हस्तकला
हस्तकला स्पर्धा - शिवणकाम ( मास्क ) - शुगोल
मी क्रोशे विणकाम करुन मास्क बनवला आहे.
खालील साहित्यात अस्तराचं कापड दाखवलं नाहीये. इथे muslin cloth या नावाचं अगदी तलम आणि porous असं १००% कॉटनचं कापड मिळतं ते वापरलं आहे.

लोकर सुद्धा पूर्णपणे कॉट्नची अशीच वापरली आहे. Variegated color असलेली लोकर आहे.
प्रकाशचित्रात चार ओळी विणून झालेला अपूर्ण मास्क दिसतोय.

हस्तकला स्पर्धा २- बुकमार्क बनवणे- ओजस
यावर्षी बुकमार्क बनवणे हि जरा वेगळी स्पर्धा वाटली. आंतरजालाचा आधार घेत बुकमार्क बनवले आहेत. कसे वाट्ले ते जरुर सांगा.
कलर पेपर, स्केच पेन वापरुन बनवला आहे.

मधुबनी बुकमार्क बनवण्याचा प्रयत्न:-
कार्ड्शीट , क्रेयान कलर, स्केच पेन वापरुन बनवला आहे.
हस्तकला स्पर्धा २- बुकमार्क बनवणे- गट अ-पाल्य-ओजस
चिरंजीवांनी बनविलेला कार्नर बुकमार्क .
साधा पेपर, क्रेयान कलर वापरुन बनवला.
नाव - भृगु
वय- ९ वर्षे


श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा : आर्यन (गट अ, वय १० वर्षे)
गट : अ
नाव : आर्यन पाटील
सहित्त्य : रंगीत कागद आणि डिंक
१)
२)
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - गजानन
गट ब प्रवेशिका
मायबोली आयाडी: गजानन
बालोपासना (श्रीकलावतीदेवी)

बुकमार्क स्पर्धा - मनिम्याऊ- ब गट
Pressed flowers bookmark
साहित्य: प्रेस्ड फुले, पुठ्ठा, जुन्या कुर्त्याचे कापड्, फ़ेविकोल
पुठ्ठा आयाताआकृति कापून घेतला.
त्यावर कापड व्यवस्थितरित्या चिटकवून घेतलं
प्रेस्ड फ़ुले चित्राच्या आकारात चिटकवली
.
हस्तकला स्पर्धा - {शिवणकाम} - बाप्पांसाठी मास्क
मास्क म्हणलं की आधी ते चित्रपटातले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही म्हणणारे हिरव्या मास्कवाले डॉक्टर आठवतात. मास्क मध्ये पण बरेच प्रकार आले. मॅचिंग मास्क, कपल मास्क, फेस प्रिंट मास्क इ.
दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला ज्यात एक छोटी मुलगी बाप्पांची मूर्ती घेऊन लपून बसते. आई विचारते तेव्हा म्हणते आपण गणपती बाप्पांना बाहेर घेऊन गेलो तर त्यांनाही कोरोना होईल ना?
श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा - कु. विजयालक्ष्मी (गट अ, वय ३ वर्षे १० महिने)
पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय : ३ वर्षे १० महिने
खरंतर बुकमार्क स्पर्धेत भाग घ्यायचा विचार माझा होता. ब गटात. आज फ़ुरसत मिळाली आणि क्राफ्टचा डबा उघडला. पण आई काही करायला लागली की लुडबूड करण्याचा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क असतो. तेव्हा आधी तिने बनवलेला बुकमार्क दाखवते.
साहित्य
रेडिमेड कपड्यान्चे प्राईस टॅग पुठ्ठे
आईचा जुना कुडता
कात्री
फब्रिक ग्लू
फैब्रिक कलर
भेंडी
हिरवा मार्कर पेन
जूना कुडत्याचे कापड कापून प्राईस टॅग वर चिटकवले. त्यावर फैब्रिक कलरनी भेंडीचे छापे मारले. मार्करने दांड्या रंगवल्या



*
*