ओव्या

माझ्या संग्रहातील काही ओव्या

Submitted by सामो on 24 October, 2021 - 04:28

काही वर्षांपूर्वी, आईने जपून ठेवलेली, माझी जुनी वही सापडली होती. त्या संग्रहातील काही ओव्या खाली देत आहे. कवी माहीत नाही. या ओव्या पूर्वी सिध्दीच्या धाग्यावरती एका प्रतिक्रियेमध्ये दिलेल्या आहेत पण आज, इथे वेगळ्या धाग्यात देते आहे.
-------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 

लॉक डाऊनच्या ओव्या

Submitted by हर्षल वैद्य on 20 April, 2020 - 03:40

विश्वाच्या आरंभी | एकले ते शून्य |
केवल अनन्य | स्वयंपूर्ण ||

एकलेपणाचा | त्यास ये कंटाळा |
सोबत्यांचा मेळा | हवा वाटे ||

आदिकांक्षेतून | द्वैताचे जनन |
विश्व प्रसरण | पावू लागे ||

काळाचा प्रवाह | अनादि अनंत |
त्यास ना उसंत | कशाचीही ||

कार्य कारणाची | साखळी अनंत |
तोडी ज्ञानवंत | शून्यभोगी ||

द्वैताच्या कांक्षेचा | एकत्वी विलय |
त्यासी प्रत्यवाय | काही नाही ||

एकत्वाच्या भावी | स्थिरचित्त होणे |
शून्यत्वा नेणणे | सत्यमार्ग ||

शब्दखुणा: 

ओव्या

Submitted by समीर चव्हाण on 21 February, 2013 - 06:39

हसतोस केव्हा नसे नित्यनेम
लगटून प्रेम अंगांगाला

अद्दल घडावी असे झाली काही
पोर उभे राही दारातच

फिरून तुझ्याशी येत राहीन बा
चटावलो मी वा म्हण काही

दिसमास केला सुखाचा सोहळा
लावलास लळा नकळता

............................................

तुझ्यापाठी गेलो फरफट झाली
किमंत कळाली आपसूक

फिटून विटली हौस बोलण्याची
तुला ऐकण्याची जाइचना

फरक पडावा कुणाला कशाचा
आपला उसासा आपल्याशी

लावून घेशील एवढे-तेवढे
मलाही हळवे करशील

......................................

खदखदतोय काळ माझ्यावर
कर्तव्याचा भार थर कापे

घटका विसावा घेतलास निघ
कर लगबग वेळ कोठे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ओव्या