लाट

सागर आणि लाट

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 June, 2023 - 02:38

बलदंड सखा तो तिचा
रांगडा तयाचा बाणा
विसावली बाहूपाशात
आश्वस्त अवखळ ललना

का कोण जाणे बिनसले
कर्णपिशाच्च काही वदले
मिठी सैल तयाची झाली
अन सागरलाट दूरावली

काडीमोडच घेते म्हणाली
थयथयाट तिनं मांडला
कातळावर विराट फुटता
वदे हा ही कठोर निघाला

मग बदलली तिनं दिशा
परी दशा बदलली नाही
म‌ऊशार वाळू किनारीही
भक्कम आधारच नाही

जे दिसले वरकरणी तिज
कुठे भक्कम,मुलायम जरी
निराधार, खिन्न मनाने
ती परतली जुन्या घरी

शब्दखुणा: 

ओमि क्रॉन संसर्ग तिसरी लाट जनतेचा लढा

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2022 - 02:34

सरांचा धागा माहिती पूर्ण आहे. हा अ‍ॅक्षन व परि णाम जनतेच्या प्रति क्रिया ह्या साठी आहे.

दररोज ओमिक्रॉन ;/ ओमायक्रो न करोना चा संसर्ग वाढत आहे. पूर्वी सुरक्षित राहिलेले नवे नवे पेशंट पण आता बाधित होत आहेत. तुमची काय परिस्थितीत, काही मदत हवी असल्यास इथे लिहा. परदेशस्थ माबोकर भारता तील नाते वाइकांस काही मदत पुरवायची असल्यास लिहा. ट्विटर किंवा माबो वरून मदतीचा प्रयत्न करू.

तिसरी लाट जी म्हणत होते ती बहुतेक सुरू झालेली आहे. त्याचा सामना करण्यास मदत धागा.

मानसिक आधार लागल्यास जरूर व्यक्त व्हा.

विषय: 

अभंग रचना

Submitted by omkar_keskar on 7 May, 2021 - 00:03

मन करा मोठे | कळ काढा थोडी |
सुटतील कोडी | आयुष्याची ||
सर्वां ठाव आहे | बिकट हे पर्व |
संपेल हे सर्व | लवकरी ||
गेले किती काळ | झटती डॉक्टर्स |
जोडीने त्या नर्स | सदोदित ||
देश झाला बंद | ठप्प चराचर |
उभा बांधावर | शेतकरी ||
कित्येकांचे आता | प्रवास थांबले |
जीवन संपले | एकाएकी ||
एकीमागे आता | दुसरीही आली |
पळापळ झाली | सकलांची ||
आता सर्वकाही | ऑनलाईन हाती |
निर्मियली नाती | तिकडेची ||
आता या काळी | जात नामशेष |
एकच विशेष | मानवाची ||
रक्त आणि प्लाझ्मा | महत्वाचे आता |

डोळ्यांत उजळते स्वप्न (भवानी वृत्त)

Submitted by माउ on 7 May, 2019 - 18:00

ओसरते शांत दुपार उन्हाचा भार नभाला होतो
सांजेची उसवुन शीव सूर्य रेखीव नव्हाळी देतो

वाळूत पसरते लाट थेंब मोकाट नाचुनी जाती
काठास बिलगते ओल अंतरी खोल आर्जवे उरती

पाण्यात चिमुकले पाय पांढरी साय स्पर्शिण्या जाती
थेंबांची होता फुले हरखुनी मुले वेचुनी घेती

मातीत खेळते पोर कुणी चितचोर स्वप्न आवरते
अलवार गुंफते ऊन तिच्याहातून सांज सावरते

केसांत अबोली फूल सुगंधी भूल वा-यात वाहे
नाही जगताचे भान तिला अभिधान नभाचे आहे

ती टपोर हसते खास निरागस आस होतसे बाधा
खेळात हरवुनी जात उरे सा-यात सानुली राधा

Subscribe to RSS - लाट