सातासमुद्रा पलीकडले

Submitted by Trushna on 4 March, 2013 - 11:46

कॅनडामधील काही सुंदर ठिकाणांचे हे फोटो तुम्हाला नक्की आवडतील आपला देश तर आहेच सुंदर निसर्गरम्य वातावनाची देणगी लाभलेले अनेक ठिकाण भारतात आहेत म्हणूनच आज काही भारताबाहेरील सुंदर ठिकाणे पाहूया ........
ottawa-hindu-temple-1.jpg
हे कॅनडातील ओट्टावा शहरातील हिंदू मंदिर आहे येथे सर्व देवांची स्थापना केलेली आहे गणपती ,कृष्ण,हनुमान,रामसीता,दुर्गा अंबिका, चंडिका, विष्णू यांप्रमाणे इतर धर्माचे अधिस्थ्स्थान असलेले देव यांच्या सुबक अश्या मुर्ती आपल्याला येथे पाहायला मिळतात येथे अनेक धर्माचे लोक येउन एकत्र देवपूजा प्रार्थना करतात म्हणून याचे नाव हिंदू टेम्प्ले आसे आहे
ResizeImage.jpg
हा आहे नायगराफ़ॉल जगातील सर्वात मोठा फ़ॉल म्हणून प्रसिद्ध आहे याची उंची १६७ फूट आहे यावरून नायगारा नदी वाहते अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांची बोर्डर म्हणजे हा नायगरा फ़ॉल अशीही त्याची वेगळी ओळख आहे यालाच लागून काही अंतरावर आपल्याला अमेरिकेतील वॉटर फ़ॉल पाहायला मिळतो नायगराफ़ॉल हा खरोखरच पर्यटकांचे डोळे दिपवून टाकणारा आहे मी हा अनुभव प्रत्यक्षात अनुभवलंय एवढ निसर्गरम्य चित्र मी प्रत्यकशात या आधी पाहिलं नव्हत .
images_0.jpg
C.N टोंवर कॅनडातील टोरांटो येथे असून हे जगातील सर्वात उंच टोवर म्हणून प्रसिद्ध आहे याची उंची १,८१५.४ फुट असून यात एकूण १४७ फ़्लॊर्स आहेत यात skypod अश्या elevator बने सवलेले आहेत ज्यामुले आपण टोवरवर जाताना आजूबाजूचा सर्व परिसर बघू शकतो ज्याने आपण खरच Top Of The WORLD जातोय याचा अनुभव येतो लिफ्ट मधून वर जाण्याचा अनुभव म्हणजे हृदयाचा ठोका चुकवणारा असतो CN तोवर वरून उडती विमान,चिमुकल्या बिल्डींग्स ,मुंगी एवढ्या गाड्या, आणि दूरवर पसरलेला समुद्र आणि त्याच निळशार पाणी हे सारकाही पाहण्याचा आनद काही वेगळाच असतो
images (1).jpgहि आहे कॅनडातील पार्लमेंट अतिशय भव्य आणि सुबक कोरीवकाम व बांधकाम येथे आपल्याला पाहायला मिळते येथील सुरक्षा व्यवस्था व राज्य कारभार अतिशय व्यवास्थित पाने पार पडला जातो येथे राज्यसभेत एकाच वेळी ४१३ जन बसू शकतील अशी सोय आहे त्याव्यतिरिक्त आतील खांबांवरील तेथील शुरवीरांचे चेहरे अतिश सुबक रित्या कोरले आहे देशासाठी कमी आलेल्या सैनिकांची माहिती आपल्याला येथील भिंतींवर पाहायला मिळते....
धन्यवाद ! आवडल्यास आपले प्रतिसाद पाठवावे ......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही ठिकाणे माहीत नव्हती एकली नव्हती
फोटो फार जिवंत आले आहेत

मला आवडले ते तुम्ही दिलेली माहीती व माहीती देताना भाषेत एक (लिखाणाच्या शैलीत) इनोसंस जाणवला शाळेतील मुलाना सहलीवर नेताना बाई कसे सांगतात आता आपण हे पाहत आहोत ...हे असे आहे ते तसे आहे ..इत्यादी

अश्याच रहा कायम हीच विठ्ठलचरणी प्रार्थना !!!!

निरागस .......................