कविता -आयुष्याचा ताळेबंद

Submitted by रजनी भागवत on 30 May, 2020 - 15:45

असेच एकदा बसल्या बसल्या
विचार आला मनी
मनुष्यजन्माच्या प्रवासाची करू
गोळाबेरीज या क्षणी..

बेरीज ,वजाबाकी,गुणाकार नी भागाकार
याचा ताळेबंद बसता बसेना
आणि आयुष्याचे गणित माझ्या
काहीकेल्या सुटेना...

बेरीज म्हणजे अधिक
तर वजा म्हणजे उणे
अधिक क्षणां पेक्षा जास्त
उण्यानेच भरले माझे रकाने......

सुखाचा गुणाकार जमेना
आणि दुःखाचा भागाकार येईना
आणखी काय सांगू मैत्रिणींनो
आयुष्याचे गणित माझे
मला काही उमजेना
मला काही उमजेना........

रजनी भागवत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users