यंदाच्या मातृदिनी माता म्हणजे जन्मदात्री हा दृष्टिकोन न ठेवता मातृत्त्वाची संकल्पना व्यापक करून मातृस्वरुप असणार्या व्यक्तींचा गौरव करून हा मातृदिन साजरा करावा अशी संयोजकांची कल्पना होती. त्या कल्पनेला अनुसरून उपक्रम आखले गेले.
आपले शिक्षण, आपल्या अंगी असणारे कलागुण, कौशल्ये ह्यांना वाव मिळावा, त्यांच्या योगे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, सक्षम व्हावे असे अनेक जणींच्या मनात असते. परंतु घरगुती जबाबदार्या, बालसंगोपन किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडून पूर्ण वेळाची नोकरी/व्यवसाय करणे मात्र शक्य नसते. स्वतःमधील क्षमता, कौशल्ये माहीत असतात. घरबसल्या "काहीतरी" करायचंय ही ऊर्मी सतत अस्वस्थ करत असते. पण हे "काहीतरी" कुठून आणि कसे सुरू करावे ह्याबद्दल मात्र मन साशंक असते.
काळ बदलला. साधनं बदलली. तंत्रज्ञान बदललं. एकंदर जीवनमान बदलत चाललंय तसं माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय. पूर्वीची, तुमच्या- आमच्या काळातली छान छान गोष्टी सांगणारी, देवघरात वाती वळणारी, मुलं नातवंड सुना हेच एक विश्व मानणारी ही आजी तरी कशी ह्याला अपवाद असेल बरं?
नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बाळाला मोठ्या विश्वासाने वसुदेव-देवकीमातेने गोकुळी धाडले आणि तिच्या ह्या विश्वासाला किंचितसाही धक्का न देता नंद यशोदेने श्रीकृष्णाचे मोठ्या मायेने पालनपोषण केले ही आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारी कथा. काळानुसार संदर्भ बदलले. गेल्या २-३ पिढ्यांपासून आई पण बाबांच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी बाहेर जाऊ लागली. आपल्या लहानग्यांना एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे सोपवून आई वडील घराबाहेर निर्धास्त राहू लागले. जन्मदाती आई किंवा वडील नसताना मुलांचे प्रेमाने संगोपन करणारे हेच ते आधुनिक युगातील नंद यशोदा!
'मातृदिन' किंवा 'मदर्स डे' म्हणजे अलिकडच्या पिढीचा आईसाठी असलेला खास दिवस! मातृत्त्वाचा गौरव करणारा जागतिक सणच जणू!
मातृदिनानिमित्त एक जुनी कविता......
पोपडे निघालेल्या भिंती
पिवळट पांढऱ्या बुरशीची नक्षी सजवायच्या
दर पावसाळ्यात गळक्या छताला
प्लास्टिकच्या झोळ्या लटकवायच्या
पावसाळ्यात पाणी मुबलक असायचं
नळाला दोनच तास यायचं
छतातून चोवीस तास गळायचं
दाराबाहेर नेहमीच घोटाभर पाणी साचायचं
छोट्या-मोठ्या दगडांवरून उड्या मारत जायचं!
सदैव एक कुबट वास..
भिजलेल्या कपड्यासारखा..
नाकात, छातीत भरायचा
आणि तुझ्या दम्याला
खरवडून काढायचा..
बाबांचा डबा.. आमच्या शाळा
आजीच्या शिव्या अन्.. छतातून धारा!
तुझी परवड कधीच जाणवली नाही
अन् तुझी सहनशीलता कधीच खुंटली नाही
आता दिवस बदललेत -