पत्र क्रमांक एक
प्रिय,
अशी बिचकू नकोस. आहेस तू मला प्रिय. कितीही तुझ्या विरोधी वागत असले तरीसुद्धा!! तू नेहमीच बरोबर वागतेस आणि मी नेहमीच चुकिच. ही एकमेकींची वृत्ती आपण चांगलीच ओळखून आहोत ना. पण ह्यापूर्वी अशी कधी गायब नव्हती झालीस तू. 
असतेस कुठे हल्ली?? बर्याच दिवसात गाठभेट नाही आपली. शेवटची भेटलीस तेव्हा फार अस्वस्थ होतीस. मला ते समजून सुद्धा मी तुला त्याच कारण नाही विचारल.  सवय नाही गं मला. नाठाळ आहे ना मी.
 
  
      
  
  
      
  
  
    पत्र क्रमांक एक
प्रिय अभ्यास, 
खुप दिवसापासून तुला पत्र लिहायच मनात होत. तशी तुझी आणि माझी ओळ्ख पाच सहा वर्षापासूनचीच आहे. पहिल्यांदा आपण भेटलो ते मी पहिलीत गेल्यावर. घरातले सगळेजण आई, बाबा, आजी, आजोबा तू येणार येणार असे म्हणत होते. मलाही बरच कुतुहल होत तुझ्याबद्द्ल. खुप अभ्यास करायचा म्हणजे नेमक काय करायच ?? किती कराय़चा तो ?? गेम आणि कार्टून का नाही खेळायचे मग ?? ताई करते तिच्याएवढा करायचा की तिच्यापे़क्षा जास्त ??
 
  
      
  
  
      
  
  
    पत्र क्र. १
प्रिय बोंबिल
मेहेंदी रंग लाती है सुख जाने के बाद ह्या ओळींप्रमाणे श्रावणांत झालेल्या तुझ्या विरहामुळे तुझ्याबद्दल दाटून आलेल्या भावना आज पत्राद्वारे व्यक्त करत आहे.
तसा तू आणि तुझे इतर फ्रेंडसर्कल म्हणजे कोलंबी, पापलेट, बांगडा, रावस, मांदेली आणि इतर बरेच बालपणापासूनचेच सोबती. सोबती म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरच. बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या दिवशी तर तुमचे येणे हक्काचेच असते. तुम्ही घरच्यांचे सगळ्यांचेच लाडके असल्याने जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असता तेंव्हा घरी गोकुळ नांदत. म्हणजे सगळे खुप खुष असतात. लहान मुलांपासुन वृद्धांपर्यंत सगळ्यांना जरा दोन घास जास्त जातात.
 
  
      
  
  
      
  
  
    माझ्या प्रिय प्रिय लिखाणा, 
आता काढत बस चुका वरच्या मायन्यातल्या. "प्रिय प्रिय ह्या सर्वात वरच्या स्थानावर तर तुझी लेक आहे मग त्या स्थानावर आज लिखाण कसं? असा मार टोमणा  
 
बर आता मुद्याच बोलू? फार पटकन कंटाळा येतो रे आजकाल लिखाणाचा. बाकिच्यांना वाचायचा कंटाळा येईपर्यंत लिहूच नये असा शा.जो. मारायचा मोह होतोय तुला माहितेय मला तरीही सांगायचा वेडेपणा करतेय मी.
 
  
      
  
  
      
  
  
    
Subject --- Hiiiiiiiiiiiiiiiii Bappu 
............................................................
हाय बाप्पू, सरप्राईज !!!
साहेबांना एक फोन करायला जड जातो आणि आज चक्क मेल !!
 
  
      
  
  
      
  
  
    श्री. विश्वासराव सरपोतदार,
नमस्कार.
 
  
      
  
  
      
  
  
    पत्र क्रमांक १:
आदरणीय सौ. सुरंगाबाई यांस सादर आणि सविनय प्रणाम.
पत्रास कारण की आपण रोज आमच्याकडे कामाला येण्याचे ठरले आहे त्यात नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खंड पडला आहे. 
आपण जेव्हा आमच्याकडे कामास सुरूवात केली तेव्हा महिन्याच्या दोन रजा ठरल्या होत्या. तुम्हीही तुमच्या चेहर्यावर त्यावेळी चक्क हसरे भाव आणून भरघोस होकार भरला होता. आता मला कळतंय त्या हास्यामागचं रहस्य. पण तरीही महिन्याच्या दोन सुट्ट्याचं आश्वासन लवकरच लवचिकपणे वाकवून तुम्ही आठवड्याला दोन सुट्ट्या घेऊ लागलात. मी काही बोलले नाही.
 
  
      
  
  
      
  
  
    प्रिय गणोबा,
  सस्नेह नमस्कार..
  नुसतं "सस्नेह  नमस्कार" असं लिहिण्याईतका काही  मी तुमच्या बरोबरोबरीचा नाही   ना वयानं, अनुभवानं आणि मानाने हे... पण  असं "सस्नेह" लिहिलं की मनातल्या या वयाच्य अनुभवाच्या आणि मानाच्या भिंती दुर होतात आणि एकदम परिचित आणि आपल्या माणसाशीच बोलत असल्याचा फिल येतो...आणि मला नक्की माहीतेय कि तुम्हालाही हे नक्की पटेलच.