फिशिंग संबंधी माहीती हवी आहे.

Submitted by मी-माझा on 28 May, 2019 - 22:49

मला फिशिंग (म्हणजे मासेमारी, लोकांना ई-मेल पाठवून फसविणे नव्हे :D) करायला आवडते. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य (फिशिंग रॉड्स, ल्युर्स इत्यादी) माझ्याकडे आहे.

मुंबई, नवी-मुंबई, ठाणे या पट्ट्यात माबोवरील कुणी फिशिंग करणारे राहतात का?

तुमच्या माहितीत एखादा फिशिंग करणारा गट असेल तर त्यांची माहिती मिळू शकेल का?

नवी मुंबई, मुंबई , ठाणे या भागात अशा फिशिंगला अनुकूल अशा जागांबद्धल कुणी माहिती देऊ शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चार पाच वर्षांपूर्वी एक जाहिरात पाहिली होती, मुंबईच्या जवळच एक जागा आहे ती खास फिशिंगसाठी बनवले. एक माणूस मस्त तळ्यात मासे पकडताना दाखवला होता. गळ वैगरे सगळं तेच प्रोवाईड करत असावेत. गाडी वेगात असल्यामुळे व्यवस्थित वाचता नाही आलं, नन्तर नेटवर सर्च केलं पण काही माहिती नाही मिळाली.

Submitted by उपाशी बोका on 29 May, 2019 - 08:26
कृपया विपु पहा, चर्चा भरकटू नये म्हणून तुम्हाला विपु वर उत्तर पाठवले.

धन्यवाद बोकलत भाऊ , होय त्या प्रकारची कृत्रिम तळी काही लोकांनी तयार केलीत. पण त्यात मजा नाही.
मी फिशिंगसाठी अशा जागांच्या शोधात आहे जिथे जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण असेल.

शिवाय खाडीत/समुद्रात जे मासे मिळतात त्यांची चव गोडया पाण्यातील माशांना नाही.

फिशिंग साठी सुरुवात छोट्या तळ्यांपासून करू शकता. मी लोणावळ्याला एका तळ्यात केले आहे. बारा महिने पाण्याच्या जागा शोधून पहा. स्थानिक लोकांना विचारत जा. मावळात भोई आणि कातकरी समाजाचे लोक मासेमारी करतात. कोकणात समुद्रावर किंवा खाडीत देखील करता येते पण त्याला वेगळे बेट आणि दोर पाहिजे. मोठ्या माश्यांना जास्त ताकद असते. प्रत्येक माशाचे खाणें, त्याच्या वेळा आणि जागा यांची माहिती पाहिजे. प्रदूषित पाण्यातले मासे खाऊ नका. पाणी प्रदूषित असेल किंवा आईसबॉक्स नसे तर पकडून लगेच सोडू शकता. साप आणि पाण्यात बुडणे यापासून सुरक्षित राहा. पोहणे मस्ट आहे. समुद्रात छोट्या होड्यांमधून जाऊन पण मासे पकडता येतात. पण त्यात अजून बोट चालवायचे स्किल लागतात. शुभेच्छा!

मी मासे-खाऊ नाही पण ऐकुन आहे की नवख्या माणसांना गप्पी मासे पकडणे सोपे पडते.. कोणत्याही नाल्यात मुबलक प्रमाणात असतात. तिथे ट्राय मारु शकता.. जमेल..!

वाशीचा जुना खाडीपूल माहीत असेल. तिथे सकाळी लवकर गेल्यास मासे गरवणारे भेटतील. तिथलेच कोळी सकाळचा हा उद्योग करतात, तुम्ही विचारलेत तर आनंदाने मार्गदर्शन करतील. सकाळी 7 8 च्या सुमारास जायला हवे.

वाशी व ऐरोली खाडी सध्या फ्लेमिंगोनी गुलाबी केलीय. तोही आनंद घ्या.

मी मासे-खाऊ नाही पण ऐकुन आहे की नवख्या माणसांना गप्पी मासे पकडणे सोपे पडते.. कोणत्याही नाल्यात मुबलक प्रमाणात असतात. तिथे ट्राय मारु शकता.. जमेल..!

नवीन Submitted by DJ.. on 29 May, 2019 - 10:07
>>> धन्यवाद, मी नवखा नाही. माझ्याकडचे साहित्य मोठ्या माशान्साठीचे आहे. नव्या आयडीबद्धल शुभेच्छा.

@साधना, सुचनेबद्धल धन्यवाद, पुढील वीकान्तला नक्कीच भेट देतो त्या ठिकाणाना. एका मित्राने सुचविल्यप्रमाणे या विकान्ताला अक्सा बिच, व गोराइ परिसरात ट्राय करुन बघणार आहे.

Submitted by चिडकू on 29 May, 2019 - 09:57

>> धन्यवाद. आतापर्यन्त मी फक्त गावी गेलो की फिशिन्ग करत असे. सध्या तरी मुम्बैच्या आसपसच्या समुद्र व खाडी यान्तच फिशिन्ग करण्याची इच्छा आहे.
तुम्ही सन्गितलेल्या सुचना नक्कीच अमलात आणेन

अक्स किंवा गोराई हे समुद्रकिनारे आहेत, इथे मासेमारी करण्यासाठी होडी घेऊन समुद्रात उतरावे लागेल.

आता ह्या दिवसात समुद्रात उतरणे कितपत सुरक्षित असावे शंका आहे, बहुसंख्य मच्छीमार या दिवसात होड्या किनाऱ्याला लावून ठेवायच्या कामात असतात.

वाशी खाडीपुलावर तुम्हाला थेट पाण्यात गळ टाकता येईल. आणि तिथे बऱ्यापैकी मोठे मासे मिळतात हे मी स्वतः पाहिले आहे.

वाशी नवी मुंबई ठाणे परिसरातील खाडीतील पाण्यात रसायने मिसळलेली असण्याची भरपूर शक्यता आहे. औद्योगिक बेल्ट मुळे. तर जे मासे पकडाल त्यांत पण केमिकल्स अस्तील. मर्क्युरी असणे सर्वात जास्त घातक आहे.

कोकण पट्ट्यात निसर्ग टुरिझम चालवणा रे लोक फिशिन्ग उपलब्ध करून देत असतील. फिशेस आहेत कि नाही त्यापेक्षा पाण्याचे सोर्स नैसर्गिक व प्रदुष ण मुक्त आहेत कि नाही हे आधी चेक करून मगच गळ घाला. ऑल द बेस्ट.

फिशिंगचे काही ज्ञान नाही.
जिथे जाल तिथले लोकल कोळी मित्र सांगू शकतील.

अक्सा बिच --- कुटुंबासह गेलात तर बीच थोडा धोकादायक स्वरूपाचा आहे हे कृपया लक्षात ठेवा.
पायाखालची वाळू सटकणे, पाण्याची ओढ यामुळे अपघात होणारा बीच आहे.
खोल पाण्यात मस्ती न करणे श्रेयस्कर. अन्यथा लोकल जाणकार / पट्टीचा पोहणारा तरी सोबत हवा.
लोकल ग्रामस्थांनी / किनार्‍यावरील सुरक्षा रक्षकांनी अमुक ठिकाणी पाण्यात जाऊ नका म्हटल्यास ते पाळणे हिताचे.
स्वतःला सुरक्षित ठेवून हौस भागवा, ही विनंती.

एकांतात गेलात तर खायचे मासे गळाला लागतील.
विकांतात गेलात तर सर्व मासे किनाऱ्यावर फिरताना पहायला मिळतील.
चॉइस इज युवर्स !

एकांतात गेलात तर खायचे मासे गळाला लागतील.
विकांतात गेलात तर सर्व मासे किनाऱ्यावर फिरताना पहायला मिळतील.
चॉइस इज युवर्स !

नवीन Submitted by वीक्ष्य on 29 May, 2019 - 17:11 >>

Lol

महाबळेश्वर जवळ तपोळा लेकला एकदा मुलांनी फिशिंग केल होत. पण लोकल माणसाने सर्व अरेंज केल होत. अनुभव मस्तच होता

सही!!!
थोडे venue उद्या वि पु मध्ये देईन.

रच्याकने..
sopts सहजा कोणि शेयर करत नाही.

प्रदूषणाबाबतीतले विचार पटले. मासे पकडून पुन्हा सोडून देईन.>>>>> तसे नका करु प्लीज.तुम्ही खाणार असाल तरच मासे पकडा हो.माशांच्या टाळ्यात घुसलेला गळ काढून परत मासे समुद्रात सोडलेत तर केवळ थ्रीलसाठी त्यांना वेदना कशाला?

There are two types of hooks for angling... barbed hook is generally used for all Fish that can't be easily drawn throw fish's thoracic region but for Fish like tuna the general practice is angling with special hooks those are not barbed and can be withdrawn easily after Fish get caught. The tuna fishing technique is scientific and well established but the same can be use for fun purpose / only enjoyments of angling and not the actual capture of Fish one can try those hooks.

तुम्ही खाणार असाल तरच मासे पकडा हो.माशांच्या टाळ्यात घुसलेला गळ काढून परत मासे समुद्रात सोडलेत तर केवळ थ्रीलसाठी त्यांना वेदना कशाला? >>> माझ्याकडे विक्ष्य यान्नी लिहिल्याप्रमाणे सर्क्युलर गळही आहेत जे मासे पुन्हा सोडुन द्यायचे असल्यास वापरले जातात.

मलाही फिशिंग आवडत पण अजून आमच्या विहिरीतील मासा काढण्या व्यतिरिक्त मी केलेले नाही.

नेरूळ-वाशीत कारावे-दारावे गावे चांगल्या माशांसाठी प्रसिद्ध आहेत. खाड्या आहेत तिथे. तिथे चौकशी करा.

आता पाऊस येईल आणि उधाण येईल तेव्हा गाभोळी भरलेली चिवणी येतात ती पकडण्यासाठी खाडित, शेतांमध्ये गर्दी असते. आता शेती तेवढी राहीली नाही. पूर्वी माझ्या माहेरी आमच्या घरासमोरच्या शेतात चिवणी यायची. तिथे माणसे जाळे (आसू) आणि गळाने चिवणी पकडायची. आता ते शेत गेल तिथे घरे झाली आहेत.

मजा यायची तेव्हा माझा भाऊही जायचा पकडायला. गळाला गांडूळ किंवा पिठ लावायचे मग पटकन मासे यायचे.