भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भाग व आरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.
स्टॉकहोममधल्या आमच्या भटकंतीचा तो दुसरा दिवस होता. स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी. सर्वच युरोपियन राजधान्यांच्या शहरांमध्ये इतकं काही बघण्यासारखं असतं की एक वारी कमीच पडते. त्यात कला, स्थापत्यशास्त्र, इतिहास, म्युझियम्स सगळ्यांतच रस असेल तर आणखीच धांदल उडू शकते. तुम्हाला केवळ भोज्यांना शिवायचं आहे, की निवांत आरामात फिरत एक-एक गोष्टी पहायच्या आहेत यावरही बरंच अवलंबून असतं. ज्याचा त्याचा आपापला पर्यटकी choice. आम्हाला निवांत फिरायचं होतं. अमुक इतक्या गोष्टी बघायच्याच आहेत असा आमचा आग्रह नव्हता. एखादं म्युझियम आवडलं तर तिथेच ३-४ तास घालवण्याची आमची तयारी होती.
मेहनत करणे... खडतर परिश्रमांनंतर यश मिळणे, हे चांगलंच ! परंतु श्रमाला, यशाला, कलेला, त्याहूनही कलाकाराला ओळख मिळणे ही फार मोठी गोष्ट..
एका शिल्पकाराची गोष्ट
-----------------------------------------------------------------