वृत्तपत्र

फुसके बार – १५ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:27

फुसके बार – १५ नोव्हेंबर २०१५
.

१) चला हवा येऊ द्या वाले निलेश साबळे यांच्याशी काही बोलणेच अवघड झाले आहे असे म्हणतात. त्यांच्याशी काहीही बोलले तर ते एकतर ‘क्या बात है सर’ किंवा ‘वा सर वा’ असे म्हणतात म्हणे. त्यामुळे त्यांच्याशी पुढे बोलताच येत नाही.

२) टीव्हीवर लागलेल्या रेगे सिनेमाचा शेवट पाहताना प्रत्येक वेळी आता तरी रेगेला मारणार नाहीत अशी आशा वाटते.

३) एबीपी माझावरील ‘१०च्या बातम्या’ या कार्यक्रमाच्या जाहिरातीत तरूण नवरा-बायको १०च्या बातम्या पाहण्यासाठी सगळी कामे सोडून हातावर (आपापल्या) हात ठेवून शेजारी बसलेले पाहून फार मौज वाटते.

तडका - ताव-डे

Submitted by vishal maske on 18 November, 2015 - 22:31

ताव-डे

सुरळीत चालल्या परिस्थितीत
विनाकारणच फावडे असतो
अयोग्य निर्णय घेण्यासाठी
अविचारी ताव-डे असतो

लोक किती जागे आहेत
याचा आढावा घेतला जातो
निर्णय अंगलट येऊ लागता
स्वार्थही बाजुला रेटला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भटके कुत्रे

Submitted by vishal maske on 18 November, 2015 - 08:55

भटके कुत्रे

भुंकत भुंकत फिरणारे
मोकाट भटके कुत्रे
ठरताहेत धोकादायक
माणसं झाले भित्रे

अक्कल गहाण ठेवतात
केकाटतातही बोलताना
स्व लायकी कळत नाही
त्या कुत्र्यांना भुंकताना

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मानवी विध्वंस

Submitted by vishal maske on 17 November, 2015 - 19:11

मानवी विध्वंस

फटाके आणि दिवाळीचं
नातं फार जुनं आहे
फटाक्यांविना कित्तेकांचं
दिवाळी मन सुनं आहे

फटाकेमुक्त दिवाळीसह
ध्वनी मर्यादेचा भ्रंश आहे
घेतले कित्तेक पक्षांचे बळी
हा तर मानवी विध्वंस आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रोड रोमियो

Submitted by vishal maske on 17 November, 2015 - 08:47

रोड रोमियो

इकडून तिकडं मारीत चकरा
रोडवर करतो भलताच नखरा
करतोय रेस फरा-फरा
हूकेल दिसतो जरा-जरा

का राहिली नाही भीड-भाड
महिलांशी करतोय छेड-छाड
पालकांनो जरा सावरा हो
रोड-रोमिओ आवरा हो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रीत

Submitted by vishal maske on 16 November, 2015 - 20:16

रीत

नेतृत्वाची संधी देऊन
कधी सन्मान केला जातो
आदर आणि आपुलकीने
त्याला प्रणाम दिला जातो

जय जयकार करत कधी
डोक्यावरती घेतला जातो
त्याने कानात डोकावताच
पायतळाशी घातला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - महागाईच्या खाईत

Submitted by vishal maske on 16 November, 2015 - 09:45

महागाईच्या खाईत

एका एका वस्तुचाही
येऊ लागला नंबर
महागाईने पहा कशी
कसली आहे कंबर

बाजारात फिरताना
हात बिथरू शकतो
भाववाढीच्या खाईत
तांदूळ घसरू शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चाहूल पाहूण्याची

Submitted by vishal maske on 15 November, 2015 - 21:50

चाहूल पाहूण्याची

पाहूण्याची चाहूल पुर्वी
म्हणे कावळा देत होता
पाहूणे घरी येणार म्हणून
दारी बसुन गात होता

पण पाहूना येण्याची चाहूल
आता कावळा ना गातो आहे
त्याची जागा घेऊन हल्ली
मोबाईल गजर देतो आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रात्र वैर्‍याची

Submitted by vishal maske on 15 November, 2015 - 20:35

रात्र वैर्‍याची

अच्छे दिन ला अजुन
किती आहे अवकाश,.?
झपाट्याने होतो आहे
महागाईचाच विकास

वाढत्या इंधन दरामुळे
भीती वाटतेय दौर्‍याची
मध्यरात्रीच वाढतात दर
रात्रही झाली वैर्‍याची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - वृत्तपत्र