ओमि क्रॉन संसर्ग तिसरी लाट जनतेचा लढा

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2022 - 02:34

सरांचा धागा माहिती पूर्ण आहे. हा अ‍ॅक्षन व परि णाम जनतेच्या प्रति क्रिया ह्या साठी आहे.

दररोज ओमिक्रॉन ;/ ओमायक्रो न करोना चा संसर्ग वाढत आहे. पूर्वी सुरक्षित राहिलेले नवे नवे पेशंट पण आता बाधित होत आहेत. तुमची काय परिस्थितीत, काही मदत हवी असल्यास इथे लिहा. परदेशस्थ माबोकर भारता तील नाते वाइकांस काही मदत पुरवायची असल्यास लिहा. ट्विटर किंवा माबो वरून मदतीचा प्रयत्न करू.

तिसरी लाट जी म्हणत होते ती बहुतेक सुरू झालेली आहे. त्याचा सामना करण्यास मदत धागा.

मानसिक आधार लागल्यास जरूर व्यक्त व्हा.

तुमच्या कडे कोव्हिड केंद्र. इतर काही मदत उपलब्ध असल्यास प्रतिसादात लिहा. तुमच्या गावातील देशातील स्टेटस लिहा.

सर्व जण सुखरूप ह्या लाटेतून बाहेर पडू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साइंटिस्ट लोकं काही ही म्हणोत. सामान्य लोक कोरोनाच म्हणतात.
कोरोना लस फेल आहे हे कोणीतरी मोठ्याने कबूल करणे बाकी आहे.

पहिल्या लाटेत पण corona झाला नाहीं.
दुसऱ्या लाटेत पण झाला नाही.
तिसऱ्या लाटेत अजून तरी झाला नाही.

दुसऱ्या लाटेत rt pcr खूप वेळा केली अगदी एका वेळी दोन दोन लॅब मधून .
पण सर्व निगेटिव्ह च रिपोर्ट aale.
घरात पक्त सुरवातीला २०२० मध्ये सुरवातीला तीन महिने घरातच काढले.
नंतर मात्र घरात कधीच थांबलो नाही.

खूपच लोकां ना पटकन इन्फेक्षन झाले आहे.

अरविंद केजरीवाल
एकता कपूर
मेसी
काही टीव्ही कलाकार
बाबुल सुप्रियो.

एकीकडे झपाट्याने पसर णा रा करो ना व दुसरीकडे इलेक्षन रॅली, तिथे मास्क नाही सोशल डिस्टंसिग नाही. देव दर्शनाला गर्दी, बीच वर गर्दी. गोव्याला जाणे मजा करणे चालूच आहे.

आम्ही घरी एन ९५ मास्क आणले आहेत. व होम करोना टेस्ट आणल्या आहेत. एक बारका ताप मला येउन गेला पंधरा वीस दिवसा पूर्वी. पण सध्या ठीक आहे. वर्क फ्रॉम होम व ऑफिस हे हाय ब्रिड मॉडेल चालू आहे.

जिथे rt pcr १०० % योग्य निदान करत नाही .तिथे home covid टेस्ट.
जिला antigen rapid टेस्ट म्हणतात
ती किती खरे निदान करणार.

जिला antigen rapid टेस्ट म्हणतात
ती किती खरे निदान करणार.>> काही शंका असतील तर लिहा. ह्या धाग्यावर शक्यतो लोकाम्चे मन धैर्य खचेल असे लिहू नका ही विनंती.
सर्व मने हळवी झालेली आहेत. सततच्या मार्‍याने सर्वांना कोविड फटीग आला आहे. तरी कृपया.

मन धैर्य खचेल असे लिहू नका ही विनंती.

नाही तसे नाही. पण मी दोन लसी घेतल्या, मी कुठेही फिरू शकतो हा भ्रम सोडावा हे सांगावे लागत आहे. ज्या महाजनांना कोरोना झालाय त्यांनी लसी घेतल्या नसतील का? युके,फ्रान्स, जर्मनीत लसीकरण नव्वद टक्के+ केव्हाच झाले आहे. पण आता काय चालले आहे हे आगामी सूचक आहे.

धीर खचलेले प्रतिकार कसा करणार.
माहितीच्या माऱ्याने धीर खचला नाही पाहिजे मन स्थिर असावे आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास असावा.
आपल्याला स्वतः ला वाचवायचे आहे शक्य होईल ती सर्व काळजी घ्यावी .
चुकून रिपोर्ट positive आला म्हणजे आता काही तरी महा भयंकर घडणार असे समजायचे कारण नाही
लागण होईल पीक मध्ये काही दिवस लक्षण दिसतील आणि उतरती कळा लागेल आणि व्हायरस निघून जाईल .
लागण झाली म्हणजे आता काही खरे नाही असे बिलकुल समजण्याचे कारण नाही.

आमच्याकडे (कॅनडात) #केसेस प्रचंड वाढत आहेत. आता चाचणी क्षमता तुटपुंजी पडत असल्याने लक्षणे असतील तर पॉझिटिव्ह आहात समजून ५ दिवस/ लक्षणांच्या तीव्रतेचा कल खाली झुकत नाही तोवर विलगीकरण करा असं सांगत आहेत. सर्वसामान्यांची आरटीपीसीआर करणे बंद केले आहे. फक्त हेल्थकेअर वर्कर्स, वृद्ध फर्स्ट नेशन्स इ. लोकांची करत आहेत. रॅपिड अँटिजेनही डिसेंबर मध्ये वाटत होते, सध्या नाही.
त्यामुळे पॉझिटिव्ह नंबरला आता फार अर्थ असणार नाही, कारण अनेकांना झाला तरी सरकारला ते समजणारच नाही. आता रुग्णालयात भरती होणार्‍याचे आकडे, आयसीयु मधील कोव्हिड आकाडे यावर अवलंबुन रहावे लागेल.
कॅनडात लसीकरण ९०% झालेले आहे, तरीही नवा म्युटंट पसरतो आहे. पण त्याच बरोबर जमेची बाजू अशी की लसीकरण झालेल्यांना फ्लू/ तापासारखी लक्षणे दिसुन दोन-तीन दिवसांत बरे वाटत आहे. रुग्णालयात भरती होण्याचा आकडा लाट चालू होऊन तीन आठवडे झाले तरी आधीच्या इतका अजुनतरी वाढलेला नाही. आयसीयु आणि मृत्यू ही खूप कमी आहेत. अजुन दोन आठवडे असंच राहिलं तर तोवर लाटही ओसरेल म्हणत आहेत.
लॉकडाऊन गेल्यावर्षी सारखा आज रात्रीपासून चालू होईल.

कदाचित या धाग्यावर पुन्हा येणार नाही. कारण कोरोनासंबंधित कुठल्याही बातम्या आणि ताज्या घडामोडी ऐकायच्या नाहीत हे धोरण गेले दोन वर्षे अवलंबवतोय. आपल्या आजूबाजुच्या किती लोकांना कोरोना होतोय, ते किती सिरीअस होताहेत, मृत्यु होताहेत का यावरच त्याची गंभीरता जोखतो. बाहेरच्या देशात, शेजारच्या राज्यात वा शहरात काय होतेय ते ऐकून घाबरून जाऊ नये हे तत्व पाळतोय.
लाट किती गंभीर आहे हे सरकार ठरवेल आणि त्यानुसार नियम बनवेल. ते पाळणे आपले काम म्हणत तेवढेच पाळतो. गार्डन बंद झाले तर फिरायचे बंद. उघडले तर फिरायचे चालू. पण गर्दीच्या वेळा आणि जागा टाळतो. हेच नियम ऑफिस, ट्रेन, रिक्षाबाबत पाळतो. गार्डनमध्ये ईथे कोणी मास्क वापरत नाहीत. आम्हीही वापरत नाही. पण गार्डनबाहेर पडताच न चुकता लावतो. मध्यंतरी एका गार्डनमध्ये गेलेलो तिथली सारी पब्लिक मास्क लाऊन होती तसे आम्हीही लावला. पण नंतर पुन्हा कधी त्या गार्डनला गेलो नाही. मुलाची शाळा उघडली तसे त्याला शाळेत पाठवू लागलो. मुलीच्या शाळेने परवानगी मागितली तसे लगेच हो म्हटले. सोसायटीमध्येही सोसायटी मिळून जे नियम ठरवते त्यानुसार वागतो. स्विमिंग पूल उघडे असते तेव्हा पोहून घेतो. मध्यंतरी सोसायटीतच केसेस वाढल्याने मुलांचे खेळणे पंधरावीस दिवस बंद केले होते ते पाळले. सध्या अजूनपर्यंत तरी सर्व मुले सोसायटीच्या आत मास्कशिवाय खेळतात तर त्यानुसार आम्हीही पोरांना खेळायला सोडतोय. एकंदरीत ज्यादा हुशारी करू नये वा ज्यादा घाबरून जाऊ नये हे तत्व पाळतोय. अश्या लाटा आता आयुष्यभर येत जात राहतील हे स्विकारले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राणघातक कोरोना आपण पचवला आहे. आता जो उरलाय तसे तर कित्येक आजार रोग आहेत जगभरात. मग कश्याला यालाच जास्तीचे महत्व देत घाबरावे असा विचार करतो.

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येने दहा हजाराचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी दिवसभरात १०,८६० नवीन रुग्णांची नोंद झाली. मृतांची संख्या कमी असून दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४७ हजारांपुढे गेली आहे. मात्र दिवसभरात आढळलेल्या रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून करोना रुग्णांची दैनंदिन संख्या झपाटय़ाने वाढते आहे. दरदिवशी हजारोच्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ होते आहे. मंगळवारी १०, ८६० नवीन रुग्णांची नोंद झाली त्यापैकी ९,६६५ म्हणजेच ८९ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर ८३४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून ५२ रुग्णांना प्राणवायूचा द्यावा लागला आहे. सध्या पालिकेच्या करोना रुग्णालयात असलेल्या ३० हजारांहून अधिक रुग्णशय्यांपैकी १४ टक्के रुग्णशय्या व्यापलेल्या आहेत. दिवसभरात ६५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे करोनामुक्त रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवरून ९२ टक्के झाला आहे. वेगाने रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्क्यांवर गेला आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ११० दिवसांवर आहे.

मंगळवारी १०,८६० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८ लाख १८ हजारावर गेली आहे. मृतांची संख्या मात्र स्थिर असून मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यात ३,५०२ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३ हजार ५०२ करोना रुग्ण आढळून आले. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात सोमवारी एकूण १,८३० बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर मंगळवारी ३,५०२ बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याच्या रुग्णाच्या संख्येत दुप्पटीने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,२९५ आहे. मंगळवारी ठाणे १,३३२, नवी मुंबई १,०७२, कल्याण-डोंबिवली ४२२, मीरा-भाईंदर ३८७, ठाणे ग्रामीण १५१, उल्हासनगर ५२, बदलापूर ४२, अंबरनाथ २९ तर भिवंडीत १५ रुग्ण आढळून आले.

इमारत प्रतिबंधितच्या नियमात बदल

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने इमारती प्रतिबंधित करण्याबाबतच्या नियमावलीत बदल केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यात आणखी एक अट घातली आहे. इमारतीतील २० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये करोना रुग्ण असल्यास किंवा किमान दहा रुग्ण असल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येणार आहे. कमी मजले किंवा कमी सदनिका असलेल्या लहान लहान इमारती मोठय़ा संख्येने प्रतिबंधित केल्यास नियोजन करणे अवघड जाते व नागरिकांनाही त्रास होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रतिबंधित इमारतीतील अन्य सर्व नियम तसेच ठेवण्यात आले आहेत.

दोनच आठवडय़ांत दहा हजारांचा टप्पा

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ३०० च्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद होत होती. त्यानंतर ही संख्या कमी कमी होत होती. महिनाभर दररोज केवळ दोनशेच्या आत नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात रुग्णसंख्या वाढू लागली. दोनच आठवडय़ात रुग्णसंख्येने दहा हजाराचा टप्पा गाठला आहे. २०२१ मध्ये फेब्रुवारीत जेव्हा दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली तेव्हा १० हजाराचा टप्पा गाठण्यास दोन महिने लागले होते. एप्रिलमध्ये रुग्णसंख्येने ११ हजाराचा उच्चांक गाठला होता. त्यामुळे यावेळी संसर्गाचा वेग किती जास्त आहे याची कल्पना येईल. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी दिवसभरात ४९ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १० हजाराहून अधिक रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे बाधितांचे प्रमाण २१.८६ टक्के आहे.

दैनंदिन रुग्णसंख्या १०,८६०

लक्षणे नसलेले रुग्ण ९,६६५ (८९ टक्के)

रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण ८३४

प्राणवायूची गरज लागलेले रुग्ण ५२

एकूण रुग्णशय्या ३०,५६५

व्यापलेल्या रुग्णशय्या ४,४९१ (१४.७ टक्के)

उपचाराधीन रुग्ण ४७,४७६

रुग्णदुपटीचा कालावधी ११० दिवस

काल स्विगी मागवले होते. कधी रेस्टॉरेंट बंद होतील काय माहीत म्हणून पण डिलिव्हरी मॅन ला विचारले तर तो म्हणे काही लागत नाही लॉक डाउन.

आमच्याकडे लाट ओसरुन जाई परेन्त अंधेरीला शिफ्ट व्हायचे स्थगित केले आहे. नेक्स्ट वीक बघू.

अमितव ॠ णमेश काळजी घ्या. व घरच्यांना संभाळा. ऑल द बेस्ट.

ओमायक्रॉन माइल्ड आहे व घश्यावर फोकस आहे. खाली लंग परेन्त फारसा जात नाही असे वाचले.

कॅनडा नी rt pcr चे आऊटसोरसिंग करावे .
पाकिस्तान,बांगलादेश,भारत या देशांकडे .
त्यांची समस्या सुटेल.
युरोपियन राष्ट्र वाटत आहेत तेव्हढी शहाणी नाहीत हे अशा साथीत च माहीत पडते.

माझे आव्डते शहर अ‍ॅमस्टर डॅम मध्ये कोविड रेस्ट्रिक्षन विरुद्ध निदर्शने चालू आहेत. पोलीस/ आर्मी राखीव दल त्यांना रोखून धरत आहेत.

युरोपियन राष्ट्र वाटत आहेत तेव्हढी शहाणी नाहीत हे अशा साथीत च माहीत पडते.>> पण ते द्वितीय महा युद्धा सारख्या भयानक अनुभवातून गेलेले आहेत. व जीवित हानी अनुभवलेली आहे. अहो शेवटी घर संसार मुले बाळे बायको कुत्रे मांजरे आईबाबा सर्वांना सारखेच की. प्रत्येक जण आपापल्या परीने झगडतोच आहे. आणि शहाण पणाचे म्हणाल तर नोबेल विनिन्ग शास्त्रज्ञ व वैद्यकीय एक्स्प र्ट तिथे भरपूर आहेत. विचार पद्धत वेगळी आहे.

कॅनडा नी rt pcr चे आऊटसोरसिंग करावे . >> कॅनडाचा फक्त आणि फक्त दिल्ली विमानतळावरील टेस्ट सेंटरवर विश्वास आहे. मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद कुठूनही आधी दिल्लीला जाऊन टेस्ट करावी लागते कॅनडात यायचं असेल तर कारण बाकी सगळीकडे पैसे दिले की झोल करतात म्हणे.

नवीन काही नाही. तरीपण उजळणी
https://threadreaderapp.com/thread/1478368257488818176

मुंबई मनपाने रोजच्या संसर्गग्रस्त व्यक्तींपैकी लक्षणरहित किती, इस्पितळात भरती झालेले किती , ऑक्सिजनची गरज असलेले किती अशी अधिक माहिती गेले तीन चार दिवस द्यायला सुरुवात केली आहे. साधारण ९०% लक्षणरहित, ७-८ टक्के इस्पितळात, अर्धा टक्का ऑक्सिजनवर असं प्रमाण आहे. सध्या ऑक्युपाइड बेड्सचं प्रमाण १५ % असलं तरी ते झपाट्याने घटत जाईल असं दिसतं. ४४९१/३०५६५. पॉझिटिव्हिटी २०% च्या वर आहे.

मी अजूनही सकाळी चालायला जातोय. सहाला निघतो, त्यामुळे तुरळक लोक असतात. काल शाळेत जाणारी मुलं दिसली. पण नंतर शाळा दोन महिने बंद असं मनपाने सांगितलं. कोणी लोक जवळ असले तर माझा मास्क नाकावरून. अन्यथा नाकाखाली. तोंड कायम बंद.
घरी वस्तूंची डिलिव्हरी घेताना मास्क लावतोय.

लॉक डाउन किराणा सामानाची यादी
गव्हाचे पीठ/ कणीक , तांदूळ प्रत्येकी पाच किलो
साखर दोन किलो
चहा कॉफी एक एक बाटला/ मोठा पॅक
रेड लेबल नॅचरल एक छोटा पॅक. काढ्यासारखा कामाला येतो
मॅगी
कांदे बटाटे दोन दोन किलो प्रत्येकी
अर्धा एक किलो टोमाटो
मीठ एक किलो
जिरे मोहरी १०० १०० ग्राम
तेल जमल्यास पाच किलो
तूप कमीत कमी १०० ग्राम ज्येना व मुलांसाठी
तूर मूग डाळ अर्धा / पाव किलो प्रत्येकी
साबुदाणा शेंगदाणे पाव किलो प्रत्येकी
१२ अंडी खात असल्यास
वाल मटकी वाटाणा हरबरे राजमा छोले पाव पाव किलो
उडीद डाळ अर्धा/ अर्धा किलो
नाचणी पीठ
उपवास भाजणी
भगर
मैदा एक किलो
तांदुळ पीठ अर्धा किलो
बेसन पाव किलो
यीस्ट व बेकिन्ग पावड र घरी उत्साही बेकर असल्यास

बांबिनो शेवई / मॅकरोनी पास्ता. हा स्वस्त असतो इंपोर्टेड पेक्षा व अडीनडीस एक मील होते.
मुलांना ज्येनाना शेवई ख्रीर गोड शिरा करून देता येइल.

महिन्याचे सामान एकदाचं मागवून ठेवायचे.
गरजेची औषध,mask,sanitizer जास्त नाही पण महिनाभर पुरेल असे असावे.
मैदा किंवा बाकी unhealthy पदार्थ टाळणे हे उत्तम
खजूर, आवळा,पेरू किंवा बाकी सेलेक्टेड फळं असावीत .
गाजर, बीट ह्याचा वापर असावा
मुंग, उडिद,ह्यांची डाळ.
ज्वारी किंवा बाजरी च्या भाकऱ्या.
आणि ताज्या हिरव्या भाज्या
पालक,मेथी,चवळी, मुळा इत्यादी.
शेवया,पास्ता,बर्गर,सँडविच,भज्जी, समोसे, ह्याला ना ना

शेवया,पास्ता,बर्गर,सँडविच,भज्जी, समोसे, ह्याला ना ना>> पोरांना लागतं हो कधी कधी.

भरत बरोबर मी जास्त कार्ब टाइप आहे. पण जास्त टिकेल असे रॉ मटेरिअल यादी दिली आहे. मूग डाळ अर्धा किलो दिली आहे ह्याचे चिले मस्त होतात. धिरडी. परवाच मास्टर रेसीपीवरू न बघोन केलेत .

आत्ताच बँकेतून पैसे आणले. आता तीन महिने पगार देणे अंधेरी शिफ्ट लेबरला पैसे हे ते होईल.

अजून तरी सर्व्त्र व्यवहार चालू आहेत. पण ऑफिसात मावशी लोक त्यांच्या बॉसला आता घरी बस्वणार का म्हणून घाबरत विचारत होते.
अजून लिहिते यादी. थोडे काम आहे ते उरकुन येते.

तुम्ही सर्व पण अ‍ॅड करा.

गोव्यामध्ये एक कार्यक्रम होता. तीनशे लोकांना परवानगी होती. जाता जाता खूपसे दक्षिण कोंकणही फिरून घेतले. मात्र शेवटच्या दिवशी अनेकांना त्रास झाला. आम्हांला घरी परत आल्यावर झाला. घसा खवखवणे,खूप थंडी भरून येणे, पाठदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, मध्यम ताप चढणे, जेवण नकोसे होणे, खोकला येणे अशी लक्षणे दिसली. कोविड १९ आणि डेल्टा यातून सहीसलामत बाहेर निघालो होतो. पण आता मात्र सौम्यसा फटका बसला. नशीबाने हे सर्व दोनच दिवस टिकले. आम्ही सदैव मास्क वापरतो. भरपूर पाणी, लिंबूसरबत पितो. गरजेचे असेल तरच बाहेर पडतो. गर्दीची ठिकाणे टाळतो. झिम्मा पाहाण्याचा मोह टाळला आहे. आता थोडासा कफयुक्त खोकला आहे आणि मधूनच किंचित शिरशिरी येते. बाकी ठीक.

काळजी घ्या हीरा. माझ्या अजून एका मित्राला कोव्हीड झाला आणि तो ओमायक्रॉन असावा असा डॉकचा अंदाज. त्याची लक्षणे अशीच + घाम येणे.
आधी एका मित्राला झाला तो पण ओमायक्रॉन असावा असा अंदाज आहे, तो पाच दिवसात बरा झाला, काही लक्षणे नाहीत.

Covid positive आल्यानंतर 7 दिवस home इसोलेशन ,ही एक अट आणि तीन दिवस ताप किंवा कोणतीच लक्षण नाही पाहिजेत ही दुसरी अट.
ह्या दोन्ही ची पूर्तता झाली पाहिजे.
मग परत
टेस्ट करण्याची गरज नाही.
आणि तुम्ही बाहेर javu शकता
असा प्रोटोकॉल आहे असे वाचनात आले.
जाणकार लोकांनी प्रकाश टाकावा.

सर्दी, खोकला, घासा खवखवणे है वातावरणातील सतत होणाऱ्या बदला मुळे पण होत आहे.
कधी थंडी,तर कधी गरम वातावरण ,तर कधी मध्येच पावूस .
हा सारखा होत असलेला बदल पण सर्दी ,खोकला ह्याला कारणीभूत आहे.
आता काही दिवसात मुंबई मध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे असे एक निरीक्षण आहे माझे.
हवामान बदल हा घटक पण सजीव सृष्टी वर बराच परिणाम करत असतो.

आधीच्या RTPCR टेस्ट मध्ये कोव्हीड आहे हे कळायचं, पण तो ओमायक्रॉन आहे की नाही हे कळायचं नाही. त्यासाठी सॅम्पल पुण्याला पाठवावं लागायचं.
पण गेल्या काही दिवसात नवीन टेस्ट मध्ये दोन्ही कळते.
या टेस्ट किट्स सर्वत्र उपलब्ध झाल्यात का काही कल्पना नाही.

Pages