Submitted by हर्षल वैद्य on 15 July, 2025 - 13:09
आंधळ्या वाटेने । चालतोचि आहे ।
पुढे काय पाहे। दिसो नाही ॥
कितीक जन्मांची । कर्मे ही चालली ।
आणिक उरली । किती एक ॥
कर्मफलाशेचा। मोह तो सुटेना।
वाट ती सरेना । पायातील ॥
देही जन्म झाला । देही अडकला ।
देहचि मानिला । सत्यरूप ॥
देहभोग कांक्षा । तेवढी उरली ।
अतिप्रिय झाली । देहसुखे ॥
कामांधतेपायी । लोपलासे धर्म ।
सततचे कर्म । असत्याचे ॥
पुरता रुतलो । कामाच्या कर्दमी ।
जीव अर्थकामी । अज्ञानी गा ॥
कामकाननी ह्या । प्रकाश दिसेना ।
वाट सापडेना । गुरूविण ॥
भांबावुनी उभा । थिजलो मी आहे ।
अंतरीच साहे । तापत्रय ॥
मार्गक्रमणेस । आधार तो द्यावा ।
हृदयी धरावा । गुरुराया ॥
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता..!
छान कविता..!
शाळेतल्या पुस्तकात कविता वाचतेयं असं वाटलं.