ऍलोपथी

जनरल मोटर्स डाएट प्लॅन

Submitted by काउ on 30 April, 2015 - 09:33

जनरल मोटर्स डाएट प्लॅन कुणी वापरला आहे का ?

यात सात दिवसाचा प्प्लान असतो. प्रत्येक दिवशी ठराविक पदार्हच अलाउड असतात.

यात एक कोबी सूपही असते. ते कुणी केले आहे का ?

Diet and health program

Seven day weight loss program.

This program is designed for a target weight loss of 10 –12 lbs. Per week. This aims at fat loss and not muscle loss to avoid fatigue due to weight reduction. It is designed to flush the system of impurities and give you a feeling of well being.

कॅल्शियमचे स्त्रोत

Submitted by मी अमि on 10 March, 2015 - 01:55

कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत?

one meal a day

Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01

दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?

एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?

http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...

शब्दखुणा: 

रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

Submitted by आनन्दा on 12 September, 2014 - 09:17

सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली.

प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू -

थांबता हृदय हे......

Submitted by SureshShinde on 8 September, 2014 - 11:42

arrest.jpg

"हृदयक्रिया थांबल्यानंतर पुढे काय?'' अर्थात "हृदयक्रिया बंद पडून मृत्यू'' या विषयावर अनेक लेखक, नाटककार, चित्रपट पटकथा लेखक व तत्ववेत्ते यांनी खूप लिखाण केलेले आपण वाचले असेलच, पण हृदयक्रिया बंद पडल्यानंतर म्हणजेच लौकीक अर्थाने मरणानंतरही पुन्हा जीवंत होऊन उत्तम आयुष्य जगण्याची किमया फक्त डॉक्टरच पाहू शकतात, घडवू शकतात. माझ्या पेशंटच्या बाबतीत असे प्रसंग अनेकदा घडले व त्यातील काही रुग्णांच्या हृदयांनी घेतलेल्या 'छोट्याशा विश्रांती' विषयीच्या या गोष्टी आपणाला निश्चितच आवडतील.

विषय: 

औषधे उदंड, नियंत्रण शून्य

Submitted by शांताराम०१ on 24 August, 2014 - 14:12

आयुर्वेदीक व होमियोपॅथीवर ओरड करणारे ठरावीक लोक नेहेमी सांगत असतात की अ‍ॅलोपॅथीचीच औषधे ही
प्रमाणित, संशोधित आणि खात्रीशीर असतात,

येथेच जर एखादा सदस्य भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल सांगतो तेंव्हा काही डॉक्टर मंडळींना लोकांच्या आरोग्याचा उमाळा येतो आणी ते म्हणतात असे काही प्रयोग करु नका, कराल तर जिवाला मुकाल !!!

येथे खोळंबला मृत्यू !

Submitted by SureshShinde on 16 August, 2014 - 06:41

yamrajc.jpg

"माधुरी, ही फळांची पेटी कोणी आणली बरे ?"
घरामध्ये प्रवेश करताच समोरच असलेली मोठी पेटी पाहून मी आश्चर्याने विचारले. अनेक पेशंट अश्या काही वैशिष्ठ्यपूर्ण भेटवस्तू घरी आणून देत असत की त्यावरून कोण पेशंट घरी येऊन गेले ते पटकन लक्ष्यात येत असते. भाजी म्हणजे बोडकेदादा, कांदे म्हणजे रामकरबाई, लसूण म्हणजे रायकर तसेच फळांची पेटी म्हणजे एकतर पेशवेसाहेब नाहीतर अमित!

विषय: 

तुझे आहे तुजपाशी.... अर्थात् एका देवदूताची कहाणी !

Submitted by SureshShinde on 11 August, 2014 - 15:02

cvsSurg.png

"सुरेश, या बाळाचे आईवडील दोघेही गोरे पान पण मग बाळ असे काळे कसे?"
आमच्या सोसायटीमधील वाडेकरांचे बाळ पाहून येत असताना माझी आई मला म्हणत होती.
"अग आई, तू पण न ..जरा जास्तच स्पष्टवक्ती आहेस. बरे तरी त्या दोघांच्या समोर म्हणाली नाहीस हे नशीब!" मी थोडेसे चिडूनच म्हणालो.
"अरे मला जे दिसले ते तुला सांगितले. मी त्यांना सांगायला काय मूर्ख आहे की काय?"
आमचे हे संभाषण येथेच संपले आणि मी तर लगेच विसरूनही गेलो. पण माझ्या आईची निरीक्षणशक्ती आणि अनुभव किती जबरदस्त होता याची प्रचिती मला अजून येणार होती.

विषय: 

दिव्यत्वाची जेथे प्रचिती ...

Submitted by SureshShinde on 31 July, 2014 - 12:47

s-hospital-prasanthigram.jpg

पुण्याहून वेल्हेमहाल येथे जाणाऱ्या एस.टी.च्या रस्त्यावर साखर नावाचे एक छोटेसे गाव लागते. तेथून आतमध्ये कच्च्या रस्त्यावर आहे एक वाडी - 'भोसलेवाडी'.

विषय: 

कानामागून आली

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 30 March, 2014 - 08:55

१५ एप्रिल २०१३. सायंकाळी सातची वेळ. मी आणि पत्नी, तिचा आवडता अभिनेता - राजीव खंडेलवालचा "साऊंडट्रॅक" चित्रपट पाहत होतो. या चित्रपटात नायकाचा एक कान पूर्ण बधीर होतो आणि दुसर्‍या कानाला जेमतेम ३० टक्के श्रवणशक्ती राहते असा एक प्रसंग आहे. पुढे तर नायक पूर्णच बहिरा होतो. अर्थात त्याच्या या कमतरतेवर मात करूनही तो उत्तम संगीतकार म्हणून स्वत:ला सिद्ध करतो असे काहीसे चित्रपटाचे कथासूत्र आहे. तर आम्ही हा चित्रपट व्यवस्थित Enjoy केला. चित्रपट पाहतच रात्रीचे भोजनही उरकले आणि अचानक रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने तक्रार केली की तिला एका कानाने अजिबात ऐकू येत नाहीये.

Pages

Subscribe to RSS - ऍलोपथी