गिफ्ट

बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे?

Submitted by पाथफाईंडर on 16 January, 2018 - 12:39

मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)

ऑनलाइन गिफ्ट ऑर्डर

Submitted by ज्ञाती on 3 August, 2014 - 21:38

मला एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गिफ्ट पाठवायचे आहे. ती दुसर्‍या राज्यात असल्याने ऑनलाइन निवडून पाठवणे सोयीचे पडेल जसे फुले किंवा गिफ्ट बास्केट.
तुम्ही याकरिता कुठल्या साइट वापरल्या असतील आणि अनुभव चांगला असेल तर इथे लिहा. धन्यवाद!

मला ७ ऑगस्ट ला तिला सनीवेल मध्ये मिळेल असे गिफ्ट पाठवायचे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

नातेवाईकांकडून भेट आणि इन्कम टॅक्स

Submitted by स्वाती२ on 2 April, 2014 - 07:24

भेट / गिफ्ट म्हणून मिळालेली रक्कम ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल/ वस्तूची किंमत ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल तर भेटीवर इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण भेट नातेवाईकांकडून असेल तर असा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. यात नातेवाईक म्हणजे कोण क्वालीफाय होते त्याबद्दल माहिती हवी होती. जालावर शोधले पण गोंधळ उडाला. जाणकार मायबोलीकरांनी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गिफ्ट