by यतीन on 3 September, 2019 - 07:27

सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!
काळे घनघोर हे नभ स्पर्धा करता कुणाशी!!

नुसता आवाजांचा गडगडाट
विजांचा नुसताच लखलखाट
काळ्याकुट्ट ढगांनी ऊन्हावर केली सरशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!

पावलोपावली मातीचा सुगंध दरवळला
तळपत्या ऊन्हाला अनमोल श्वास मिळला
नाते पुन्हा जुळले पावसाचे धरणीशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!

वा-यांनी वादळाशी सलगी केली
नभांनी पण हात मिळवणी केली
बहरणा-या सरींनी साद दिली पटदीशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!

पावलांना आडोसा शोधावा लागला
छतावरच्या पन्हाळीला सुर गवसला
कागदाची होडी तरंगली सलगी करत पाण्याशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!

रोमरोमात शिरशिरी भरली
समुद्राला पण भरती आली
पावसाची गट्टी जमली आता धरणीशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!
काळे घनघोर हे नभ स्पर्धा करता कुणाशी

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users