पत्र क्रमांक एक
प्रिय,
अशी बिचकू नकोस. आहेस तू मला प्रिय. कितीही तुझ्या विरोधी वागत असले तरीसुद्धा!! तू नेहमीच बरोबर वागतेस आणि मी नेहमीच चुकिच. ही एकमेकींची वृत्ती आपण चांगलीच ओळखून आहोत ना. पण ह्यापूर्वी अशी कधी गायब नव्हती झालीस तू.
असतेस कुठे हल्ली?? बर्याच दिवसात गाठभेट नाही आपली. शेवटची भेटलीस तेव्हा फार अस्वस्थ होतीस. मला ते समजून सुद्धा मी तुला त्याच कारण नाही विचारल. सवय नाही गं मला. नाठाळ आहे ना मी.
नेहमी मी मूर्खपणा करायचा आणि तू मला झापायचस असा अलिखित नियम आहे आपल्यातला. तुझा कितीही राग राग करत असले तरी तुझ्याशिवाय अशा वागण्याला काही मजा नाही. काहीही चुकीचं वागण्यापूर्वी, वागताना आणि वागल्यानंतर तुझी हमखास आठवण येते. मी जर फार त्रास देत असेन तर ओढ माझे कान. अर्थात माझ्या परवानगीची गरज नाही म्हणा तुला.
पण आत्ताचं तुझं हे वागण माझ्या समजूतीपलिकडचं आहे. बरेच दिवस वाट पाहतेय. नुसत बसून रहाणं उपयोगाच नाही असा वाटलं . म्हणून यच्चयावत सगळा माज बाजूला ठेऊन तुला पत्र लिहितेय. लवकर ये आता, जास्त भाव खाऊ नकोस.
माझ्यातली अप्रिय मी
*********************************************************************************************
पत्र क्रमांक दोन
खरय तुझं, आपल्या शेवटच्या भेटीच्या वेळेस खूपच अस्वस्थ ते मी!
आयुष्यभर तुझ्या वागण्याबद्दल तुझी कानउघडणी करत आले. पण हल्ली हल्ली असं जाणवायला लागल कि माझं ऐकतेस तू सगळ. पण मग तुला खूप त्रास होतो त्याचा. सदसदविवेकबुद्धी गहाण टाकल्याशिवाय काही साध्य करता येत नाही. योग्य, खर आणि चांगल वागून काही मिळत नाही सध्या.
मग विचार केला की किमान तुला तुझ्या मनाप्रमाणे वागू द्याव म्हणजे जे हवं ते मिळवता तरी येईल. एवढ्याच एका कारणापायी स्वत:हून सुप्तवस्थेत गेले होते.
तुझं पत्र पाहून मात्र धक्का बसला. मायना सुद्धा लिहिण्याची शुद्ध नाही बघ मला. वाचता वाचता जाणवलं, जसं तुला माझ्यावेगळ अस्तित्व नाही तसच ते मलाही नाही. कितीही वेगळ्या असलो तरी शेवटी आपण एकच आहोत. आयुष्याची जी काही लढाई आहे तिला चांगल-वाईट सगळ एक होऊनच तोंड द्यायला हवं.
स्वत:ला कितीही अप्रिय म्हणत असलीस तरी मला सगळ्यात जास्त प्रिय असणारी तू, तुझ्यासकट आता मी लढायला तयार आहे...
मी
येस आपुलाच संवाद आपल्याशी
येस
आपुलाच संवाद आपल्याशी
मस्त कल्पना
आवडल पत्र
पत्रं आवडलं.
पत्रं आवडलं.
मस्त कल्पना .. छान ..
मस्त कल्पना .. छान ..
किती मस्त कल्पना!! सुपर्ब!!
किती मस्त कल्पना!! सुपर्ब!!
छान लिहिलेय मनी, वेगळीच
छान लिहिलेय मनी, वेगळीच कल्पना.
अशीच लिहीत जा कधीतरी
(No subject)
आवडली कल्पना.
आवडली कल्पना.
पत्र सांगते गूज manee चे.
पत्र सांगते गूज manee चे.
छान.
पत्र सांगते गूज manee चे. >>
पत्र सांगते गूज manee चे. >>:) खरचं की
वा, मस्त कल्पना. छान लिहिलयस
वा, मस्त कल्पना. छान लिहिलयस
शाब्बास! मस्त लिहिलंयस.
शाब्बास! मस्त लिहिलंयस.
हे शाब्बास मने
हे शाब्बास मने
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
छान आहे पत्र. कल्पना मस्त
छान आहे पत्र. कल्पना मस्त आहे.