खरच तुझा खूप त्रास होतो

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 00:54

खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तू जवळ असतोस तेव्हा
सर जग माझ्या मुठीत असत
पण तू नसताना मात्र
सार काही भकास भासत
म्हणून खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझे शब्द न शब्द मनावर प्रेमाची फुंकर घालतात
पण तू नसताना मात्र ते खूप छळतात
म्हणून खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तू सोबत असतोस तेव्हा
माझ्या जगण्याची मजाच निराळी असते
कारण माझ्या सुखांची तार तुझ्याशीच जुळली आहे
म्हणून तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझ्या डोळ्यात स्वताला पाहताना
मन माझ भारावून जात
पण तू नजरे आड असताना सर काही सून होत
म्हणून तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझे शब्द तुझ हसू मनाला खूप खूप सुखावत
पण तू नसताना हे सार आठवून माझच मन मला दुखावत
म्हणून तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो ....................तृष्णा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली Happy