संयुक्ता-मातृदिन २०१३

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:26

'मातृदिन' किंवा 'मदर्स डे' म्हणजे अलिकडच्या पिढीचा आईसाठी असलेला खास दिवस! मातृत्त्वाचा गौरव करणारा जागतिक सणच जणू!
मातृत्त्वाचा हा आविष्कार विविध रूपाने आपल्याला अनुभवायला मिळत असतो. म्हणूनच यंदाचा 'मातृदिन' थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहोत. यावर्षी जे उपक्रम योजिले आहेत ते "आई" ही संकल्पना थोडी विस्तृत करून केवळ जन्मदात्या आईलाच केंद्रस्थानी न ठेवता, आजच्या युगातील मातेच्या धावपळीच्या जीवनात मुलांच्या संगोपनात साथ देणारे,जन्मदात्या आईच्या गैरहजेरीत "आईच्या" ममतेने, वात्सल्याने तिच्या बाळांची काळजी घेणारे आजी- आजोबा, केअरटेकर्स, पाळणाघरे यांनाही या उपक्रमात सामील करत आहोत. तसेच आजच्या पिढीतील मातांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात मोलाचा वाटा असणार्‍या आणि आता "आजी" नव्हे, साठीतील तरुणी असलेल्या ह्या त्यांच्या कणखर, प्रगतीशील आयांचे अनुभव, किस्सेही 'मातृदिना'च्या निमित्ताने यावेत ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी 'आईला शाळेत जायचंय' या विषयावर झालेल्या चर्चात्मक उपक्रमाला भरघोस यश लाभल्याने यंदा घेऊन आलो आहोत "आईला उद्योजिका व्हायचयं" हा विषय.
तेव्हा, चला तर सगळे मिळून ह्या सर्व माता ,मातृस्वरुप व्यक्तींच्या गौरवार्थ हा उपक्रम साजरा करूया!

matrudinposter_resized.jpg
design.jpg
नंद-यशोदा नव्या युगाचे...
मुलाखत-श्रीमती मोनिका कुलकर्णी-संस्थापिका "आजोळ"
आईला उद्योजिका व्हायचंय..
ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग!
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सर्व सुपरमॉम्स ना मातृदिनाच्या शुभेच्छा !! आजचा दिवस अगदी तुमच्या मनाप्रमाणे जावो! Happy

यावर्षी जे उपक्रम योजिले आहेत ते "आई" ही संकल्पना थोडी विस्तृत करून केवळ जन्मदात्या आईलाच केंद्रस्थानी न ठेवता, >>> चांगला अप्रोच. कुठेतरी वाचले होते - Parenting has become a competitive sport. अवती भोवती पहिले की मी माझ्या मुलांसाठी किती आणि काय करते, माझे मूल कसे अप्रतिम वाढतंय आणि ते कसे वेगळे आहे हे दाखवण्याची एक जणू चढाओढ लागली आहे असे वाटते. त्या सर्व आयांना ह्या निमित्ताने इतके जरी जाणवले - If at all it is a competitive sport, its a team event तरी चांगले आहे.

बाकी कालपरत्वे 'आई' संकल्पना बदलली आहे - प्रेमळ सावत्र आई, फोस्टर आई, सरोगेट आई, दत्तक घेणारी आई, दत्तक देणारी आई, आई-आई असणारे कुटुंब, बाबा नसताना आई होणे, बाबा जिथे आई होतात असे कुटुंब असे अनेक आईचे प्रकार आज समाजात मी जवळून अनुभवतीये. त्या प्रत्येक व्यक्तीची संगोपनाची आस तितकीच तीव्र आहे हे जाणवले! संयुक्ता व्यवस्थापनाने हा सर्व समावेशक अप्रोच घेतला हे फार फार स्तुत्य आहे. जन्मदात्या आयान्व्यातिरिक्त कदाचित इथे कुणी लिहणार ही नाही. पण कुणाला लिहावेसे वाटले तर त्याला व्यासपीठ उपलब्ध केले, त्यांचा समावेश केला आणि मातृत्वाचा खरा गौरव केला ह्याबद्दल व्यवस्थापनाचे खूप खूप अभिनंदन!!!

मातृदिनाच्या शुभेच्छा Happy पोस्टर आवडलं. त्यातून व्यापक कल्पना सूचित होतेय. उपक्रम चांगलाच आहे. मुलाखत
वाचली आणि अतिशय आवडली. संयुक्ता संयोजकांच्या मेहनतीचे कौतुक.

मस्त पोस्टर्स !!!
उपक्रम आवड्ले. वाचून प्रतिक्रिया देणार.

सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा Happy

पोस्टर्स मस्तय...
उपक्रम ही मस्तय... आई न स्त्री म्हन्नुन दोनही वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करता येईल.

सगळ्याना मातृदिनाच्या शुभेच्छा!!!

सगळे उपक्रम आणि त्यांमागचा विचार स्तुत्य वाटले, सावकाशीने वाचेन आणि लिहीनही. Happy

वरचं पोस्टर मात्र खास आवडलं नाही. चार उपक्रमांची चार चित्रं - इतकं सरधोपट वाटलं. ती चित्रं एका प्रकारची (सगळी अ‍ॅनिमेशन्स किंवा तत्सम) तरी चांगलं वाटलं असतं. असो. महत्त्व पोस्टरला नाही, उपक्रमांना आहे. Happy

मस्त आहेत उपक्रम्............माझ्यासहीत सर्व सुपर मॉम ना शुभेच्छा.....:फिदी:
आणि वाचन आवडतेच्.........सो वाचणारच.......... Happy

यावर्षीचे सगळेच उपक्रम मस्त आहेत. आजच वाचायला सुरुवात केली आहे.
पण मजा येते आहे वाचताना. सगळ्यांनीच छान योगदान दिले आहे. Happy