झाड -

Submitted by यतीन on 19 September, 2019 - 02:07

एक झाड फळ न देताच झरझर वाढतय
काळोख्या सावलीत भविष्य रेखा शोधतय

शेंड्याला फिकीर न चिंता मुळाशी
काय बांधून ठेवलय याच्या ऊराशी

सळसळत्या फांद्याना फुटलाय पान्हा
फुलांच्या कोशात जन्माला येतोय तान्ह्या

झुळझुळ वा-यात सळसळतात हिरवागार पान
मोहर मोहरून आला देत कोकीळेची तान

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users