उद्योजक

स्पेसएक्स - मंगळ ग्रहावर पहिल मानवी पाउल ...

Submitted by morpankhis on 18 January, 2017 - 10:37

स्पेस एक्स, टेस्ला मोटर्स आणि मस्क :

मंगळ ग्रहावर जर पहिला मानव कोणी नेईल तर असा विश्वास वाटतोय ते काम स्पेसएक्स (SpaceX) च करेल...

मी अगदी सुरवाती पासुन मस्क साहेब व ते करत असलेल्या कामचा फॅन आहे...
त्यांच्या पेपाल च्या स्थापने पासुन ते SpaceX पर्यंत चा प्रवास मला तरी थक्क करतो..

NDTV चा कोट्यावधीचा घोटाळा; एक दडपलेली बातमी

Submitted by मिलिंद जाधव on 25 December, 2016 - 12:15

गेली २५ वर्षे मिडीयावर सतत स्वच्छ , मॉरल कंडक्ट, बिझीनेस एथिक्सचा राग आलापणार्या प्रणय रॉय यांचे उद्योग !!

एन्डीटीव्हीच्या मालक श्री प्रणय रॉय व त्यांच्या पत्नी राधिका रॉय ह्यांना आयकर विभागाने ५३.८४ कोटी रु च्या हेराफेरी बद्द्ल पकडल आहे. ही रक्कम ह्या दोघांनी कंपनीच्या एकॉउंट मधुन स्वतःच्या बँक खात्यात टाकलेली होती. ऐनफोर्समेंट डायरेक्टोरेट व दिल्ली पोलिसांची ईकॉनॉमिक ऑफेंस विंग ह्या केस वर काम करत आहे. ह्या दोघांची RRPR Holdings (Radhika Roy Prannoy Roy) नावाची अजुन एक शेल कंपनी सुद्धा आहे. ह्या
कंपनीतील मालकी हक्क (प्रत्येकी ५०% ) ह्या दोघांकडेच आहे.

शब्दखुणा: 

तडका - व्यवस्थेतील तिमिर

Submitted by vishal maske on 21 December, 2016 - 09:01

व्यवस्थेतील तिमिर

सहज सांगता येत नाही
की कोण किती लबाड आहे
सुरतच्या चहावाल्याकडेही
दोन हजार कोटींचं घबाड आहे

कसं आलं अन् कुठून आलं
हि गोष्टही मोठी गंभीर आहे
कोणीही घबाड कमवु शकतो
हा तर व्यवस्थेतील तिमिर आहे,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

तडका - कायद्याचा खुटा

Submitted by vishal maske on 15 December, 2016 - 07:23

कायद्याचा खुटा

वेग-वेगळ्या ठिकाणी
रोज धाडी पडू लागल्या
रोकड जप्तीच्या घटना
दिवसें-दिवस वाढू लागल्या

काळा पैसा पांढरा करण्या
कित्तेकांचा आटा-पिटा आहे
पण गैरव्यवहार टाळण्यासाठी
कायद्याचा आडवा खुटा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डिजिटल धोका

Submitted by vishal maske on 12 December, 2016 - 08:38

डिजिटल धोका

व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले

व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोबतीची खुमखुमी जिरली असावी

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 December, 2016 - 12:46

कल्पनेची वीज लखलखली असावी
जीवघेणी ओळ अवतरली असावी

कळकले आयुष्य हिरवट झाक आली
दे नवी कल्हई जुनी विरली असावी

सांजवेळी रक्तिमा पसरे नभावर
आठवांची काढली खपली असावी

वाट एकाकी निघाली निग्रहाने
सोबतीची खुमखुमी जिरली असावी

हुंदके देते कधी रडते मुक्याने
भूल आभाळासही पडली असावी

धावते नाते अचानक ठप्प झाले
चेक कर व्हॅलिड़ीटि सरली असावी

झाड तर होते तिथे निश्चल उभे हे
वादळाने वेल उन्मळली असावी

वेळच्यावेळी स्वतःची काळजी घे
मौज घे जिथवर सहल ठरली असावी

घाला विस्मरणाचा पडतो

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 November, 2016 - 03:21

आठवणींचा ऐवज जपतो
घाला विस्मरणाचा पडतो

भुकंप येतो मतभेदांचा
पाया विश्वासाचा खचतो

माणुसकीचे कर्ज काढते
पिढया-पिढ्यांचा हप्ता थकतो

गळा घोटते नैराश्याचा
जन्म नव्या इच्छेला मिळतो

निकड भासते अभिव्यक्तीची
गल्ला कल्पकतेचा फुटतो

आर्त तान घेतो हा कोकिळ
विरहाचा मोहर घमघमतो

समिधा आसक्तीची पडते
वैराग्याचा यज्ञ भडकतो

सुप्रिया

तडका - पश्चाताप

Submitted by vishal maske on 18 November, 2016 - 08:29

पश्चाताप

कुठे अग्नीत तर कुठे
पाण्यामध्ये बुडू लागला
अंधारातला काळा पैसा
आता बाहेर पडू लागला

म्हणूनच तर नोटाबंदीचा
कुणाला रागही आला असेल
अन् अंधाराचा पश्चाताप तर
काळ्या पैशालाही झाला असेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बिझनेस फॅक्ट

Submitted by vishal maske on 3 November, 2016 - 22:31

बिझनेस फॅक्ट

वस्तुंची मागणी पाहून
उपलब्ध करतात साठा
मात्र कधी गरजा पाहून
गेमही करतात मोठा,...!

मोठा फायदा घेण्यासाठी
छोटा तोटा घेतला जातो
या षढयंत्रांच्या कारस्थानात
सामान्य माणूस पीडला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - उद्योजक