वृत्तपत्र

तडका - चहापान आणि विरोधी पक्ष

Submitted by vishal maske on 6 December, 2015 - 09:19

चहापान आणि विरोधी पक्ष

अधिवेशन म्हटलं की
चहापान ठरलेलं असतं
पण प्रत्येकच चहापान
बहिष्कारानं घेरलेलं असतं

चहापान आणि बहिष्काराचं
हे अतुट नातं स्पष्ट आहे
चहापानावरील बहिष्कारास
विरोधी पक्ष एकनिष्ठ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ज्ञानसुर्य

Submitted by vishal maske on 5 December, 2015 - 22:09

ज्ञानसुर्य

ठरला जगभरात श्रेष्ठ
विद्वत्तेच्या जोरावर
महामानव या देशाचा
भिमराव आंबेडकर

त्याच्या कार्याचा लेखा-जोखा
शब्दांमध्ये ना मावत आहे
मावळला ज्ञानसुर्य तरीही
प्रकाश त्याचा तेवत आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बळीचा बकरा

Submitted by vishal maske on 5 December, 2015 - 09:51

बळीचा बकरा

वेळ प्रसंग पाहून-पाहून
मान-सन्मान दिला जातो
बळीचा बकरा समजुनही
कुणाचा वापर केला जातो

तिथे सारे सावरले जातात
जिथे जिथे खतरा असतो
मग तिथे तिथे मुद्दामहून
पुढे बळीचा बकरा असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - क्रांतीची मशाल

Submitted by vishal maske on 4 December, 2015 - 20:54

क्रांतीची मशाल

अनिष्ठ रूढी परंपरांनी
ग्रासलाय समाज हा
आकुंचित मानसिकतेने
त्रासलाय समाज हा

तिमिरातुनी तेजाकडे येणेही
कुणाच्या मनाला पटत नसते
पण अनिष्ठ प्रथा मोडल्याविना
क्रांतीची मशाल पेटत नसते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पिंगा-दंगा

Submitted by vishal maske on 4 December, 2015 - 11:24

पिंगा-दंगा

बाजीराव मस्तानीतुन
नवे वर्म भेटत आहेत,.!
पिंग्यासह मल्हारीचे
हल्ली वारे पेटत आहेत,.?

मस्तानी आणि काशीबाईचा
सिनेमात पिंगा आहे
मात्र सिनेमातील पिंग्याचा
वास्तवात दंगा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ऊद्देश

Submitted by vishal maske on 3 December, 2015 - 21:13

ऊद्देश

जुना ताल धरून-धरून
नव्या-नव्याने नाचतात
मागे पडलेला मुद्दाही
ओढून-ताणून खेचतात

ते सतत धडपडतात
लोकांत धाडण्या संदेश
प्रकरण गार होऊ नये
एवढाच त्यांचा उद्देश

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मुर्दाड माणसं

Submitted by vishal maske on 3 December, 2015 - 08:57

मुर्दाड माणसं,...!

माणसांचा मर्म इथे
माणसांना राहिला नाही
स्वार्थात माणसांनी
माणूसही पाहिला नाही

असंवेदनांचे इथे
का गर्दाड माणसं,.?
माणसांशी वागताना
झाले मुर्दाड माणसं,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तयारी विस्ताराची

Submitted by vishal maske on 2 December, 2015 - 21:30

तयारी विस्ताराची

जेवढा क्षण आनंदी
तेवढाच डोकेखाऊ
मंत्रिमंडळ विस्ताराचा
होतो वारंवार बाऊ

आपल्यांसह इतरांचीही
नाराजी दुर सारावी लागते
विस्ताराची तयारी मात्र
गुलदस्त्यात करावी लागते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सुखी कुटूंबाचा मेरू

Submitted by vishal maske on 2 December, 2015 - 09:32

सुखी कुटूंबाचा मेरू

शुल्लक शुल्लक गोष्टींचाही
भयान वनवा पेटू शकतो
अन् कुटूंबातील कलह कधी
जीवा वरतीही ऊठू शकतो

कुटूंबामध्ये वावरत असताना
कुणी भलता माथेफीरू असतो
पण एकमेकांना समजुन घेणे
हा सुखी कुटूंबाचा मेरू असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - असहिष्णूतेच्या वादात

Submitted by vishal maske on 1 December, 2015 - 21:39

असहिष्णूतेच्या वादात

कुणाला दिसली नाही
कुणाला थोडी वाटली
असहिष्णूतेच्या वादामध्ये
अनेकांनी ऊडी घेतली

असहिष्णूतेचा अर्थ देखील
कुणा-कुणाला ज्ञात नाही
पण फाटक्यात पाय घालण्याची
सवय त्यांची जात नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - वृत्तपत्र